"ए भोसडीच्या....चल आवर भरभर. टायरची हवा चेक करायला एवढा उशीर लागतो होय रे!" काय माणस ठेवली आहेत कामं करायला...भैरव चिडून स्वतःशीच पुटपुटत होता.
"झालं साहेब..बस दोन मिनिट..हा एक टायर तेवढा राहिला आहे तो झाला की गाडी न्यायला मोकळे बघा तुम्ही." गॅरेज वाला स्वतःची बाजू सावरत बोलला.
"हा ठीके ठीके..चल तू तुझ काम कर. गॅरेजवाल्याला बोलून परश्या भैरव चा हात पडकुन त्याला बाजूला घेऊन जातो आणि कुजबुजु लागतो.
" ए भैरवा..आर त्या सायबाचा फोन आला होता. विचारत होता कुठवर पोचलात? मी बोललो जवळच आहोत ..तासाभरात पोचतो म्हणून पण आर काय सांगायचं त्याला..त्याच्या मालातली एक पेटी गहाळ आहे समजल तर जीव घेईल तो आपला." परश्या डोक्यावरचा घाम पुसत बोलला.
" ए भैरवा..आर त्या सायबाचा फोन आला होता. विचारत होता कुठवर पोचलात? मी बोललो जवळच आहोत ..तासाभरात पोचतो म्हणून पण आर काय सांगायचं त्याला..त्याच्या मालातली एक पेटी गहाळ आहे समजल तर जीव घेईल तो आपला." परश्या डोक्यावरचा घाम पुसत बोलला.
"झालं बघा साहेब.. आता तुम्ही जाऊ शकता. काय ओ काय झालं? एवढ्या थंडीत पण घाम फुटलाय तुम्हाला.. सगळ ठीक आहे ना?" गॅरेज वाल्याने काळजी पोटी विचारले.
"ए फुकन्या..तुझ काम झाल ना..मग हे घे पैसे..जास्त पुढं पुढं करायची गरज नाय.."भैरव त्याच्या तोंडावर पन्नास रुपयांची पाच नाणी फेकून मारत बोलला.
"ओ साहेब... असाल तुम्ही बड्या बापाची औलाद पण म्हणून आम्हाला भिकारी समजू नका...पैसे म्हणजे आमच्या साठी लक्ष्मी आहे. तुम्हाला नसेल तिचा मान ठेवता येत पण म्हणून तिचा असा अपमान करू नका..आणि कष्टाने कमावतो आम्ही..भीक मागून नाही." गॅरेजवाला पडलेले पैसे जमवून त्यांना कपाळाला लावतो आणि गॅरेजच्या दिशेने जातो.
"याच्या आयला तर...मला सूनवतोय हा..थांब याला बघतो.."पाठमोऱ्या त्याच्याकडे बघत हाताच्या बाह्या वरच्या बाजूला दुमडत भैरव बोलला.
"अरे सोड ना..आपल्याला आधी पोचायचं आहे ते बघ..आधीच उशीर झालाय...चेकपोस्ट लवकर सोडला पाहिजे भाई...चल लवकर बस आतमध्ये..ट्रक मी चालवतो आता. परश्या बोलला.
"मागच्या पेट्या लैच हलतायेत. तासाभरात तर पोचू आपण...पण साला त्या सायबाला काय सांगायचं समजत नाय बघ..डोकं फुटायची वेळ आलीय आता."हाताच्या मुठी आवळून स्वतः च्याच डोक्यात मारत भैरव बोलला.
"हे बघ..जे खर आहे ते सांगायचं! विषय संपला...आणि आपल्याला कुठे माहीत आहे त्या पेट्यांमधे काय आहे ते..आपल काम आहे दोन नंबरचा माल सुरक्षित पोचवायचा..जे आहे ते सांगुया बाकी बघू पुढे."परश्या बोलला
"काय रे..काय असेल पण त्या पेट्यांमधे? जड पण आहेत आणि हलतायेत पण जाम..जिवंत माणस असतील? की कोणत जनावर? ट्रकच्या काचेतून.. हेडलाईटच्या उजेडात दिसणारा सकाळचा निर्मनुष्य रस्ता आणि अंगाला झोंबणारा गार वारा त्यात डोक्यात येणाऱ्या नसत्या प्रश्नांनी भैरवच डोकं जड झाल होत. त्याने मागच्या हुकला अडकवलेल मफलर काढून डोक्याला आणि कानाला गच्च बांधून घेतल तेवढ्यात पाठी काहीतरी पडल्याचा आवाज आला.
"आयला आता कसला आवाज आला? मागे जाऊन बघुया काय?" भैरव बोलला.
"थांब नको.. समोर बघ चेकपोस्ट आहे. आता जर इकडे ट्रक थांबवला तर उगाच संशय येईल." परश्या बोलला.
"ते पण बरोबर आहे. चल मग लगेच." भैरव काहीच झालं नाही असा मफलर तोंडाला गुंडाळून डोळे बंद करून शांत पडून राहिला.
(काय असेल त्या पेट्यांमधे? चेकपोस्ट विना अडथळा पार होईल का? बघुया पुढील भागात.)
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे...
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे...
