सासूबाई असावी पण?( भाग ४)

पाहिजे त्या वेळी बोलणं गरजेचं असत...

कथेचे नाव :- सासूबाई असावी पण?
विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
*********************************


आज प्राजक्ताच ऑफिस लवकरच सुटलं तिला प्रियंकाच्या घराकडे काम होतं म्हणून ती काम आटोपून  प्रियंकाकडे निघून गेली.

प्राजक्ताने  दरवाजा वाजवला, प्रियंकाच्या मुलीने दरवाजा उघडला.

" मावशी!!! ...ये ना आत."

प्राजक्ताच्या  कानावर भांडणाचा आवाज पडला. बहुतेक प्रियंका आणि  तिच्या सासूबाई असाव्या असा प्राजक्ताला अंदाज आला..

" निरजा ,आज तू घरी कशी बाळा?"


" मावशी अगं मी आताच आले. कपडे बदलून घेतले आणि आई जेवायला देईल याची वाट बघितली."

" का! आईने नाही दिलं का जेवण?"

" अगं मी आईला जेवण वाढ म्हटले त्यावरून भांडण सुरू झालं."

" काय?"

" आजी आईला म्हटली आता निरीजाला वाढू नको, हाताने घेऊ दे तिला..पण माझा हात नव्हता  पुरत आणि अगं  मी खूप थकून गेली होती. तरीही आई उठली वाढायला  तर आजीने भांडायला सुरुवात केली. म्हटली...तू तिचे लाड नको करू नाहीतर वाया  जाईल तुझ्यासारखी.मग आईने पण बोलायला सुरुवात केली."

" बरं बरं जा तू आत..."

" मावशी, अगं आईला सांगते ना तू आली म्हणून."

" बरं जा.."

नीरजा आत गेली आणि तिने सांगितलं मावशी आली.

" हो, बाळा...जा मावशीला पाणी दे मी आलेच बाहेर."

" हो... जा आता घरची काम तशीच ठेवा आणि बसा गप्पा मारत." सासूबाईंनी टोमणा मारला.

हे वाक्य प्राजक्ताला सुद्धा  ऐकू गेलं..


प्रियंका बाहेर आली. निरजाने पाणी आणलं आणि प्राजक्ताला दिलं.

"अगं कधी आलीस? फोन करायचा ना.."


" अगं...मी कॉल केला मग कट केला,आले मी थेट इकडे . अगं ते अनुचा खूप मोठा प्रोब्लेम झाला."

" अगं हो ना... काल केला तिने मेसेज. बरं झालं सुटली एकदाची. नाही तर आमच्यासारखे उठता बसता भांडण. कंटाळा आलायं अगं खूप आता संसाराचा. सुटी असली की असं वाटते घर सोडून कुठेतरी जावं रहायला."

" अगं काय बोलतेस तू!"


" नाहीतर काय? तुझं मस्त आहे बाई तुम्ही दोघं आणि राघव. सासूबाई येतात अधून मधून. कामवाल्या मावशी येतात आणि  काम झालं की निघाल्या."

" अगं पण मला सारखं वाटतं माझ्या सासूबाई इथे राहायला हव्या पण त्यांना कोण समजवणार?.माझी खूप धावपळ होते."

तेवढ्यात सासूबाई आल्या.

"कशी आहेस प्राजक्ता?"

" काकू मी ठीक."

" प्रियंका गप्पा मारत बसशील तिच्याशी. चहा कर आणि जा मुलाला आणायला. आज बाईची सुटी आहे आणि मी अजिबात जाणार नाही."

प्रियंकाने प्राजक्ताकडे बघितलं आणि म्हणाली,

" प्राजक्ता, मी नीरजाला वाढते आणि चहा करते."

" अगं तू वाढ तिला आणि निघू उशीर होईल.मी चहा घेऊन आले."

" बरं आलेच."

प्रियंकाने निरीजाला वाढलं आणि दोघी  घराच्या बाहेर पडल्या.

" तुला सांगू का प्राजक्ता, अगं मला वैताग आला आहे, डोक खूपच ठणकायला लागलं."

" अगं तुझी सासू बरी..अनुच बघितलं ना काय हाल झाले."

" बरी???? कसली बरी???तुला माहित आहे काल काय झालं मी कामावरून आले, घरात काही भाजीला नव्हत म्हणून मी डाळ शिजायला टाकली. माझी  मीटिंग होती म्हणून उशीर झाला. मग भाजी घ्यायला वेळ मिळाला नाही."


" का सासूबाई नाही आणत का भाजी वैगरे? संध्याकाळी फिरायला जात असतील ना?"


" हो जातात ना, पण त्यांचं काम थोडीचं आहे ते...घरात त्यांचं काम फक्त देवपूजा ..बाकी जे काही करायचं ते आपण  करायचं."

" अगं  त्यांचं पण घर आहे ना ते."


" अगं काल हरभरा डाळ घेतली मी करायला.तर त्या देवघरातून ओरडल्या....
डाळीत खूप किडे झाले ती नको करू. दुसरं काहीतरी कर. मी कालच बघितलं खूप किडे आहेत. तुला काय फक्त नोकरी नोकरी आणि घरचं कुणी बघायचं गं?"


" मला त्यांचा खूप राग आला.एवढ्यावर नाही थांबल्या त्या."


" बिचारा माझा लेक राब राब राबतो..तू कर खराब सगळं....आहे तो आणायला, तुला काय पैशाची किंमत."

" मग भाऊजी ओरडले असतील."

" ते बोलायला पाहिजे म्हणून तर मोठ्याने ओरडल्या."


" तुला नसेल जमणार तर नोकरी सोड आणि बस घरात. थोड दोघांचं वाजलं आमचं मग एवढं बोलून ते शांत झाले"


"मी ही मग बोलायला सुरुवात केली. घर माझं एकटीच आहे का? जर काल किडे दिसले होते तर तुम्ही का नाही उन्हात ठेवली.सगळं मीच केलं पाहिजे असं कुठे लिहलं आहे का?"

" अगं पण अडचणीच्या वेळी तेवढी मदत केलीच पाहिजे ना सासूबाईंनी."

" अगं  त्या देवघरात बसतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. बिचारा देव कंटाळला असेल त्यांना पण त्या नाही कंटाळल्या. त्या दिवशी सगळं शांत झालं वातावरण लगेच."

" दुसऱ्या दिवशी मी घरचं सगळ आवरलं हे ऑफिसला निघून गेले आणि सासूबाईंनी शिव्या द्यायला सुरुवात केली."

" अगं पण का? आणि कशासाठी?

" आमच्या घरी भांडणाला काही कारण लागत नाही.मग मीही म्हटले तुम्ही काल बोलला नसता तर आमच्या दोघांमध्ये भांडण झालं नसतं."


" तर त्यांनी मला हातात जे भांड होतं ते फेकून मारलं आणि घराच्या बाहेर काढलं."

" मग तुझा नवरा काहीच बोलला नाही?"

"  तो घरी नव्हता , मी आले माहेरी निघून. नंतर आला होता  फोन.परत ये म्हणून."

" तू काय उत्तर दिले मग?"


" मी आले ग निघून सासरी. पण मग मी आता नाही एकून घेत."

" बर केलंस...तू जरा का होईना जरा धीट वागली नाहीतर  तर कदाचित तुझ्यावर सुद्धा अनु सारखी वेळ आलीच असती."

" हो त्यावेळी बोलून गेले, पण आता पश्चाताप होतोय.? मी एकटी काय करणार होते , माहेरी कुणी नाही..."


" अगं तू हा असा का विचार करतेस? अगं शाळेत कॉलेज मध्ये तू टॉपर होती. विद्यापीठांची आदर्श विद्यार्थिनी तू. एवढी का निराश होते."

" ते बरोबर आहे गं पण कधी कधी खूप त्रास होतो या सगळ्यांचा."


" हो .... होत असेल पण काही गोष्टी सोडून द्यायला शिक. चल दोन दिवसांनी भेटायचं आहे."

" हो...हो...भेटू चल बाय."

क्रमशः...



©®कल्पना सावळे
जिल्हा पुणे

🎭 Series Post

View all