कथेचे नाव :- सासूबाई असावी पण?
विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
*********************************
विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
*********************************
क्लास सुटायला अजून वेळ होता म्हणून प्राजक्ता तिथेच थोडा वेळ थांबली आणि म्हणाली..." अगं डोक्यात राग नको घालू."
" राग घालू नाहीतर काय? आज मला फक्त मुलाला आणायला बाई नाही म्हणून सुटी घेऊन घरी राहावं लागलं , ह्या नसत्या जाऊ शकल्या का? पण नाही ती माझी मुलं आहेत.त्यांना साधी आंघोळ सुद्धा घालत नाही त्या.ज्या ज्या दिवशी बाई नसेल त्या दिवशी त्याची ट्युशन पण बुडते.. नाही पाठवत त्या त्याला."
" अगं त्यांच्याशी बोलून बघ ना..त्यांना काय प्रोब्लेम आहे ते विचार त्यांना."
" त्यांचे यावर एवढेच म्हणणे आहे, तू सून आहेस .. घराची मालकीण होऊ नकोस. नसेल जमत तर खुशाल नोकरी सोड आणि सांभाळ लेकरांना. मी काही तुझ्या लेकरांना सांभाळण्यात माझे आयुष्याचे क्षण घालवणार नाही."
तेवढ्यात प्रियंकाचा मुलगा बाहेर आला.
" बरचं काही बोलायचं होतं ...पण मुलांसमोर नको वाटतं.आपण घरच्या लोकांना कितीही आपलं मानलं तरी त्याला काहीच महत्त्व नाही गं , ते आपल्याला किती आपलं मानतात त्याला महत्व आहे."
प्राजक्ताच्या डोक्यात अनेक प्रश्न घोळत होते आणि उत्तर शोधण्यात गुंग झाली.
तिचा फोन वाजत होता याकडेही तिचे लक्ष नव्हते.
"प्राजक्ता, अगं फोन वाजतोय..कुठे हरवली???"
"प्राजक्ता, अगं फोन वाजतोय..कुठे हरवली???"
"अहह, हो..राघवचा आहे मला निघायला हवं.हे बघ नेक्स्ट संडे आपल्याला भेटायचं आहे."
"हो नक्की."
"आता खरच निघते मी...चल बाय."
"बाय."
"बाय."
ठरल्या प्रमाणे सगळया जणी यायला तयार झाल्या.
या वेळी मात्र प्राजक्ताच्या घरी भेटायचे ठरवले कारण तिचा नवरा काही दिवसांसाठी बाहेर गावी गेला.
प्राजक्ताने सकाळीच मस्त नाष्टा बनवून ठेवला आणि एक एक करून सगळ्या मैत्रिणी आल्या.सुरुवातीला सौदामिनी मग प्रियांका मग अनुराधा आणि शेवटी अंजली आली.
गप्पांना चांगलाच उत आला. एकमेकांचे सुखदुःख वाटल्या गेले. कधी कुणी रडून सांगितले तर कधी कुणी घरातले विनोदी किस्से सांगितले.
"अंजली, अगं तुझ्या घरात पण सासू आहे ना मग तुझं पटत का गं? "
"प्रियंका.... अगं सासू आहे नावाला फक्त सुरुवातीला त्यांनी मला खूप त्रास दिला. म्हणजे मी त्या घरात सून म्हणून नाही तर नोकर आहे असंच वाटलं मला. अगदी प्रत्येक गोष्टीला नियम. एवढ्या वाजता हे व्हायला पाहिजे, ह्या वेळेला ते व्हायला पाहिजे.स्वतः मात्र सगळ्याच बाबतीत लेट."
अनु मध्येच बोलली,
" मग तुला त्रास नाही झाला का या गोष्टीचा?"
" झाला ना!!! बऱ्याच वेळा आईला सांगितलं.तर ती म्हटली आता ते तुलाच हॅण्डल करावं लागेल. यात आम्ही काहीही करू शकणार नाही.तुझं घर आहे तू सांभाळ. पण मी ना पाहिजे त्या वेळेस बोलून दाखवलं.नाही बोलल़ ना तर त्यांना अस वाटते आपल्याला काही कळत नाही. काही गोष्टी बोलून दाखवणं गरजेचं असतं.मी हे म्हणत नाही की त्यांचा अपमान करा पण आपला अपमान होऊ नये याची काळजी आपणच घ्यायची."
अनुने सर्वांकडे बघितलं आणि बोलली,..
."अंजली अगं आता कळतेय मला पण आता काही फायदा नाही.मनात नेहमी एकच विचार येतो की खरंच सासू असावी की नाही???"
अंजली यावर म्हणाली,...
" हे बघ यावर एकच उत्तर असावी पण तिने सुनेला त्या घरात तिची जागा करून द्यावी. सासू आपल्याला नेहमी परक समजते मात्र आपण घरचं सगळं आपलं म्हणून करावं अशी अपेक्षा असते."
"बरोबर....पण ती जागा नाही दिली तर ती मिळवायची आपण. कधी कधी प्रेमाने नसेल जमत तर जशास तसे वागलं पाहिजे.मी म्हणत नाही की तुम्ही उद्ध्टपणे वागा. मात्र पाहिजे त्या ठिकाणी बोलला तरच समोरचा त्याची पायरी ओळखून बोलतो आणि आपल्याला मनस्थाप पण कमी होतो.मग ते नाते कुठलही असो."
" हो अगं फक्त नवरा चांगला असून उपयोग नाही कारण घरात बाकी मंडळी पण आपल्याला जीव लावणारी हवी, समजून घेणारी हवी."
" हो ना... बघ अनु, आपली सासू अशी असली तरी सौदामिनीची सासू किती चांगली आहे.... तिचा आधार बनली. तिच्या पाठीशी खंबीर उभी आहे. यात कुणी असंही म्हणेल आपण चागलं वागलं की सासू आपोआप चांगली वागेल."
" नाही गं.... सुरुवात त्यांच्या पासून होते त्यांनी आपलं मानलं तर सगळं काही सुरळीत होईल पण त्यांना सूना म्हणजे नेहमी परक्या वाटतात मग सूना कश्या त्यांना आपल्या मानतील."
"जाऊ द्या हा विषय.. आता सोडून द्या. आपण आपले सुखदुःख वाटून घ्यायला भेटलो, आता जरा धिंगाणा घालू, लहानपणी घालायचो अगदी तसा."
"हो ना.."
एकमेकींच्या किती साऱ्या गोष्टी मनात होत्या त्या सर्व त्यांनी शेअर केल्या. काही गोष्टी अश्या होत्या की सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुटले तर काही गोष्टी अश्या होत्या की डोळ्यांनी अश्रूंची वाट मोकळी करून दिली.
लहानपणापासून एकत्र खेळल्या, सोबत राहिल्या आणि एवढ्या दिवसानंतर एकत्र आल्या त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.
लहानपणापासून एकत्र खेळल्या, सोबत राहिल्या आणि एवढ्या दिवसानंतर एकत्र आल्या त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.
गप्पा गोष्टी झाल्या, एकमेकींच्या आधार बनल्या तर कुठे एकमेकींना पाठिंबा दिला. एकमेकांचे सात्वन करत नव्याने लढण्याची ताकद दिली.
\"खरंच आहे ना, सासू सूना हा विषय सोडून बाकी बरेच विषय आहेत. पण संसारात भांडणाची खरी सुरुवात या दोघींचा वाद. पण एक लक्षात घ्या या वादापेक्षा जर त्या दोघींमध्ये संवाद झाला तर किती बरे होईल ना!!! सासूबाईंनी सुनेचे काही चुकत असेल तर गावभर सांगत फिरल्यापेक्षा तिच्या चुका तिच्या जवळ सांगितल्या तर परत तिच्या हातून ती चूक होणार नाही. आणि कधी सासू रागावली तर सुनेने सासूला आई म्हणून सगळं एकून घेतले तर वाद होणार नाही. म्हणजे या नात्यात महत्वाचा आहे तो केवळ संवाद.
समाप्त....
©®कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे
©®कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा