Dec 05, 2021
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल -१४

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल -१४

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
सासुची कमाल सुनेची धम्माल - १४


ब्लेकबेल्ट! काय ते चायनीज चेनल लावून ठेवलस कधी पासून?...


आई!.. त्यांत ते नवरा बायकोच भांडण लागलय ते पाहतेय!...

अग!... पण त्यांची भाषा तुला समजते काय?..

आई! भाषेची काय गरज?.. त्यांचे हावभाव दिसतात नां!...

असं!... मग आवाज बंद कर नां!... तो कशाला वाढवलाय?

आई! त्या शिवाय कस कळणार?

बरोबर!... तुमच्या सारखी मानस दुसऱ्यांच्या भांडणातच समाधान मानातात!...

आई!.. ठीक आहे मग बातम्या लावते!..

राहु दे!.. अग!.. त्यांत तर आणखीन भांडतात...आणि डिबेट( भांडण) करण्या साठी चेनल वाल्यांकडुन पैसे ( मानधन) घेतात म्हणे!..

आई!... काहीपण फेकू नका हां!

अग! काहीपण नाही खरं तेच बोलतेय मी!.. कालतर एक डिबेट वाला (भांडण वाला) सांगत होता की, आपला देश १४ ला स्वातंत्र झाला म्हणे!

आई!.. आपला देश तर १५ ला स्वातंत्र झाला नां?

अग!..१४ म्हणजे ...१४ऑगस्ट नाही.....१४ म्हणजे २०१४

आई!... मग आता तुम्हीच सांगा आपला देश नक्की कधी स्वतंत्र झाला?

अग !..हे मी कस सांगणार?

आई!... म्हणजे?... तुम्हांला तर सगळं माहिती असते नां?

अग!... सगळं माहिती असायला मी काय गुगल आहे?...


आई! तसं नाही! ..पण तुम्हांला बऱ्यापैकी माहिती असते म्हणुन!..


ब्लेकबेल्ट!... खरंतर या प्रश्नाचे उत्तर का द्यावे!... शांता गंभीर पणे म्हणाली...

आई!.... काय झाल? ..मी आपले सहजच विचारले त्यांत इतके सिरियस होण्याच कारण काय?

अग !..तसं नाही...हे असले प्रश्न उपस्थित करतात त्यांच मला आश्चर्य आणि कीव येते ग!..

आई!... मी नाही समजले? प्लीज जरा डिटेल्स सांगा नां!

अग!... आपल्याला स्वातंत्र मिळावे या साठी जे कोणी लढले असतील.... मग ते कोणत्याही संघटनेचे असो...त्यामुळे असे प्रश्न जर कोणी उपस्थित केले तर... त्यांचा सरळ सरळ अपमान ठरतो ग!....


आई!... एकदम सहमत!...पण जाऊ द्या आपल्याला काय त्यांत?

अग!... हेच चुकते आपले... आपल्याला काय त्यांत!... इतके म्हंटले की झाल!

आई!... मग काय करायचे आपण?.....आपण इतकंच करायचे की, असे बोलतील त्यांच्या कधी बातम्या बघायच्या नाही... त्यांच्या कडे पुर्ण दुर्लक्ष करायचे..... कारण ज्यांना कोणी विचारत नाही तीच लोकं प्रसिद्ध होण्यासाठी हे सगळं करत असतात....

आई!... अगदी बरोबर!


अरे वा!.... आज माझ्या प्रत्येक गोष्टीशी सहमत कमाल आहे बाबा!.....

आई!... पण नक्की कधी स्वातंत्र मिळाल हे तर तुम्ही संगितले नाही?......


अग!... माझ व्यक्तीगत सांगशील तर.. गेल्या वर्षापर्यंत मी स्वतंत्र होते..


आई!... म्हणजे?

अग! ...गेल्या वर्षी तुमचे लग्न झाल नां!... मग तु आलीस तेव्हपासून माझ स्वातंत्र गेले चुलीत!...

आई!... कुछ भी!.... आपल्या कडे चूल कुठे आहे!... आपण तर गैस वर स्वयंपाक करतो!....मग तुमचे स्वातंत्र गैस शेगडीमध्ये गेले असं सांगा नां!

अग!... आपण नाही.. मी करते सगळा स्वयंपाक!.....आणि चुलीत गेले अशी सांगायची पद्दत असते!..समजले?

आई!... पण आता चुली गेल्या चुलीत!... आता गैस शेगडी आल्या त्यामुळे आता शब्दात बदल व्हायला हवा!

ब्लेकबेल्ट!....जास्त शाहाणपणा करु नकोस!.... गैस ची शेगडी म्हणजे ती चूलच..... चूल म्हणजे फक्त मातीची चूल असं काही नाही समजले?

आई!... मला तर वाटले की माझ लग्न झाल्यापासून माझ स्वातंत्र गेले.!.. आणि तुम्ही उलट मला सांगता!

अग!... बाहेरून येऊन आपल्यावर सत्ता गाजवली जाते त्याला सांगतात पारतंत्र्य!..

आई!.. म्हणजे मी बाहेरून आले तुमच्यावर सत्ता गाजवायला?


अग!... तु काय त्या गजनी सारखी सतरा स्वाऱ्या करून थोडी परत जाणार आहेस?


आई!... यात त्या आमिर खान गजनी काय संबध?

अग!.. तो गजनी नाही... मी मौहौम्मद गजनी विषयी म्हणतेय!...ज्याने आपल्या देशावर सतरा स्वाऱ्या केल्या होत्या व धन लुटून नेले होते....

पण आई!..मी तुमच्यावर सत्ता गाजवते?..क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक