
दहा दिवस सरले होते लताची सासु जाऊन.. भावकितले लोकं तिच्या घरात जमली होती काही कार्य बाकी होते. लता तिच्या सासूच्या आठवणीत दुःखी होती.तिचे आणि सासूचे नाते छानच होते .अनेक आठवणींना ती मनातल्या मनात आठवून रडतही होती.
ती मंडळी असे वागत होते जणू काही सहलीसाठी आले आहे.मोठमोठ्याने हसन खिदळणे चालू होते.गप्पा ,गोष्टी ,खानपान सर्वच मजेत चालू होते.लताला ती गोष्ट खटकली दहा दिवसापूर्वी असे झाले आणि हे लोक असे कसे वागू शकतात. जणू काही काहीच झाले नाही.हे लोक इतके भावनाशून्य कसे होऊ शकतात.. ??
तोच तिच्या चुलत सासूने आवाज दिला..लता अगं आज मस्त गरम कांदे भजी बनव गं .लताने होकारार्थक मान हलवली.ती भजीची तयारी करू लागली.कांदे घेतले आणि चिरु लागली..तिच्या सासूला कांदे भजी खूप आवडायची ,कधी भजी केली की सासू आवडीने खात.लता सासूसाठी रडू लागली..ते पाहून तिची चुलत सासू आली ,सासूसाठी रडते आहे म्हणून सर्वासमोर तिलाच दमदाटी देऊ लागली..लता तरीही रडतच होती...लताला भानच राहिले नाही..त्याच्यात तिच्या हाताला सूरी लागली रक्त वाहू लागले..
लताचा नवरा मनोहर आला आणि त्याने मलम पट्टी केली.रात्री सगळे झोपी गेले.लताला झोपच न्हवती येत.सासूच्या अनेक गोष्टी आठवत होत्या.तोच तिला चुलत सासू आणि तिची जाव प्रमिला बोलतानाचा आवाज आला...प्रमिला नेहमी लताला हिनवत असे,लता दिसायला सुंदर होती आणि प्रमिला लतासमोर फिक्की दिसत असे.प्रमिला लताच्या माहेरकडच्यांचा पण सतत अपमान करत असे,नेहमीच तिला टोचून बोलत असे..लता वादविवाद नको म्हणून दुर्लक्ष करत.आणि त्यात ती चुलत सासूही प्रमिलाला भडकवत राहायची .त्या दोघींची युतीच होती..लताला ह्या गोष्टी आवडत न्हवत्या.
जुने किस्से लताला आठवू लागले.. नवीन लग्न झाले तेव्हा लताला चुलत सासू विषयी खूप आदर होता कारण ती खूप आपलेपणा दाखवायची पण हळुहळू हळुहळू लताच्या लक्षात आले की,ती फक्त मुखवटा धारण करते..लताच्या जावेची म्हणजे प्रमिलाची माहेरची परिस्तिथी बेताची होती.चुलत सासू लताला मुद्दामून तीच्याविषयी सांगत.. अगदी तिची लायकी काढत पण लताला ह्या गोष्टी खटकायच्या.. ती नेहमी कानाडोळा करत.. पण प्रमिला मात्र लताविषयी जे काही चुलत सासू सांगत ते मुद्दामून लताला मसाला लाऊन सांगायची..आणि तिच्यावर हसायची.. प्रमिलाला वाटायचे की ती सासू तिला खूप इज्जत देते पण तसे मुळीच न्हवते. ती प्रमिलापाठी तिच्यावर हसायची, तिची खिल्ली उडवायची ..लताला तिचा ढोंगीपणा कळला होता .तिच्या सांगण्यावरून प्रमिला लताला फक्त हिनवत असे..लताच्या लक्षात आले होते की, ती चुलत सासू फक्त भांडण लावायचे काम करत आहे..लताने तिच्यापासून लांब राहणे पसंत केले.कारण त्यांच्या सोबत राहिले की ,ती सतत नकारात्मकच बोलत रहायची.
लताने स्वतःचे विश्व तयार केले तिने.पण तिची जाउ,चुलत सासू मात्र तिचा पाठलाग सोडत न्हवती.सतत लताला चुलती तुझ्याविषयी असे बोलते, तसे बोलते असेच सांगायची.सतत तिच्या जवळ येऊन असेच काही तरी सांगायची ज्याने लताला त्रास होईल.लताचा नवरा मनोहर तीला नेहमी साथ द्यायचा..लता संसारीक होती तिच्या छोट्याश्या संसारात सुखी.दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे किंवा दुसऱ्याची धुणी धुवायला तिला अजिबात आवडत नसे.त्यामुळे त्या दोघां नवरा बायकोचे छान पटत पण तोही त्रास ह्या चुलत सासूला,प्रमिलाला व्हायचा.मुळात लता अंतर ठेवून राहात होती तरीही त्या लताच्या आयुष्यात नाक खुपसायचे.
सासूच्या ह्या कार्यासाठी सर्व जमले होते पण अश्या प्रसंगीही ती सासू मात्र उचापत्या करणे थांबवू शकत न्हवती.त्यातही ती उगाच काहीबाही बोलून नको ते काम करत होती..तिच्या सख्या सासूने एकदा लताला सांगितले होते की,ही चुलत सासू काही बरोबर नाही,अंतर ठेवून राहा..तेव्हा मात्र लताने त्या गोष्टीचा काही विचार केला नाही पण नंतर मात्र लतासमोर सर्व काही आले..सासूचे म्हणने बरोबर होते.आपली सासू तिच्यापासून का लांब राहायची ह्याचे करण तिला कळले होते..लता स्वतःला दोष देऊ लागली.जी बाई घरात खोटे बोलून भांडण लावते,चहाडी करते अश्या बाईला आपण सन्मान देत गेलो आणि ती फक्त राजकारण करून आपल्याला त्रास देत गेली...संसारात विष कालवत राहिली
आता मात्र लता कठोर झाली होती.तिने मनोमन निश्चय केला..सकाळ झाली .सगळे निवांत झोपले होते.तोच तिच्या सासूने तिला आवाज दिला आणि ऑर्डर सोडली लता आज मस्त चिकन बिर्याणी कर ...हे ऐकताच लता स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली"सासूबाई माफ करा ,मी काही चिकन बिर्याणी करणार नाही, जे मी बनवेल ते खावं लागेल..माझ्या सासूला जाऊन दहा दिवसच झाले आहे त्यामुळे माझी इच्छा नाही काही करायची. आणि तसही बरं नाही वाटत.माझ्या मनाला नाही पटत...
मनोहरने ऐकले ते,त्यालाही लताचा अभिमान वाटला..तसा तोही दुखात होता पण आईसाठी बायकोच्या भावना सुखावून गेल्या..
हो ला हो करणारी लता पहिल्यांदा नाही म्हणाली...तिच्या सासूचा चेहरा उतरला..ती रागात निघून जाऊ लागली.तिला तिचा अपमान झाल्यासारखा वाटला.ती लताकडे पाहू लागली ,तिला वाटलं लता तिला थांबवेल पण तसे झाले नाही.उलट लता म्हणाली थांबा सासूबाई मी तुमच्यासाठी कॅब बुक केली आहे..ट्रेनने तुमची दगदग होईल...
ती मान खाली घालून निघून गेली..लता सासूच्या फोटोकडे पाहू लागली ..आणि म्हणाली "आई मी तुम्हाला न्याय दिला,आजवर तुम्ही सर्व दुर्लक्ष केले म्हणून ह्यांचा अन्याय वाढला.पण आता नाही जिवंतपणी ह्यांनी तुम्हाला सुख नाही दिले पण आता मात्र मी ह्यांच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घालणार नाही"...
तोच प्रमिला आली आणि लताला बोलू लागली"काय गं कोणी असे वागते का आपल्या घरी आलेल्याशी...?रडत होत्या सासूबाई.. मला फोन केला...
लताने तिला मध्येच थांबवलं म्हणाली"मलाही माणसं ओळखायला येतात,कोणाशी कसं वागायचे हे मला माहीत आहे"..तूूम्ही नका सांगू
तीने सासुचा फोटो पुसला आणि उराशी कवटाळला..
पुन्हा तिला हुंदका अनावर झाला.मनोहरकडे जाऊन तिने स्वतःचे मन मोकळे केेले.
कशी वाटली कथा ?नक्की अभिप्राय द्या.. लेख आवडल्यास लाईक,शेअर जरूर करा.लेख आवडल्यास जरूर मला फॉलो करा..
©®अश्विनी कुणाल ओगले.