सासू सून नातं...भाग 2

Natyanchi gammat
सासू-सून नातं...भाग 2
         

बऱ्याचदा काय होत कि सासू ही दोन्ही घरी (माहेरी आणि सासरी) एकत्र  कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वाना सांभाळून घेणं आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय  त्यांना असते. त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या सुनेकडे असावा अशी त्यांची इच्छा असते. पण ते शक्य नसत. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र कुटुंबात राहायची इच्छा  नसते.  त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहाण कठीण जात आणि मग सासू-सुनांचे खटके उडायला सुरुवात होते.           


मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते कि आपली सासू कशी असेल. खर म्हणजे होत काय कि लग्ना आधी मुलीमुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते. त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते आणि नको ते फुकटचे उपदेश दुसऱ्या मुलींना देते. आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा नसतो कि एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल. सासू म्हणजे खाष्ट, कडक असा सगळ्यांचा समज असतो. सासूही प्रेमळ असतात..          


हि अशी भूत मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही. आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच. समजा सासू सुनेशी छान वागतेय सगळ सुरळीत चाललंय आणि एखाद दिवशी सासू काही कारणा  वरून सुनेला रागावली तर सून लगेच ती गोष्ट माहेरी सांगते. सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागावल्या हे आधी सांगेल.                  

काही - काही सुना तर इतक्या पुढच्या असतात न कि त्यांच्या बद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्या जवळ. एखाद्या सुनेला सासू समजा बोलली कि तू आज भाजीत मीठ जास्त घातलंय तर या सुना (सगळ्याच नाही म्हणत मी ) दुसऱ्या दिवशीपासून स्वयंपाक करणच सोडून देतात. आणि कारण विचारलच तर म्हणतात सासूबाईना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही. त्यांना कधी मीठ जास्त वाटतंय, तर कधी तिखट. अस असेल तर त्यांनी त्यांचं करावं असं बोलून मोकळ्या सुद्धा होतात.


क्रमशः

🎭 Series Post

View all