सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग ४
सोसायटीत बेस्ट सासु- सुन... जोडीची स्पर्धा झाल्या पासुन... थोडाफार का होईना पण.... फरक मात्र प्रत्येक घरात दिसत होता...
आई! आज जरा मळमळतय !...मीरा काहीश्या काळजीत बोलली.....
ब्लॅकबेल्ट !....खा! अजुन!.... पचत नाही तर खायचेच कश्याला?....
आई!.... तसं नाही जरा वेगळेच वाटतेय!.....वॉमेंट होईल अस वाटते पण होत नाही! अस सांगुन मीराने तोंडाला पकडून बाथरूम कडे धाव घेतली.....
तशी शांताही तिच्या मागे गेली....तीची ती अवस्था पाहुन... शांता समजली... मीराला ती तडक डॉक्टर कडे घेऊन गेली...... डॉक्टारांनी मीराला तपासले व टेस्ट करून ती आनंदाची बातमी सांगीतली
मीरा आई होणार आहे!.....
बातमी समजताच शांताला फ़ार फ़ार आनंद झाला....
ब्लॅकबेल्ट !....तु आई होणार आहेस!.... अस सांगुन तिने मीराच्या डोक्यावर हात फिरवला....
रात्री जेवणाच्या टेबलवर शांताने ही आनंदाची बातमी सांगीतली.... तसा समीर आणि बाबांनां देखिल परमानंद झाला.....
काय ग आई!.... हसायला काय झाल?....बाजुला काहीशा चोरून हसणाऱ्या शांताला समीरने विचारले....
काही नाही रे!..... असच काहीतरी आठवले..... शांता हसत हसत म्हणाली....
अग आई!.... आम्हालाही सांग म्हणजे आम्ही देखिल हसु!.... समीरने काहीश्या उत्सुकतेने विचारले.....
काही नाही!....... या ब्लॅकबेल्टचे पोट मोठे झाले तर तो बेल्ट ही बांधील कुठे ?
शांताच्या या विनोदावर मीरा सोडून सगळे हासले....
आई!..... बेल्ट कमरेला बांधतात.... पोटाला नाही.... समजल?.... मीरा काहीश्या रागात म्हणाली...
आई!.... आज ना मला चायनीज खायला वाटेतेय!
चायनीज?....... ए! ब्लॅकबेल्ट!.....जुन्या सवयीची डोहाळेच्या नावावर पावती फाडू नको!.... समजले?...
अग!... बायकांना या अवस्थेत चिंचा... बोर... अस खायला वाटते!....आणि तुला चायनीज खायला वाटते?.... नको! नको!!... त्यांत हाजीनामोटो असते.... त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो!... शांता काळजी स्वरुपात...
अग! आई!... झाला तर माझ्या मेंदूवर होईल... त्यांत तुम्हांला काय?......मीरा बेफिकीर पणे..
अग!....ब्लॅकबेल्ट !...त्यासाठी तर मी आनंदाने आणून दिल असत.... पण मी तूझ्या मेंदू बद्दल नाही तर तूझ्या पोटातल्या बाळाच्या मेंदूविषयी म्हणतेय समजले?.... तसही तुला मेंदू आहे की नाही हा एक शोधाचा विषय आहे म्हणा!... शांता मीराला काहीशी चिडवत...
आई!... पण मला खरंच इच्छा झालीय चायनीज खायची!...
ब्लॅकबेल्ट ! संगितले ना एकदा!...नाही म्हणुन!
अग ते चायनीज खाशील तर....होणार बाळ... ओव्या!...... ओव्या!!..... अस रडणार नाही......तर चुई sss चुई sss. अस रडेल समजल?....
तुला चायनीजच खायचे आहे ना?..... मग मी तुला दोन मिनिटात मॅगी बनवून देते.....तिचा चेहरा आणि वास.. त्या चायनीज सारखाच असतो!....चालेल ना?...
हो! ...आई!.....तुम्ही बनवताय तर चालेल!...मीरा आनंदाने म्हणाली...
आणि हो! ब्लॅक बेल्ट !...या अवस्थेत काय हवं ते सांगत जा!... मी देईन बनवून... माझी मुलगी असती तर!... तिलाही.... शांता काहीशी भाऊक होत...
आई!.... मी तुमची मुलगीच आहे की!... मीराही काहीशी भाऊक.. होत... ....
क्रमशः