सासू सून नातं...भाग 4 अंतिम

Natyanchi Weglich gammat
सासू-सून नातं...भाग 4 अंतिम


अहो, काही काही सासवा तर हद्दच करतात. भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा सुनेचे गाऱ्हाणे करतात.

सगळीकडे स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते, माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा वेगवेगळ आहे पण मी सांभाळून घेतलं बाई, घ्यावचं लागलं.

अशावेळी सासूने सुनेला समजवायला हवं.
तिला शिकवायला हवं की

"सुनबाई आपल्या कडे अशी भाजी करत नाही, मी शिकवते तुला." सूनही खुश सासूही खुश.
ते राहत बाजूला, जेवायच्या वेळी मग कटकट करत बसतात.


ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्यामुळे आपणच थोड ऍडजस्ट केल तर काय बिघडलं.

एवढे वर्ष मुलगा आपल्याला साडी आणतच होताना , मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीच कौतुक करायचं सोडून उगीच टोमणे का मारायचे.

मुलाला त्याच आयुष्य बायकोसोबतच घालवायचं असतं त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही अस म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो.

उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्या कडे देऊन मोकळ व्हायचं.

"मला दोन वेळेच जेवण घाल म्हणजे झाल, मी मस्त आराम करेल." अस जर सासू म्हणाली तर सुनेलासुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा. तिला सुद्धा वाटेल कि हे घर आपल आहे. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सासू बद्दल आदर वाटेल सुनेला.

सासूने एक पाऊल पुढे आणलं आणि सुनेने त्यांना समजून घेतलं तर सासू सुनेचं नात्यात प्रेम निर्माण होईल, आणि नात अधिक घट्ट होईल.
घरातील लक्ष्मी आनंदात असेल तर संपूर्ण घर आनंदात असतं..

समाप्त:

🎭 Series Post

View all