Aug 18, 2022
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल - भाग १२

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल - भाग १२
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग- १२


आई!.... मला वाटल नव्हते तुम्ही देखिल मार्शल आर्टच्या चॅम्पियन आहात ते!.... मीरा अल्बम मधील फोटोकडे पाहून आश्चर्याने म्हणाली...


ब्लॅकबेल्ट ! ....समीरचे बाबा कामावर गेल्यानंतर मी घरी रिकामीच असायचे!... माझी शेजारीण होती... मग तिच्या सोबत जायचे क्लासला!.....


ताई साहेब!.... तुमची दोघींची जर फायटिंग झाली तर कोण जिंकेल?... मैना ची शंका...


अग मैने!... उगाचच शहाणपणा करु नकोस.... कराटे काय भांडणासाठी नाही तर.. स्वरक्षण करण्यासाठी शिकतात!... शांता समजावत......


अग मैना राणी!... मी तर म्हणते तु देखिल कराटे शीक!..मीरा सल्ला देत..


मी कश्याला शिकू ताईसाहेब?


अग मैना! तुला तूझा नवरा मारतो ना म्हणून!... मीरा पुन्हा....


ताईसाहेब!.....मी कराटे शिकले तर माझा नवरा मला घाबरून दुसरीकडे झोपायला जाईल!... मैना ची शंका.....


अग मैने!... आता मी आणि आई आम्ही कराटे शिकलो म्हणुन आमचे नवरे जातात का दुसरीकडे झोपायला?.....


ताईसाहेब! आता हे मला कस माहिती असणार?


ए!... मैने!... तु जास्त शहाणपणा करु नकोस हा!.. मीरा जरा रागात....


ताईसाहेब! ...साहेबांची गोष्ट वेगळी!... माझ्या नवऱ्याची वेगळी!... साहेब कस तुमच्या मुठीत आहेत!... आणि माझा नवरा कधी मिठीत देखिल येत नाही! ......


मैने!..काय बोलतेस तु मुठीत.... मिठीत?... मीरा काहीशी हासत....


खरं तेच बोलतेय ताई साहेब!

ताईसाहेब!..तसं मला कराटे शिकायची लहानपणापासून इच्छा होती! ...पण?


मैने!..तसं असेल तर राहु दे!... उगाचच रिस्क नको!.. नाहीतर तूझा नवरा ..जायचा दुसरी एखादीच्या मिठीत मीरा गंमतीने .......


ताईसाहेब! ....तसं तुमच्या कराटे क्लास मध्ये फुकट शिकवत असाल तर मी तयार आहे! ...मैना जरा आशेने..


नको!... मला कोणाचाही सुखी संसार मोडायचा नाही मैने!....


ताईसाहेब! फ़ार तर ...मी घरी नाही सांगणार!...


तुला मी शिकवीन कराटे!... मध्येच शांता म्हणाली...


आईसाहेब! ...आणि पैसे किती घेणार?....

पैसे नको!.... शांता म्हणाली


आईसाहेब!.... मग ठीक आहे!


अग! मैना! ....पैसे नको म्हणजे तु फक्त काम करायचे तूझा महिन्याचा पगार मी कापुन घेईन!... शांता हसत...शांताच्या या वाक्यावर तिघीही दिलखुलास हसल्या .....


आई!... या फोटोत तुम्ही खूपच सुंदर दिसता!... मीरा एल्बम मधील एक फोटो दाखवत...


ब्लॅकबेल्ट !..ऐन तारुण्यातील आहे तो!.... तारुण्यात सगळी चांगलीच दिसतात....


अगदी बरोबर!... आईसाहेब!....मी जवान होते तेंव्हा माझा नवरा किती लाड करायचा! ....आता चार मुलं झाली म्हणुन अजिबात लाड करत नाही!... मैना तक्रार स्वरूप....


मैने!.... ती चार पोरं म्हणजे नवऱ्याच्या लाडाचच प्रतिक की!.....मीरा जरा चिडवत....

मैना! तु कपाट साफ कर आधी नंतर तूझ लाड पुराण सांग!... शांता जरा रागात.......


ब्लॅकबेल्ट !.. तो पर्यंत जरा मैना साठी चहा टाक!.. ..


आई!... फक्त मैनाराणी साठीच नां?... मीरा जरा गंमतीने...

हो!... फक्त मैना साठी तुला पण नाही!...


हो!... आई!... समजल!..सगळ्यांसाठी बनवते बस!....


आईसाहेब!...तुम्ही बनवला असता तर बरं झाल असत!


काय ग! मैनाराणी माझ्या हाताला चव नाही?... मीरा जरा रागात...


ताईसाहेब!...तुमच्या हाताला चव आहे की नाही ते माहिती नाही... पण तुमच्या चहाला चव नसते... अस एकदा.. तुम्हीच सांगत होता ना!.....


नशीब!...या मैनेने माझ नावं संगितले नाही!... नाहीतर ब्लॅकबेल्टची सी. आय. डी. चौकशी चालु झाल असती!. शांता मनातल्या मनात....


मैने!.... तूझ एक बाकी बरं आहे!... तु भांडण लावून देत नाहीस!... शांता कौतुकाने ....


संस्कार!... आई साहेब संस्कार!!... मैना पुन्हा फिल्मी स्टाईलने...


ताईसाहेब!..आज मस्त चहा आहे!.. मैना चहाचा घोट घेत..

आज म्हणजे?.... मैने! ....तुला काय मी रोज चहा करून देते?...


तसं नाही ताई साहेब!...कौतुक केले की, रोज मिळेल म्हणून म्हंटले मी!...

अग मैने!... मोलकरीण तु आहेस की मी?... मीरा जरा रागात..

ब्लॅकबेल्ट !....असु दे ग!... मैना करते सगळं!... शांता जरा समजावत.....

मैना!.... चल!... चल!!... आता कपाटात परत सामान लाव बरं व्यवस्थित!...


हो आईसाहेब! लावते तुम्ही काळजी करु नका!...


आई साहेब!... मला पुढच्या महिन्यापासुन जरा पगार वाढवून द्या!.... नवरा फ़ार प्यायला लागलाय हो! ..मैना विनंती स्वरुप..


मैने!... नवरा पितो म्हणुन तुला पगार वाढवून पाहीजे?.... यांत कसले आले लॉजिक?.. मीराची शंका..


ताईसाहेब!... सगळे पैसे दारुत घालवतो असं!....घरात काय देत नाही हो!..


मैना!... तूझा पगार वाढवला तर तु घरातल्या गरजा पुर्ण करतेस म्हणुन.. तूझा नवरा आणखीन दारू घेईल!... शांता समजावत....

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक