सासुची कमाल सुनेची धम्माल -१०
आई!.... काही दिवस मी आई बाबांना बोलाऊन घेऊ का?....
कश्याला?....मी आहे ना तुझी काळजी घ्यायला!... तसं तुला माझ्यावर विश्वास नसेल तर बोलाव!... शांता काहीशी इमोशनल ब्लेकमेल करत..
तुमच्यावर विश्वास आहे हो आई!
पण विश्वासचा वास्ता देत मस्त पत्ता कट केला त्यांच्या येण्याचा... मीरा काहीशी नाराजीत..
पण विश्वासचा वास्ता देत मस्त पत्ता कट केला त्यांच्या येण्याचा... मीरा काहीशी नाराजीत..
आग तसं नाही!... पण मी आसताना त्यांना का त्रास?.. अस मला वाटत...मीराच्या आईवडिलांचा येण्याचा मार्ग रोखला म्हणून शांता मनातल्या मनात खुश होत...
आई!... मी काय म्हणते.. बाबा नको... निधान आईला तरी?...
अग!...ब्लॅकबेल्ट ! आई येऊन काय करणार इथे?.... तूझ्या बाबांनां औषधे वैगरे वेळेवर द्यायला लागतात... मग तुझी आई आली तर अडचण होईल नां तूझ्या वडिलांची?...
आई!... ठीक आहे मग दोघानाही बोलवते!... प्रॉब्लेम सोल!...
हे... ब्लॅकबेल्ट तिच्या आईवडिलांना इकडे बोलावल्या शिवाय शांत बसणार नाही... काहीतरी करायला हव शांता मनातल्या मनात विचार करत.... किचनमध्ये गेली..
आई ग!.... आई ग!.... पाय घसरून पडले नां!...ब्लॅकबेल्ट !....अहो! धावा लवकर!....
शांताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून.. मीरा व बाबा .किचन कडे धावले..... शांता लादीवर पडून होती...
आई काय झाल? ....मीरा व बाबा तिला उचलत म्हणाली....
काही नाही... एकदम आले.. लादीवर पाणी होते.... आणि पाय घसरला माझा.... शांता ने विव्हळत संगितले.....
आई कुठे लागल?... मीरा ने विचारले...
अग!..मांडिला मुका मार लागलाय!... शांता पुन्हा वीवळत
आई!... म्हणजे.. आता तुम्हांला चालता फिरता येणार नाही तर दोनचार दिवस?...
हो! ग!..ब्लॅकबेल्ट!... असच वाटतेय ! ..
ठीक आहे आई!... मग मी आताच फोन करून माझ्या आई वडिलांनां बोलवते.....
आपला प्लान आपल्यावरच उलटला आहे... हे शांताला समजले....
अग!... नको फोन करु.... उगाचच कश्याला त्यांना त्रास... तुझी आई आली तर तूझ्याच आईला स्वयंपाक वैगरे करावा लागेल..... ते बरं दिसेल का?.... तसं मी आता मूँह लावलंय आता बरं वाटते मला..... तु उगाचच फोन करून त्रास देऊ नको त्यांना!...
ठीक आहे आई!.... तुम्ही सांगता तर नाही फोन करत त्यांना...
मीराच्या या वाक्याने शांताने सूटकेचा श्वास टाकला..
आई आज मला.. भजी आणि वडे खायची इच्छा आहे!.... मग बनवताय ना?... तुम्हांला जमत नसेल तर मी फोन करते!...
अग!.... राहु दे!... तु कश्याला फोन करतेस... मी देते ना तुला सगळे बनवून!...
हे! ब्लॅकबेल्ट आता त्या फोनची धमकी देऊन काय काय करयला लावील याचा विचार करत शांता उठली.. व निमूटपणे किचन मध्ये गेली...
क्रमशः .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा