Aug 16, 2022
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल भाग- ३

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल भाग- ३
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग ३


आई!... आज बाजारात जायचे.. भाजी खरेदीला?... मीरा ने विचारले.....

चालेल!...... भाजीच्या निमित्ताने सोसायटीतल्या बायकांची काय तयारी आहे ते देखिल समजेल!.शांता उत्साहात म्हणाली...

मीरा आणि शांताने मॅचींग साड्या नेसुन घरातून बाजाराकडे कूच केली.... ते देखिल हातात हात घालुन....


हे सगळं अदभुत दृश्य पाहुन बाबांनी अंदाज केला.... की येत्या नऊ दिवसांत काय काय पहायला मिळेल...... त्यांनी मनातल्या मनात जोशी काकूंना सलाम केला.......


मीरा आणि शांता खाली उतरताच...त्यांना सोसायटी कंपाऊंडमध्ये पवार जोडी भेटली भेटली...... एरवी नेहमी भारत पाकिस्तान सारखी लढणारी पवारांची सुन तिच्या लंगडया सासूला खांद्यावर हात टाकून चालायला मदत करत होती.....


ते... भयंकर दृश्य ( शांता-मीराच्या दृष्टीने ) पाहिल्यावर त्या दोघींनाही धक्काच बसला.. त्या समजल्या.... की, या स्पर्धेत त्यांची जोडी किती मागे आहे.....


ब्लॅकबेल्ट !....पाहिलस? ..नशीब आपण घरात इतकी भाजी असुन... भाजी आणण्याच्या बहाण्याने बाहेर पडलो ते!.... नाहीतर आपल्याला इतर बायकांची रणनीती काय आहे ते काहीच समजले नसते!.... शांता काळजी स्वरुप म्हणाली.....हो! आई!...अगदी बरोबर.... आपल्याला काही तरी युनिक आइडिया करावी लागेल... मी काय म्हणते!.... आपण बाजारातून येतांना तुम्ही सोसायटी कंपाउंड़मध्ये रिक्षातुन उडी टाका!.... आणि तुमचे दोन्ही पाय मोडल्याची अवार्ड विनिँग एक्टिंग करा!.... मग मी तुम्हांला उचलुन घरी घेऊन जाईन.... ते दृश्य पाहुन सगळ्या बायका शॉक होतील..


वा!.... वा!!..... मस्तच आयडिया आहे ब्लॅकबेल्ट ! ..छान!......फक्त... माझ्या ऐवजी तु रिक्षातून उडी मार बस!...... शांताच्या उत्तराने मीराने तो प्लान लागलीच रिजेक्ट केला....


त्या थोड्या पुढे जातात तो त्यांना कंपाउंड़ मधे दामले जोडी दिसली..... एरवी wwf मधल्या लढाई सारख्या लढणाऱ्या सासु-सुना..... एकत्र योगा करत होत्या.......


पुन्हा एकदा ते भयंकर दृश्य पाहुन शांता- मीराची पाया खालची जमीन सरकली...


आई ! ....मी तुम्हांला कराटे शिकवू?... मीराने आनंददाने विचारले.....

ब्लॅकबेल्ट!....राहु दे!.....ते कराटे शिकवताना तु मुद्दामून माझ्या हाडांच्या चोरा- मोरा करशील!........शांताने शंका मांडली.....


मग?.... काय करायचे?.. मीराने विचारले.....

ब्लॅकबेल्ट! आपण आधी बाजारात जाऊ!......रस्त्याला काही आयडिया सुचली तर पाहु!....पुढच्या दिवशी सकाळी....चला!..... चला!!..... नाष्टा टेबलवर लागला! ...


समीर आणि बाबा हात धुवुन आले..... पाहतात तर काय टेबलवर एकदम शाही नाष्टा.... भजी काय... वडे काय.... खमन काय..... बाप रे!..... आज काय काही स्पेशल आहे का?.... समीरने विचारले.....


हो! सर!.... शेवटी तुम्ही आमचे परीक्षक महोदय!.... इतना तो हम कर ही सकते है।.... मीरा लाडिक पणे म्हणाली.....

म्हणजे?.. ही आम्ही सेवा समजायची की लाच?...बाबांनी त्यांच्या शैलीत विचारले.....

सेवा... लाच... काय समजायचे ते समजा!...... पण त्या नंबरवर तुमचा एखादा जरी मिसकॉल गेला ना तर.....


तर काय तर?...... ते कलम आठ वाचल नाही तुम्ही दोघींनी!..... त्यांत स्पष्टच उल्लेख आहे.. की,.. परीक्षकांवर स्पर्धकांना कोणताही दबाव आणता येणार नाही!... बाबा त्यांना चिडवत म्हणाले...

बाबांच्या या वाक्यावर शांता काहीतरी बोललीच असती.... पण तिच्या समोर तो नवव्या दिवशीचा सत्कार आडवा आला.....


समीर!..... निदान नऊ दिवस तरी आपण या घराचे राजे आहोत!..... बाबा पुन्हा...चिडवत


शांता हात चोळत होती पण पुन्हा तो सत्कार आडवा आला.....


कारण शांताने नवव्या दिवशी सत्काराला कोणती साडी नेसायची... जोशी काकु कडुन शाल श्रीफळ घेतांना कोणती पोज द्यायची हे देखिल ठरवले होते.... कारण ही स्पर्धा ब्लॅकबेल्टशी आम्हीच जिंकू असा आत्मविश्वास होता तिला...जेंव्हा पासुन या स्पर्धेचे ऐलान झाले होते.... तेंव्हा पासुन सोसायटीतल्या बायकांचे रूपांतर अलका कुबल मध्ये झाल होत...

त्यामुळे सोसायटीतले सगळे पुरुष मनातल्या मनांत जोशी काकूंचे आभार मानत होते.... कारण नऊ दिवस का होईना पण त्यांनी वातावरणात गोडवा आणला होता....


बघता बघता नव्याचे नव दिवस चालले होते.... कधी एकदा नऊ दिवस संपतात अस सगळ्या बायकांना झाल होत..... तर हे नऊ दिवस कधी संपूच नये अस सगळ्या पुरुषांना वाटत होत....


झाले एकदाचे नऊ दिवस पुर्ण..... नवव्या दिवसाच्या रात्री सगळ्याना उत्सुकता लागली होती की, की सोसायटीतील बेस्ट सासु सुनेची जोडी कोण?...


त्या रात्री सोसायटीत मस्त मंडप सजला होता.... सगळ्या बायका आप आपल्या जळावू साड्या नेसुन आल्या होत्या.......


आज शांता-मीरा देखिल एकदम मॅचींग पैठणी नेसल्या होत्या.... दोघीही अगदी छान वाटत होत्या...


सोसायटीचे सेक्रेटरी, जोशी काकु आणि काही मान्यवर व्यासपीठावर बसले होते.... बाकी सर्वच स्पर्धक, परीक्षक व प्रेक्षक मंडपात खुर्च्यावर बसले होते....


या अनोख्या स्पर्धेचा विजेता कोण?..... या विषयी सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती.....


समीर!... आज पासुन हे सोनेरी दिवस संपले... उद्या पासुन पुन्हा तेच! ...बाबा काहीश्या नाराजीत......

हो! खरं आहे बाबा!.... आपले तर ठीक आहे... पण त्या शेजारच्या माळी काकु.... आणि.. मोरे... मावशी किती छळतात !... त्यांच्यात फरक फक्त इतकाच आहे की, माळी काकूंना त्यांची सुन छळते ! आणि मोरे मावशी त्यांच्या सुनेला!.... म्हणजे अस ना तसं भांडण.... आणि त्यामुळे घरात अशांती....


हो! बरोबर आहे समीर! बघ गेले नऊ दिवस..... त्या स्पर्धेमुळे का होईना... किती शांतता होती त्यांच्या घरात!...
सेक्रेटरी साहेबांच मनोगत झाल्या नंतर निकाल जाहीर करण्यासाठी स्वतः जोशी काकूंनी माईक हातात घेतला....


नमस्कार!..... मला माहिती आहे की, स्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी सगळे आतुर आहेत..... त्यामुळे कसला ही वेळ न दवडता मी आपल्या सोसायटीतल्या आदर्श सासु- सुन.. या स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहे!....


तर!..... तर!...... या आदर्श सासु - सुनेचा पुरस्कारची विजेती जोडी आहे!...... ती......म्हणजे!......आपल्या सोसायटीतील एकूण तेरा जोड्यापैकी ....तेराच्या तेरा जोड्या..... म्हणजे सगळ्याच सासु- सुनेच्या जोड्यानी पहिला क्रमांक पटकावला आहे.....जोशी काकूंच्या या वाक्यावर सगळ्यानी टाळ्या वाजवल्या... खास करून पुरुष मंडळीनी..


सुरवातीला मी या सगळ्या जोड्याचे मनःपूर्वक अभिनंदन करते!.....


ही स्पर्धा भरवण्याची संकल्पना माझीच ....माणसाच्या आयुष्यात सुख दुःख ही येतच राहतात..... त्यातुन मार्ग काढुन जास्तीत जास्त कस सुखी जीवन जगता येईल..... याची धडपड म्हणजे जीवन......

पुरुष मंडळी आप आपल्या कामावर जातात.... त्यांत कधी कामाचा ताण... बॉसचा आडमुठेपणा... ई... ते सहन करत असतात...... या सगळ्या अडचणीतुन घरी आल्यावर घरात शांतता असावी ही त्यांची माफक अपेक्षा असते.... मात्र घरात सासु- सुनेचे भांडण असले की, तो कंटाळतो.....

तसं घरात सासु- सुनेची नोक- झोक असावी... त्यांत देखील एक वेगळा आनंद असतो... पण त्याला मर्यादा असावी... एकदा का ती मर्यादा पार झाली की, त्याचे फ़ार विपरीत परीणाम होऊन कुठूंबाचे स्वास्थ बिघडते....त्याचा विपरीत परिणाम मुलांवर देखिल होतो.....


आणि हो!... मला खात्री होती.. की, मी पत्रकात दिलेल्या नंबर वर एकही मिसकॉल येणार नाही.... कारण कोण पुरुष आपल्या बायकोला हारलेले पाहील.....


त्यामुळे मी आधीच तेरा चषक, शाली व श्रीफळ आणून ठेवली होती....

जिंकलेल्या स्पर्धकांच पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन... धन्यवाद...


जोशी काकूंनी आपले भाषण संपवल.....सगळ्यानी टाळ्यांचा गडगडाट केला ....

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक