सासुची कमाल सुनेची धम्माल..-भाग -११

सास बहु कथा..
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग .११


ए!...ब्लॅक बेल्ट ! ....ती मैना आली की, आपले जुने कपाट साफ करून घे तिच्या कडुन... आजकाल फारच कामचुकार पणा करते!... भांडी पाणी केली की.. चालली महाराणी!..


हो!..आई!... ती मैना आली की.. तिला पिंजऱ्यातच बंद करते!....मीरा गंमतीत म्हणाली....


इतक्यात दारावरची बेल वाजली..


अग!..ब्लॅकबेल्ट ! ...ते पिंजऱ्याचे दार उघड... ती मैना आली असेल... शांता ओरडली..


या!... या!!.. मैनाराणी! ..मीरा तीच स्वागत करत गंमतीने...


हे काय? ताईसाहेब मी कसली राणी!.... खऱ्या राणी सरकार तर तुम्ही आहात!..... मस्त छान पैकी सासु बाई तुम्हांला खायला करून देतात..... .. आणि तुम्ही बसुन बसुन खाता! ..


ए!.. मैने तु माझी तारीफ करतेस की खेचतेस?....मीरा जरा रागात....


तारीफ करते ताई साहेब!... अशी गुणाची सासु मिळायला नशीब लागत.... नाहीतर माझी सासू...ऊठसूट मला काम लावते आणि... शिव्या पण देते!...


मैने!... तु आधी जरा किचनमध्ये आईला मदत कर!... मग आपण कपाट साफ करु!...


आपण?.... मैनाने आश्चर्याने विचारले...


मैने!... तु जास्त शहाणपणा करु नकोस ह!..... तु जा आधी किचनमध्ये!.....


आईसाहेब!.... तुम्हांला सुन फ़ार गुणाची मिळाली आहे हो!.... किती रिक्वेस्ट करते ती तुमची!....


अग मैने!... रिक्वेस्ट नाही ग!... रिस्पेक्ट म्हणतात त्याला... आणि ती कधी करते ग रिस्पेक्ट?....


काय बाई साहेब!.... आत्ताच तर सांगत होत्या... की, सासु बाई थकल्या असतील त्यांना मदत करायला जा!..... आणि त्यांनी मला इकडे पाठवल!....


वा!... ग!... मैने!... म्हणजे तिने पाठवले नसत तर तु आली नसती किचनमध्ये... बरोबर?...


तसं नाही आई साहेब!. तुमचा मान करते ती अस!....


काय ग मैने!.... बाकीच्या बायका भांडण लावून देतात... तु नेहमी दुसऱ्याची का ग तारीफ करत असते!...


संस्कार!.... आई साहेब! संस्कार!!.... मैना एकदम फिल्मी पद्दततिने...


तूझे ते संस्कार राहु दे!...तूझ्याकडे ! ...हे किचनच आटोपून ते जून कपाट साफ कर!...


आई साहेब! साफ म्हणजे?


मैने... तु जास्त शहाणपणा करु नकोस! समजले?... तूझ्या ताईसाहेबाना घे जोडीला!...


ताईसाहेब!...किती धूळ आहे!... किती वर्षे झाली साफ केले नसेल हे कपाट?..... मैना कपाट साफ करता करता..... अनेक वस्तु काढत होती.... त्यांत एक जुना एल्बम होता.... त्यांत शांता आणि बाबांचे... तसेच समीरचे जुने फोटो होते!....


तो एल्बम मीरा फ़ार आतुरतेने पाहत होती कारण शांताचे अनेक जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते... ते फोटो पाहुन मीरा शॉक झाली व किंचाळली..


आई!.... आई!!.... लवकर या!...


तशी शांता धावत धावत आली...


काय ग! ...ब्लॅकबेल्ट! काय झाल ओरडायला! ..... काही डोक्यात बीक्यात पडल काय? शांता काळजी स्वरुप..


तसा तो एल्बम शांताच्या हातात देत!... आई!...तुम्ही पण?....


बाप रे!... आई!... मला खरंच माहिती नव्हते!... मला समीर देखिल कधी बोलला नाही!... आई खरंच मला माफ करा!....


अग!... ठीक आहे!... त्यांत माफी कसली मागतेस! ...शांता जरा विजयी मुद्रेत.....


आई!... पण हे सगळे कधी आणि कुठे?....


अग ही तेव्हाची गोष्ट आहे जेंव्हा समीरच्या पप्पांची बदली चीन मध्ये झाली होती.....आम्ही तब्बल आठ वर्षे चीन मध्ये होतो!...


क्रमशः