Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सासू सून..भाग ३

Read Later
सासू सून..भाग ३


"थांब थांब..इथलाच पत्ता आहे."भैरव बोलला

"अरे पण हा तर वाडा आहे. च्यायला..ही लोक बाहेरून किती शरीफ आहेत दाखवतात आणि हे असले धंदे करतात! एवढा पैसा असून पण त्यांना हाव असतेच भें...डी. चल त्या शेठ ला फोन लावतो. माल घेऊन आलोय सांगतो." परश्या रुमाल खांद्यावर टाकत बोलला आणि कानाला फोन लावून बाजूला गेला.

"काय साली माणस असतात ना.. एवढा पैसा असून पण दोन नंबरचा धंदा करतात. पैसा गरिबाला मिळालं तर त्यांच्या आयुष्यात चार दिवस सुखाचे आणि दोन घास पोटभरीचे मिळतात ज्यात ते समाधानी राहतात आणि ही मोठी माणस..एवढा पैसा असून पण भिकारीच असतात. गॅरेज वाला बरोबर बोलला होता. आपल्याला तरी कुठे आहे हातातल्या लक्ष्मी ची किंमत. पण आजपासून त्याची पण किंमत करणार."भैरव स्वतःशीच पुटपुटला.

"ए कोण आहे रे...कोण आहे..भैरव..भैरव.." परश्या ओरडू लागला.

"ए परश्या...अरे कोण आहे.." भैरव ओरडू लागला.

झालेल्या गोंधळातून त्यांच्यावर तिसऱ्याच कोणीतरी घोंगडी टाकल्याचे एव्हाना दोघांच्याही लक्षात आले होते. दोघेही हात पाय मारून निसटण्याचा प्रयत्न करत होते पण अंगावर घोंगडी टाकून दोन्ही हातांना घट्ट पकडल्यामुळे हालचाल करता येत नव्हती. काही वेळातच दोघेही बेशुद्ध झाले. त्याही अवस्थेत त्यांना कुठे तरी फरफटत घेऊन जात असल्याचं त्यांना समजत होत, पण कुठे हे समजत नव्हत आणि काही करण्याइतकी शक्तीही उरली नव्हती.

"काय गोंधळ चालू आहे सकाळ सकाळ?" आरडा ओरड्याच्या आवाजाने सगळेच जागे होतात. मैथिली मात्र झोप मोड झाल्याने जास्तच चिडलेली असते.
वाड्याच्या बाहेर मोठा ट्रक बघून सगळेच विचार करत असतात कुणाचा ट्रक असेल हा.. तेवढयात सुनंदा ताई बाहेर येतात..

"माझ्या सांगण्यावरून ट्रक इकडे आलाय.. गड्याना सांगून त्यातल सामान उतरवून कॉटेज मधे ठेऊन घ्या. ज्यांना प्रश्न पडलेत त्यांना त्याची उत्तर वेळ आली की मिळतीलच. मैथिलीची प्रश्नार्थक नजर सुनंदा ताईंच्या नजरेतून सुटली नव्हती म्हणून त्या बोलल्या. तशी मैथिली ने इकडे तिकडे बघत नजर खाली केली.

"श्वेता.. स्नान संध्या आवरून ताबडतोब माझ्या खोलीत ये." करड्या आवाजात आदेश देत सुनंदा ताई निघून गेल्या. मैथिली श्वेता कडे रागीट कटाक्ष टाकत आपल्या खोलीत गेली आणि श्वेता तिच्या खोलीत.

"आईच्या डोक्यात कधी काय येत ना हे समजतच नाही. घरात एवढं सामान असताना हे सामान कुठून आणि का आणल आहे काय माहीत. काय तर म्हणे कॉटेज मधे ठेऊन घ्या."झोपमोड झालेला विशाल बडबड करत पुन्हा अंगावर ब्लँकेट ओढून झोपला.

आईंनी आता खोलीत कशाला बोलावलं असेल? आणि एवढं सामान असताना आणखी सामान कशासाठी मागवल असेल? विचार करत आणि स्वतःशीच पुटपुटत श्वेता आंघोळीला गेली.

इकडे मैथिलीचा तिळपापड होत होता. सासूचं वागणं तिच्या काही पचनी पडत नव्हत.
"मोठी सून असूनही मला काहीच माहीत नसत आणि सांगावं वाटत नाही आणि हिला प्रत्येक गोष्ट सासूबाईंना सांगावी वाटते." अंथरूणाच्या ओबडधोबड घड्या घालत मैथिली प्रकाश वर म्हणजे तिच्या नवऱ्यावर चिडून बोलत होती.

(कुणाचं असेल सामान?भैरव आणि परश्या दोघांना कुठे घेऊन गेले असतील? पाहूया पुढील भागात.)

क्रमशः..
@श्रावणी लोखंडे…


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

नवीन रेसिपी घरी बनवून घरातल्याना खायला घालायला आवडते??.वाचायला आवडते आणि गप्पा मारायला तर खूपच आवडते?

//