सासू-सून नातं...भाग 3
असंच घरातल्या इतर कामांच्या बाबतीत सुद्धा होत. मग होत काय कि घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात. हे तर एकच उदाहरण झाल एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी काम करून घेत असेल तर या सुनांना बरच होत. उलट सासूने एखाद दिवस काम नाही केल तर त्या चिडचिड करतात.
एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटत कि आपल्या सुनेने सुद्धा उपवास, व्रत वैकल्य करावे. आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली कि "मी नाही करणार हे उपवास वगैरे , माझा त्यावर विश्वास नाही"तर भांडण हमखास होतात.
दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी. म्हणजे काय तर "बदलांचा स्वीकार."
"सासूने जून सोडून द्याव सुनेने नवीन शिकव, इतकाच."
"थोड तुझ खर थोड माझ खर."
समजूतदारपणात दोघींनी दाखवावा.
एक एक पाउल पुढे याव आणि अहंकारात एक एक पाउल मागे जाव.
जश्या सुनांच्या सासू कडून, नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का?
त्यांना पण तर मोकळीक हवीच असेल ना. त्यांना पण तर वाटतच असेल न कि संसाराच्या या गाड्यातून निवृत्त व्हाव. थोडा आराम करावा. मग सुनांनी त्यांना ती मोकळीक दिली तर काय बिघडलं?
घरात मोठी माणस असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते.आणि कुटुंब बांधून राहते.
घरातली सून जितकी चुकते तितकीच सासू पण चुकते बर का.
काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही . सगळ आपल्याच पद्धतीने झाल पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. या साठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी यात त्यांना काही गैर वाटत नाही. यात त्या सासवांचा अहंकार आड येतो, मी सुनेच्या हातात सगळी सत्ता दिली तर ती मला विचारणार नाही, माझं काही अस्तित्वच राहणार नाही असं त्यांना वाटतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा