Jan 29, 2022
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल -१५

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल -१५


सासुची कमाल सुनेची धम्माल - १५


ओ माय क्रोन !.... टीव्ही पाहता मीरा किंचाळली....

ए बेल्क बेल्ट! काय झाल ओरडायला?...आणि तुला ओ माय गॉड! असं म्हणायचे होते का?

हो आई!... पण टीव्हीवर सतत त्या ओमायक्रॉनचे नाव ऐकून तसं तोंडातून निघाले!...

अग!... मग कश्याला पाहतेस त्या बातम्या आख्खा दिवस?...

आई!.... तो ओमायक्रॉन दक्षिण आफ्रिकेतून कुठे पर्यत आला आणि आपल्याकडे कधी पोहचेल ते पाहते!..

अग!..तो ओमायक्रॉन काय चालत निघालाय का आफ्रिकेतून?... आपल्याकडे आला तर तो विमानानेच येईल!.. कदाचित आला देखिल असेल आपल्याला अजुन माहिती नाही म्हणून..

आई!.... खरंच आपल्याकडे आला असेल?... पण आई!.. काळजीचे काही कारण नाही कारण आपल्या घरात तर सगळ्यानी दोन-दोन डोस घेतलेत!...


अग!... तो विमानाने इतर देशांत पोहचलाय! ....आणि विमानाने कोणाला प्रवास करण्याची परवानगी आहे.... तर ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना.. तरी तो पसरतोय नां मग?....

आई!... तुमचे अगदी बरोबर आहे!..मग लसीचे दोन डोस घेऊन आपला काहीच फायदा नाही?..

अग!.. तसं नाही.. सध्याची लस ही त्या रोगावर नसली तरी ती घेतल्याने माणसांची प्रतिकार शक्ती वाढते..म्हणजे ओमायक्रॉन किंवा त्या सारख्या विषाणु मुळे होणाऱ्या आजारावर मात करता येईल!

आई!.. पण ओमायक्रॉन खतरनाक आहे का?..

असेल!.... पण तूझ्यापेक्षा नक्कीच कमी!.. शांता हसत म्हणाली..

आई! हे काय सारख!!... मी सिरियसली विचारतेय!..

अग! हे आत्तातरी लगेच सांगता येणार नाही... कारण ओमायक्रॉन मुळे सध्यातरी एकही मृत्यू झालेला नाही.. आणि विषाणू आहेत ते!...ते आपले रूप बदलत असतात... अग !हे विषाणू लाखो करोडो वर्षे जगतात......आणि काही तर अमर असतात !...

ओ! माय!! क्रॉन!!!

आई!... खरंच?

हो ग!.. खरं आहे.. म्हणून तर नवीन वेरियंट आला असं म्हणतात... आणि ते येतच राहणार!

आई! आधी का येत नव्हते? या दोन वर्षातच का?

अग!.. आधी देखील येत होते... आज पर्यंत किती तरी रोगाच्या साथी आल्यात त्यांच्या मुळे.. फक्त त्यांचे नाव आणि स्वरुप वेगळे असत इतकंच!

बाप रे ! आई !..मग आता?

अग! घाबरू नको? आता लस आहे.. इतर वैद्यकिय सुविधा आहेत. त्याचं बरोबर प्रशासन देखिल अलर्ट आहे... त्यामुळे तु.. त्या बातम्या वाल्यांचे जास्त मनावर घेऊ नकोस... ते नेहमी वाढकरुन सांगतात... आपण आपली काळजी घ्यायची समजले?

हो! आई!! समजले!..

अग! काय समजले तुला सांग बरं?

हेच की आपण आपली काळजी घ्यायची... गरज असेल तरच घरा बाहेर पडा,.. बाहेर गेल्यावर मास्कचा वापर करावा.. नाहक गर्दी करु नये,.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांचे कोणाचे लसीकरण राहिले असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या!... आई ! बरोबर नां?

हो ग ब्लेकबेल्ट! अगदी बरोबर!! शाब्बास!!!

आई!??????

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक