सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग -९

सास बहु कथा


सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग -९


आई!.... काय करु उचकी जातच नाही!.....


अग!... मग पाणी पी!...

(हिच्या आईला पण सकाळपासुन दुसरे काम नसेल बहुतेक?... शांता मनातल्या मनात..)

आई!... किती वेळा पाणी पिऊ?..... कोयना धरणा पेक्षा जास्त पाणी झालय पोटात!....


ब्लॅकबेल्ट !....ठीक आहे!.. आता नको पिऊ पाणी!... नाहीतर पोटातल्या पोराला बुडवशील त्यां धरणात!..शांता गंमतीने...

ब्लॅकबेल्ट !.. मग साखर खा थोडीशी!...


आई!.... दोन तीन वेळा खाली... पण उचकी जातच नाही!..

आज ब्लॅकबेल्टची जिरवायची चांगली संधी आहे... शांता ने विचार केला.....


ब्लॅकबेल्ट !...एक उपाय आहे!... पण तुला नाही जमणार तो!... राहु दे!...


अस काय आई?.... उपाय तर सांगा आधी!....

नको!.... तुला नाहीच जमणार तो!... शांता जरा भाव खात..

आई!... मस्करी पुरे!... उपाय सांगा लवकर!.. उचकीला कंटाळलेली मीरा आतुरतेने म्हणाली..


ठीक आहे!... सांगते!.... उचकी आलेल्या माणसाचे दोन्ही कान जोरात पीळतात...... म्हणजे तो जोरात ओरडतो.... आणि त्याची उचकी निघुन जाते.... शांता आपल हसु लपवत म्हणाली.....


आई!..... हा कसला उपाय?... अस तर मी पहिल्यांदा ऐकलं... मीरा काळजी स्वरुपात.....


ब्लॅकबेल्ट !...बघ मी तुला आधिच संगितले होते ना!....तुला नाही जमणार म्हणून!... शांता पुन्हा..हसु.. लपवत


आई!.... पण तुम्ही कान पिळणार म्हणजे एडवांटेज घेणार हे नक्की!... मीराने शंका उपस्थित केली...


ठीक आहे!... ...मग तु स्वतः च्या हाताने पीळ!....पण जोरात हा!.... किंकाळी आली पाहीजे!.. शांता पुन्हा.....

आई!.... आईग!!.... मीरा स्वताचे कान पिळीत ओरडत. होती..... तीची ती अवस्था पाहुन मात्र शांताला आपले हसु आवरत नव्हते.....

काही वेळाने... शांताने.. विचारले... गेली का ग उचकी?....


नाही ना!.... आई! दुसरा काहीतरी उपाय सांगा!..


अग! मग श्वास बंद कर!....


काय आई!.... अश्यान उचकी नाही.... पण मी नक्की जाईन!..


ब्लॅकबेल्ट !...श्वास बंद कर म्हणजे थोडावेळ बंद कर!... कायमचा नाही!...


इतक्यात शांता ....मीराच्या पायाकडे पाहुन ओरडली....


साप!.... साप!!....ब्लॅकबेल्ट ! तूझ्या पायाजवळ साप आहे!....


साप हा शब्द ऐकताच मीरा घाबरली व टुणकन उडी मारून शांताच्या कडेवर बसली.......


औ!..... माझ कूकूल बाळ ते!....कडेवर बसलेल्या मीराचा शांता गाल खेचत गंमतीत म्हणाली.....


आई!.... हळू ना!..... किती जोरात खेचला माझा गाल?.... आणि साप कुठे आहे?.. मीरा रागात....


ब्लॅकबेल्ट! .अग!...साप वैगरे काही नाही.... तुझी उचकी जावी यासाठी गुप्त योजना होती ती माझी!... शांता विजयी मुद्रेत....


आई! किती घाबरले मी!..... अस करते का कोणी?... आणि काय तर गुप्त योजना म्हणे!


ब्लॅकबेल्ट !....अग!... उचकी आल्यावर अस अचानक घाबरवले की उचकी जाते अस म्हणतात...

म्हणून मी हे सगळं केले...आणि माझी ही गुप्त योजना सफल झाली की नाही?... घालवली ना तुझी उचकी?..... शांता पुन्हा विजयी......


आई! ...बाकी थँक्यू.. हा! माझी उचकी खरंच गेली.....पण या पुढे तुमच्या गुप्त योजना मला पण सांगत जा!..... नाहीतर माझा हार्ट फेल कराल एखाद दिवस!.... मीरा तक्रार ..स्वरुपात....


आई!.... नशीब उचकी गेली... नाहीतर मी कधीपासून अगदी हैराण झाले होते .....


ब्लॅकबेल्ट!....मला वाटते तुझी आई आठवण काढत असेल बहुतेक?...... की तु... मला कसा कसा त्रास देत असेल ते! ....


आई!.... मी तुम्हांला कधी त्रास दिला?..... आणि आपल्या दोघींमधे माझ्या आईला का खेचता?...मीरा जरा रागात.... ..


ब्लॅकबेल्ट !...तूझ्या आईला खेचायला त्या काय...... रबर आहेत का?.... आणि मी काय वाईट बोलले ?.... अग!.... तुझी आठवण काढत असतील अस म्हणाले मी.... शांता . समजवत....


ओके!... ओके!!...


क्रमशः