सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग-५

सास बहु कथा..
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग- ५...


दारावरची बेल वाजली...


ए!...ब्लॅकबेल्ट !...दरवाजा उघड!... शांता किचन मधुन ओरडली...

आई!.... पण मी या अवस्थेत?.... मीरा काहीशी गंमतीने म्हणाली...


अग!.... मी दरवाजा उघडायला सांगतेय!..... दरवाजा उचलायला नाही!.....शांता काहीश्या रागात....


या! ..या!! जोशी काकु!.... मीराने दरवाजा उघडुन जोशी काकूंचे स्वागत केले..... तशी शांताही किचन मधुन बाहेर आली.....


या!.... काकु!.... बसा!... शांताने जोशी काकूंना विनंती केली...


काकु! ..आज बऱ्याच दिवसांनी आमच्या घरचा रस्ता विसरल्या?.... शांताने विचारले.....


काही नाही ग शांता!..... मीराची बातमी समजली म्हणून तिला विश करायला आले बाकी काहीं नाही!.... जोशी काकूंनी येण्याचे कारण संगितले....


शांता आणि जोशी काकु काहीश्या समवयस्क.... ...पण जोशी काकु सोसायटीतल्या सगळ्या बायकांना एकेरी नावाने हाक मारत..... एकेरी हाक मारल्याने सबंध अधिक जवळचे वाटतात अस त्याचं व्यक्तिगत मत.......


बाकी शांता! आता काय मज्जा आहे तुझी!.... घरात नवीन पाहुणा येणार!..... मीराची काळजी घे!......

अहो काकु!.... काळजी म्हणजे ..आत्ताच मी तिला मॅगी बनवून देत होते..... तीची मॅगी खायची इच्छा झाली म्हणुन!....


माझी मॅगी खायची इच्छा होती?.... मीरा.. शांताला... काकूंच्या नकळत इशारा करत..


..वा!... छान शांता... सगळ्या सासूनीं सुनेची अशी काळजी घेतली तर किती बरं झाल असत नां?...तसं तुमचे दोघींच तर मला माहिती आहे ग!..... तुम्ही सासु- सुनेच्या सगळ्या मर्यादा पाळता... त्यामुळे तर तुमच्या घरात नेहमी छान वातावरण असते!... काकु म्हणाल्या...


काकु!...या ब्लॅकबेल्ट चे अती होते म्हणुन नाहीतर एरवी शांतताच असते घरात!.... शांता जरा तक्रार स्वरुपात ....


काकु!.... मी अती करेन अस स्वप्नांत देखिल खरं वाटेल का तुम्हांला?.... मीराही तक्रार स्वरुप.....


बस!..... नाहीतर तुमची दोघींची चक्की चालु होईल... आणि मध्ये माझी चटणी होईल.... जोशी काकु विनोदाने म्हणाल्या...


बाकी शांता!.... तुला तर काही वेगळे सांगायला नकोच!... आता मीरा साठी.... रामायण... महाभारत... शिवाजी महाराज...श्रीकृष्ण.. यांची पुस्तक वाचायला दे!.....त्यामुळे बाळावर चांगले संस्कार होतात अस म्हणतात....


काकु!.... आता तुम्हीच सांगा या ब्लॅकबेल्टला!.. ....काल ही.. चुडेल का बदला.... ते पुस्तक वाचत होती.....


आई!.... ते... पुस्तक तुम्हीच आणले होते.!... आणि किती वेळा मी समोर असले की तुम्ही मुद्दामून ते वाचायच्या... समजल ?...मीरा पुन्हा तक्रार स्वरुप.....


ठीक आहे!.... ठीक आहे!!.... आता ते पुस्तक मला द्या.... म्हणजे प्रश्नच मिटला... काकूंनी नेहमी प्रमाणे त्यातुन मार्ग काढला....


मीरा!..... हे तूझ्या साठी! ...यांत भागवत गीता आहे!.... तूझ्यासाठी माझ्याकडून छोटीशी भेट.जोशी काकु मीराच्या हातात एक बॉक्स देत म्हणाल्या....


फ़ार फ़ार आभारी आहे काकु!... मीरा जोशी काकूंच्या पाया पडत म्हणाली......


असु दे!.... असु दे!!... तु फक्त आनंदी रहा!..... काही अडचण असेल तर शांताला लगेच सांगायची...... चल... मीरा!.... शांता!... निघते मी..... आणि काळजी घे तूझ्या सूनबाईची!....जोशी काकु जाता - जाता शांताला म्हणाल्या


आई!.... जोशी काकु जाता- जाता काय म्हणाल्या पाहीले ना?
आता माझी व्यवस्थित काळजी घ्या!...मीरा गंमतीन.....


हो!....... चल!... ब्लॅकबेल्ट !...आता झोप तु तूझे पाय दाबते.!...शांता जरा रागात.....


आई!.... खरंच?.... चला... माझे पाय शिवशिवू लागलेत.... तुमच्या कडुन दाबून घ्यायला.... मीरा विनोदात... म्हणाली......

दुसऱ्या दिवशी सकाळी मीराला तयारी करतांना पाहुन..


..ब्लॅकबेल्ट !...आता तूझे... ते कराटे क्लास वैगरे आता बंद! समजल?


चालेल!..ठीक आहे!... आता तुम्ही सांगाल तसं!


ब्लॅकबेल्ट! आता जास्त वजनी काम करायचे नाही!... शांता काहीशी समजावत...


आई!... तुम्ही तर अस सांगताय जस काय मी रोज वीटभट्टीवर कामाला जाते!.....


आई!... मी काय.. रोज स्वयंपाक तर बनवते!....


ब्लॅकबेल्ट !...तु रोज स्वयंपाक बनवतेस?....शांताने रागात विचारले.....


आई!.... म्हणजे कधी कधी बनवते अस!.....


कधी?... कधी??..शांता पुन्हा जरा रागात...


आई!.... कधी कधी.. म्हणजे कधी तरी!... अस म्हणायच होत मला!... मीरा स्वतः ला सावरत.. म्हणाली....


...मग ?....अब आया ना? उंट पहाड के नीचे!...शांता विजयी स्वरुप..


आई!.... उंट नाही!.... उट.... उट.. म्हणतात हिंदी मध्ये... मीराने नेहमी प्रमाणे चूक काढली...


ब्लॅकबेल्ट !....उंट.... असो नाहीतर उट असो..... तुला कहावत समजली ना?... बस!...


ब्लॅकबेल्ट!...तसही तुला काही सांगायचे म्हणजे.. उलथ्या घडयावर पाणी!....


आई.... उलथ्या... नाही... पालथ्या.... पालथ्या घडयावर!


तेच ते!....तुला समजल ना?.... मग झाल! ....


क्रमशः..