सासूबाई ची लाडकी सुन

Mother in law is very delicate relation in case of handling situation...

सासूबाई ची लाडकी सून....

वच्छला बाई ला दोन सूना समीरा अन् राधा..समीरा मोठी तर राधा लहान सून,,पण दोन्ही सूनामधून वच्छ्ला बाई ची लाडकी सून म्हणजेच राधा....

समीरा चे लग्न होऊन किमान सात वर्षे झाली होती ,आणि तिला एक मुलगा व एक मुलगी होती...समीरा वर्किंग वूमन असल्यामुळे घरी जास्त वेळ देऊ शकत नव्हती,याउलट राधा च्या लग्नाला तीन वर्षे झाली असून सध्या तिला अपत्य नव्हते,शिवाय ती दिवसभर घरीच राहायची...

त्यामुळे घरची काम राधा ला करावी लागत असे,आणि सासूबाईंना काय हवे काय नाही हे पण ती न चुकता बघायची,म्हणूनच सासूबाईंना राधाचं जवळची...

समीरा जरी घरात जास्त वेळ देऊ शकत नव्हती तरीपण ती घरातील सर्वांचा विचार करायची,कितीही व्यस्त असली तरी देखील स्वताच्या वाटणीचे संपूर्ण काम करत होती,सकाळी लवकर उठून स्वतःचा,पतीचा,मुलांचा डबा करायची,,मुलांना शाळेत जाण्याकरिता तयार करायची,,लगेच सर्वांचे कपडे धुवून टाकायची,,जे काम तिच्या वेळेपर्यंत हातात येईल ते ती करायची...

जरी जॉब करत असली तरीदेखील दोनी मुलांचा घरीच अभ्यास घ्यायची,त्यांच्या सोबत वेळ घालवायची,,यात तिला कधी पतीची साथ मिळायची तर कधी नाही,पण ती स्वतःच सर्व पार पडण्याचा प्रयत्न सतत करत होती....

कदाचित समिराचे सासूबाई कडे दुर्लक्ष होत असेल पण तिला सर्व बघण्यात वेळ कसा निघून जातो हे ही कळत नव्हते...याउलट राधा रिकामीच राहत असे,घरातील कामे आवरली की ती दुपारी निवांत बसून टीव्ही पाहत असे आणि मग मध्येच सासूबाईंना चहा पाणी विचारायची....थोडक्यात काय तर राधा सासूबाईंना नेहमी विचारात असल्यामुळे सासूबाई राधाचे गुण गात होत्या...अन् समीरा वेळ न देऊ शकत असल्यामुळे तिला बर. पाहत नव्हत्या...

रविवारी समीरा सासूबाईंच्या आवडीचा पदार्थ  करायची पण काहीही केले तरी सासूबाई च्या नाकावरचा राग काही जात नव्हता,समीरा कितीही चांगली वागली तरी तिच्या विषयी सासूबाई चांगलं बोलतच नव्हत्या...

राधा राधा करत त्या थांबत नव्हत्या,अन् जर समोर समीरा असली की मुद्दाम च राधा राधा करायच्या,,राधा कशीही वागली तरी देखील तीच चांगली अन् समीरा वाईट ही संकल्पना त्यांनी डोक्यात फिट केली होती,समीरा ला मात्र खूप वाईट वाटत असे,,मी काय करू म्हणजे सासूबाई चा राग जाईल हा च विचार ती करत होती...

बरेचदा समीरा ने सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकले होते की नोकरी करून काय फायदा जर पैसा माझ्या हातात नाही तर....समीरा ला कळले होते की सासूबाईंना पगार त्यांच्या हातात हवा...पण मुलाचा पगार त्या जवळ घेत होत्या त्यामुळे समीरा स्वतःचा पगार स्वतः जवळ ठेवायची....

समीरा थोडी कंजूस होती तर राधा खरचाळू होती,,समीरा काही पैसा मुलांच्या भविष्य साठी जमा करत होती...त्यामुळे जास्त पैसा तिच्या कडे राहत नव्हता तर राधा चा पती चांगल्या जॉब वर होता आणि त्याचा पैसा राधा स्वताच्या मेकअप मध्ये जास्त उडवायची....

एक दिवस वच्छाला बाई काही कामानिमित्त बाहेरगावी जात होत्या,बस मध्ये त्यांना त्यांच्या नातवाच्या शिक्षिका मिळाल्या...त्या टीचर दोणी नातवाचे भरभरून कौतुक करत होत्या,,वारंवार सांगत होत्या की दोन्ही मुलं खूपच गुणी आणि हुशार आहेत... वाच्छला बाईंना ऐकुन खूप आनंद झाला व मनात त्यांनी सामिराचे कौतुक केले ...घरी फार काळ नसून दोन्ही मुलांना चांगले संस्कार लावले....

खरोखर समीरा एक चांगली आई आहे...ती केवळ चांगली आई नाही तर चांगली पत्नी,सून देखील आहे हे मनोमन सासूबाई ने समजले पण तोंडावर काही येत नव्हते...राधा आणि समीरा या दोघींची जर तुलना केली तर समीरा च राधा पेक्षा सर्व कामात निपुण होती...हे सासूबाईंना कळले होते...पण तरीदेखील त्यांचा अहम् पणा काही समीरा सोबत चांगला वागू देत नव्हता....

एके दिवशी सासूबाईंना अचानक चक्कर आली आणि त्या तिथे बाजूलाच असलेल्या टेबल वर आदळल्या....त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला होता,त्यातून रक्त वाहत होते... राधाचं लक्ष जाताच तिने सासूबाई ना उठविण्याचा खूप प्रयत्न केला पण सासूबाई काहीच बोलत नव्हती..शेवटी तिने तिच्या पतीला सांगितले व लागलीच सर्वांनी मिळून  इस्पितळात दाखल केले...काही केल्या त्या शुध्दीवर येत नव्हत्या,...डॉक्टरांनी सांगितले की अती रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या शुध्दीवर येत नाही...लवकरात लवकर त्यांना रक्ताची गरज आहे,,सर्वांच्या रक्ताची तपासणी झाली,त्यात फक्त समीरा चे रक्त सासूबाईंच्या रक्ता सोबत मॅच झाले...

समीरा ने एका क्षणाचा विलंब न करता तबोडतोब होकार देत रक्त दिले...काही वेळानंतर सासूबाई शुध्दीवर आल्या,त्यांनी फक्त समीरा कुठे आहे हे विचारले...समीरा समोर आली,...सासूबाई म्हणाल्या ,समीरा हे युग खूप धावपळीचे आहे अन् यात माझ्या सारख्या आईंची गरज नसून तुझ्या सारख्या आइंची गरज आहे...पोरी मी तुला नोकरी वरून नेहमी बोलत होते,मला तुझी नोकरी खुपत होती,सूनांनी कशाला करायची नोकरी असे मला कायम वाटायचे...पण तू प्रत्येक गोष्ट अगदी सहज शक्य करत होती...खरंच या काळात तुझ्या सारख्या स्वावलंबी स्त्रियांची फार गरज आहे...

सासूबाईंनी केलेली प्रशांशा ऐकुन समिराच्या डोळ्यात अश्रू आले,तिने मनातून सासूबाईंना मिठी मारली,व सर्व तुमचेच संस्कार म्हणत ..एक गोड स्मित हास्य दिले...राधा ही समिराकडून आता बरेच शिकले होती,...कधी कधी राधा खाण्याचे पदार्थ समीरा ला शिकवीत होती,तर कधी कधी समीरा राधा ला व्यावहारिक पातळीवर ज्ञान देत होती...दोघीही एकमेकींना समजून घेत होत्या.....

सासूबाईंना बऱ्या झाल्या नंतर कळले की त्यांना जे रक्त पुरविल्या गेले होते ते समीरा चे होते...त्या आता खूप बदलल्या होत्या..दोन्ही सूनांसोबत सारख्या वागायच्या...दोन्ही सूना माझ्या लाडाच्या असे म्हणत त्या दमत नव्हत्या...

                       **   समाप्त **

Ashwini Galwe Pund...