Dec 01, 2021
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल -१३

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल -१३

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
सासुची कमाल सुनेची धम्माल -१३

आई!... दिवाळी झाली तो उरलेला फराळ काय करु?

अग ब्लॅकबेल्ट!..जो शिल्लक आहे तो मैनाला दे किंव्हा समीरच्या बाबांनां दे!..

आई!... बाबांनी आधिच नकार दिलाय!...

मग तु खा!..

आई! मीं खाल्ला असता पण आपण कोलगेट वापरतो.. सेंसोडाइन नाही!..

अग!.. यात त्या कोलगेट आणि सेंसोडाइनचा काय संबध?

आई!... ती सेंसोडाइन वाली बाई म्हणते नां दातौमें तेज झनझनाहट होने पर सेंसोडाइन का इस्तमाल करे। म्हणून!

ब्लॅकबेल्ट !... मला समजेल का?तुला नक्की काय म्हणायचे आहे ते?

आई!... ते तुम्ही बनवलेले लाडू आणि चकल्या चावल्या चावत नाही म्हणून म्हंटले मी!

वा! वा!! दिवाळीला पोट फाटेपर्यंत डोसत तेंव्हा ग!


आई! तेंव्हा जरा ताजे होते आता...

आता?.. आता?? काय झाले?

आई जाऊ द्या नां!... मैनाला देऊन टाकू फायनल! पाहिजे तर त्यांवर एक सेंसोडाइन फ्री देऊ!


बस!.. बस!!.. विनोद पुरे

ब्लॅकबेल्ट !...त्या जाहिरात वाल्यांना काही काम नाही त्यांत काहीही दाखवतात आणि तुमच्या सारखी अडाणी त्याला बळी पडतात....


आई!.. मी अडाणी नाही चांगली शिकलेली आहे समजल?...

अग! येथे अडाणी म्हणजे खोट्याला बळी पडणारे असा अर्थ...


आई!... मी कधी खोट्याला बळी पडले?

ब्लॅकबेल्ट ! तुच ती जाहिरात बोलत होतीस नां?... काय ते दातोमें तेज झनझनाहट की काय ते?


आई! ...जाहिराती खऱ्या असतात!...


काय खऱ्या असतात? ...एक काळी मुलगी क्रीम लावली की लगेचच गोरी होते.. ते खरं असते?

आई! काही जाहिरातीत अतीशोक्ती असते पण सगळ्या जाहिराती तश्या नसतात!..


काय नसतात?.... सगळ्या तश्याच असतात!... मला तर या जाहिरात वाल्यांनवर फ़ार राग येतो... काहीही दाखवतात... आणि त्यांत कहर म्हणजे कुणी खासदार असतो तरी आरोची जाहिरात करतो... जाहिरातीच करायच्या आहेत तर कश्याला खासदार होता.. उगाचच जनतेचे नुकसान!..


आई!... बाकी या मताशी मी सहमत आहे तुमच्या!....


ब्लॅकबेल्ट !....एका जाहिरात एक मुलगी मोठ झाड सहज हलवते आणि विचारल्यावर काय सांगते तर म्हणे मेरे दात हे स्ट्रॉंग!... याला कायअर्थ आहे का?
एका जाहिरातीत धोनी पाच सहा जणांना बाईक वरून घेऊन त्या ट्राफिक हवालदारा समोरून निघुन जातो.... आणि तो हवालदार पण त्यांचे कौतुक करतो... आता याला काय म्हणावे!

अग! आमच्या वेळेस काय जाहिराती होत्या.. हमारा बजाज वैगरे!...


आई!... ठीक आहे!... आता जाहिराती मनावर घेण बंद! मैना आली की तिला सर्व फराळ देऊन टाकू . विदाऊट सेंसोडाइन!


क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक