सासुआई... भाग 3 अंतिम

Katha sasu sunechya natyachi

सासुआई... भाग 3

“सासुआई जरा दम घ्या, तुमची गीतांजली सुरू झाली.
चौघीही हसल्या.

सासुआई किती सहसपणे तुम्ही सगळं बोलून गेलात ना, मनातल्या सगळया भावनांना बाहेर काढलतं.

स्मिता आणि तिच्या सासूबाईने एकमेकीकडे बघितलं..
स्मिताच्या सासूचे डोळे भरून आले.

त्या उठून काहीही न बोलता निघून गेल्या..तिघीही त्यांच्याकडे बघत राहील्या.

“स्मिता राग आला का ग त्यांना?. सासुआईच बोलणं त्यांना आवडलं नाही बहूतेक..”

“मी बघते.” अस म्हणत स्मिता सासूच्या मागे मागे गेली.

स्मिता घाबरली, सासूबाईला राग आला असेल का, त्या माझ्यावर चिडतील का असे प्रश्न तिच्या मनात आले.

घरी गेल्यानंतर  काही वेळ दोघीही शांत होत्या, कुणीही काही बोललं नाही.

स्मिता तिच्या रूममध्ये गेली, स्मिताची भीती वाढली..
थोडयावेळाने स्मिताची सासू रूममध्ये  गेल्या.

“स्मिता अग मला माफ कर, मी तुझ्याशी  खुप चुकीची वागले, तुला खूप त्रास दिला, प्रत्येक वेळी तुला त्रास कसा होणार याचाच विचार करत राहिले..तुला नको नको ते बोलले..मला माफ कर बेटा”

स्मिताच्या सासूबाई स्मितासमोर  हात जोडून उभ्या राहिल्या, स्मिताला मात्र रडू आलं, ती लगेच त्यांना बिलगून रडायला लागली.

“आई माझ्याकडूनही चुका झाल्यात आई, तुम्ही मला माफ करा...आणि प्लिज तुम्ही माझी माफी मागू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, मी चुकल्यानंतर तुम्हाला मला रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे..”

“नाही बेटा..तू चुकलीस तरी मला तुला समजून घ्यायला हवं होतं”

दोघींनीही एकमेकींना माफी मागून एकमेकींशी प्रेमाने वागण्याचं प्रॉमिस केलं.

दुसऱ्या दिवशी स्मिताने गायत्रीला फोन केला
“हॅलो गायत्री थँक यु..थँक्स अ लॉट..तुझ्यामुळे मला सासरी माझं माहेर मिळालं..”

“स्मिता..अग किती आनंदात आहेस !”

“हो ग, तुझ्या सासूबाईला माझ्याकडून धन्यवाद सांग, आज त्यांच्यामुळे माझ्या सासू बदलल्या, त्यांनी मला यापुढे कोणताही त्रास होणार नाही असं सांगितलंय”

“चला म्हणजे सगळं छान झालं तर, काल त्या अश्या उठुन गेल्या मी तर घाबरलेच होते..”

“ठेवते मी, वन्स अगेन थँक्स”

गायत्रीने फोन ठेवला आणि सासुआईच्या रूममध्ये गेली
“सासुआई स्मिताचा फोन आला होता, तिच्या सासूबाई बदलल्या म्हणे."
“अरे वा..हे तर छानच आहे की..”
“सासुआई थँक यु...स्मिता खूप आनंदीत होती..दोघींनीही एकमेकांना आलिंगन घातलं.

स्मिताच्या घरचे इतर सदस्य पण स्मिताशी चांगलं वागायला लागले.

गायत्री आणि तिच्या सासुमध्ये खूप छान बॉंडिंग होत..

गायत्री जेव्हा लग्न होऊन आली, तेव्हाच सासूने सांगितलं होतं की  गायत्री हे घर तुझं आहे आणि या घरातील माणसे सुद्धा तुझीच आहेत, त्यांचा सगळ्यांचा सांभाळ कर, त्यांची मने प्रेमानी जिंक..सगळ्यांना आपलंसं कर, या घराला बांधून ठेव आणि हे सगळं करत असताना तुला काही अडचणी आल्याच तर तुझी ही सासू तुझी आई वेळप्रसंगी तुझी मैत्रीण बनून तुझी साथ देईल.

“मन मोठं असलं की सगळ काही सामावून घेता येते."

हे ऐकलं आणि गायत्री बिनधास्त झाली, आणि आता सासूची सासुआई कधी झाली आणि सुनेची लेक कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही.

तिच सासर तिच माहेर झालं , आता कौतुकाची थाप द्यायला तिला माहेरच्या  माणसांची गरज नाही.

दोघींमध्ये मैत्रीचं नात निर्माण झालं.

असच सुंदर नात जर प्रत्येक सासू-सूनेमध्ये तयार झालं, सगळीकडे आनंदच आनंद असेल.


समाप्त:
माझी लघुकथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका.. तुमचा एक लाईक लिहिण्यास प्रोत्साहन देते..
धन्यवाद

🎭 Series Post

View all