सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग -७
आई!... आज ना!... लेडी फिंगरची भाजी बनवा!.... मला खूपच इच्छा झालीय खायची ..मीरा आतुरतेने..
ब्लॅकबेल्ट !....ही घे सुरी!......आणि काप तुझी बोट!....देते भाजी बनवून!.....
आई!.... अस! काय?.... मला भेंडीची भाजी खायची आहे!...
हो!.. ना!... मग सरळ सांग की,... ते लेडी फिंगर काय?... आणि हो!.... भेंडीची भाजी मिळणार नाही!... शांता जरा रागात....
आई!... तुम्ही इतके पण नाही करु शकत माझ्या साठी?...
इतक काय!.... पण तितकही करु शकत नाही!.... कारण घरात भेंडीच नाही समजले?..... त्यासाठी भेंडीबाजारात जाव लागेल!...
आई!...मग घरात ज्या भाज्या शिल्लक असतील त्या सांगा... मग मी सिलेक्ट करते!....
अग! ब्लॅकबेल्ट! ...मी काही वेटर नाही तुला भाज्यांचे मेनू कार्ड सारखी नाव सांगायला! ..तो फ्रीज उघडून बघ जरा!...
ओ!..... आई!... यात तर फक्त वांगी आहेत... मीरा फ्रीज उघडुन ओरडली!..
आई!... मग बैंगन का भरता तरी?..
ब्लॅकबेल्ट !...तु गरोदर नसतीस ना! तर मी वांग्या ऐवजी तूझाच भरता बनवला असता.. शांता मनातल्या मनात...
आई!... ऐकलं मी!....
ब्लॅकबेल्ट ! ...तुला मनातल पण ऐकू येते?.... शांता आश्चर्याने ....
आई!... . तुमच्या मनातल चेहऱ्यावरच दिसते की,.....
ब्लॅकबेल्ट !...वांगी नको!... ती गरम असतात.... त्या पेक्षा मी खिचडी बनवते..... नाहीतरी आज आपण दोघीच आहोत दुपारी जेवायला!... संध्याकाळी बाजारात जाऊ... मग तुला काय खायचे ते घेऊन येऊ!... शांता समजावत..
ओके!.....
शांता आणि मीरा... संध्याकाळी दोघीही मार्केटला निघाल्या....
आई!... रिक्षात जाऊ ना?....
नाही!... चालत.... कारण तूझा व्यायामही होईल आणि भाडही वाचेल!.... शांता समजावत..
आई! त्यांत जास्त महत्वाचे काय?.... भाड की व्यायाम?
दोन्ही!..... त्याच भाडय़ात तुझी.. अर्धा किलो बायांची बोट येतील!... शांता.
आई!.... पण अस चालत मार्केटला गेलो तर लोकं हसतील ना?....
ठीक आहे!... मग धावत जाऊ!... शांता जरा रागात.. अग!... लोकांना काय माहिती आहे?...आपण का चालत जातोय ते?..... आणि जे चालत फिरतात त्यांना लोकं हसतात?...ब्लॅकबेल्ट !..उगाचच काहीही बोलू नको!..
बोलो! मौसी!... क्या चाहिए?... भाजीवाल्याने विचारले...
ब्लॅकबेल्ट !....सांग त्याला काय पाहीजे ते!.....
आई!..... तो मौसी!... अस म्हणाला.... म्हणजे त्याने तुम्हांला हाक मारली!... मला मारली असती तर त्याने दीदी!.. किंव्हा... बेटी! अस संगितल असत...
भय्या!.... तुमने कीस्को बोला?.. शांताने खरं खोटं करण्याचा प्रयत्न केला...
आप दोनों को मौसी!... तो उत्तरला.....
तशी शांता मीराकडे पाहुन जोरजोरात हसायला लागली!...
क्या हुवा माँ जी? ....आप हस क्यों रही है?.... तो म्हणाला....
त्याने माँ जी अस सांगितल्या मुळे... ...शांताकडे पाहुन मीरा जोरजोरात हसायला लागली.....
भय्या!..... वो माजी नही आजी है!.... अस सांगुन... थोड मोठ झालेल पोट धरून मीरा हसायला लागली.....
त्या दोघींचे काय चालले आहे...हे त्या दोघींनी तात्पुरत्या मानलेल्या भावाला काहीच समजत नव्हते.....
हमसे कोनो गलती हुयी क्या मॅडमजी?.... तात्पुरत्या भावाने भीत भीत विचारले.......
अरे!.... आधिच मॅडम म्हणाला असतास तर इतका तमाशा झाला नसता!.... शांता काहीशा रागात...
आणि ब्लॅकबेल्ट ! हे आजी माझी काय?....
आई!..... माझी... नाही!... माजी!... माजी!!... ...ते राजकारणातले.... माजी... म्हणजे होवून गेलेले!... आजी म्हणजे... सध्या पदावर असलेले!..... ते... आजी!..... तुम्ही समजता ती आजी नाही!......त्यासाठी अजुन बरेचसे महिने आहेत... मीरा चिडवीत.. ..
आपल्या तात्पुरत्या भावाकडुन भाजीची भाऊबीज घेऊन त्या .. दोघी घरा कडे निघाल्या.....
क्रमशः