Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सासू सून..भाग सात (अंतिम)

Read Later
सासू सून..भाग सात (अंतिम)


"काय ग वहिनी..तू तर बोलली होतीस पेट्यांमधे दागदागिने आहेत आणि या तर रिकाम्या!" मधुरा

"श्वेता..दागिने कुठे आहेत?" मैथिली

"कसले दागिने?पेटीत दागिने नव्हतेच." श्वेता

"मी स्वतः ऐकलं होत तुला आई सांगत होत्या. पेट्या मधे दागिने,हिरे, मोती आणि पाचूचे दागिने आहेत ते मग कुठे गेले सगळे?" मैथिली तावाने विचारत होती.

"तुम्ही स्वतः पहिले होते का दागिने? नाही ना..मग! त्यात कुठलेच दागिने नव्हते आणि दुसरी गोष्ट आईने तुम्हाला पाहिलं होत त्यांच्या खोलीबाहेर येऊन आमचं बोलण ऐकत होतात ते म्हणून मुद्दाम त्यांनी पेटी मधे दागिने आहेत अस सांगितल. वहिनी आणि ताई.. वहिनींच सोडा पण ताई..तुम्ही तर तुमच्या आईला ओळखता ना..मग तुम्हाला तरी अस कस वाटल त्यांनी सगळ मला दिलं असेल. पैसा सगळ काही नसत. मी कधीच असा प्रयत्न केला नाही आणि तुम्ही माझ्यावर प्रत्येक वेळी असा आळ घेतला आहे. वहिनी.. प्रशांत भाऊजीना या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आई कधी तुमच्याशी चुकीचं वागल्या नाही तरी तुम्ही नेहमी तुमच्या आईना आईंविरुद्ध भडकवत राहिलात. तुमच्या प्रेमापोटी कसलीही शहानिशा न करता तुमच्या आईनी प्रत्येकवेळी आईंना नको नको ते ऐकवल होत. काय करणार पैसा पैसा करून सांगा? जे आहे ते तुमचंच आहे. यातला एक रुपया पण आम्हा दोघांना कधीच हवा हवा वाटला नाही किंवा त्याचा मोह झाला नाही. तुम्हाला मूलबाळ नाही म्हणून तुम्ही स्वतःच नेहमी स्वतः ला हिणवत आलात, आई कधीच याबद्दल तुम्हाला बोलल्या नाहीत तरी तुम्ही तुमच्या आईंना खोटं सांगितल होत. का वहिनी?" मधुरा.

"हो सांगितल होत खोटं..कारण मला सगळ्या इस्टेटीची मालकीण व्हायचं होत. मधुरा ताईंना आईनविरुद्ध भडकावून मी त्यांचा हिस्सा पण माझ्या नावावर करणार होते कारण त्यांनी मागच्या वेळी सांगितल होत मुकाट्याने दिलं तर ठीक नाहीतर मी सगळ्यागोष्टींवर पाणी सोडेन म्हणून मी त्यांच्यात पण फूट पाडली. तू घरात आलीस आणि आई सगळच तुला विचारून करू लागल्या. प्रत्येक गोष्टीत त्यांना तू हवी होतीस म्हणून माझी चिडचिड व्हायला लागली होती." मैथिली तिच्या मनातली सगळी गरळ ओकत होती आणि तितक्यात तिच्या गालावर एक सणसणीत चपराक बसली तशी ती जमिनीवर पडली. काहीवेळ तर तिला काहीच समजेना तीच डोकं हलल्यागत झालं जमिनीवर पडलेली मैथिली वर मान करून बघते आणि समोर तिला तिची आई दिसते.

"आई...तू?" मैथिली

"हो..मीच.. तुझ्या एका खोट्यामुळे मी प्रत्येकवेळी सुनंदा ताईंना चुकीची समजत आले. एकुलत्या एका लेकीला माझ्याशी खोटं बोलून त्रास देतात म्हणून त्यांचा पाणउतारा करत राहिले. कधीतरी सत्य तुमच्या समोर येईल अस म्हणत त्या नेहमी शांत राहिल्या त्याचाच फायदा तू घेत राहिलीस. लेकीवर प्रेम असाव पण आंधळ प्रेम नसावं हे आज समजल. श्वेता ने तुझा खोटेपणा माझ्या समोर यावा म्हणून हे सगळ पेटिमधल्या दागिन्यांच नाटक करावं लागलं. मधुरा.. तू पण हिच्या नादी लागून तुझ्या आईवर शंका घेतलीस याबद्दल तिला विचारलं. अग तू तरी विश्वास दाखवायचा होता. ज्या दिवशी सामानाचा ट्रक आला त्या दिवशीच मी आले होते. अग तुझे बाबा तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवून कायमच हे जग सोडून गेले. हॉस्पिटलमधे माझ्या हातावर हात ठेवत बोलले होते..सुनंदा ताई कधीच खोट बोलणार नाही.. लेकीवर एवढं पण प्रेम करू नका की सत्य तुम्हाला दिसणार नाही पण मी तेंव्हा काहीच ऐकलं नाही. आज श्वेता मुळे तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. सुनंदा ताई..मला माफ करा.. खरचं चुकल माझं..तुमच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली." सुलक्षणा ताई हात जोडून उभ्या राहिल्या.

"अहो त्याची गरज नाही. मैथिलीला थोडी समज यावी म्हणून श्वेताने हे सगळ नाटक रचल आणि मी तिला यात साथ दिली. मैथिली...मी कधीच सूना आणि मुलींमध्ये अंतर केलं नाही. तुला पण चांगल माहीत आहे मी कधीच तुझ्यात आणि मधुरा मधे भेदभाव केला नाही मग तुझ्यात आणि श्वेता मधे भेदभाव करेन अस वाटलच कस तुला? या गोष्टी मी तुला समजावण्याचा काही उपयोग झाला नसता म्हणून सगळ तुझ्या आईसमोर व्हावं या गोष्टीत मी श्वेता सोबत उभी राहिले आणि प्रशांत सुद्धा. आणि मग हे नाटक सुरू झालं. " सुनंदा ताई.

"म्हणून मी तुला बोललो होतो जरा धीर धर नाहीतर तोंडावर पडशील. मामी..मी पण तुम्हाला सांगत होतो माझी आई अस कधीच वागणार नाही पण तुम्ही नेहमी मैथिलीच ऐकत आलात. उलट माझ्या आईने मैथिलीला कारखान्यात लक्ष घाल.. कधीतरी कामी येईल हेच सांगितल पण तुमच्या मुलीने त्याचा अर्थ तिला नोकर बनवण्याचा काढला आणि तुम्हाला पण तेच सांगितल. तिच्या सुनानी नेहमी नव्या गोष्टींना धरून आणि समजून जाव अशीच इच्छा होती पण तुमच्या मुलीची अक्कल गुडघ्यात त्याला आम्ही किंवा तुम्ही तरी काय करणार?" प्रशांत.

"वहिनी..खरतर मला यातलं काहीच माहीत नाही पण एक गोष्ट खात्रीने सांगतो. इस्टेटित हिस्सा कधी मागणार नाही मी त्याची काळजी करू नका. मी स्वतः माझ्या हिमतीवर मला जे व्हायचं आहे ते झालो आहे. माझ्या दादाने आणि आईने खूप कष्टाने मला वाढवलं. माझा दादा माझा फक्त दादा नसून बाप झाला. त्याची चांगली जाण आहे मला आणि कायम राहील. आई मी आजच वकिलांशी बोलून घेतो आणि स्वेच्छेने माझा या संपूर्ण प्रॉपर्टी मधे जो काही वाटा असेल तो वहिनीच्या नावे करतो. माझ्या या निर्णयात श्वेता माझ्या सोबत असेल याची खात्री आहे मला." श्वेता कडे बघत विशाल बोलला तशी श्वेताने पण पापण्यांची उघडझाप करून याला संमती दर्शवली.

"पाहिलंस श्वेता.. तू जिला स्वतः ची शत्रू समजत होती ती काय आहे? अग पैसा सगळ काही नसत..कुटुंब..त्यातली माणस तुझ्या कारखान्यात काम करणारी माणस हीच खरी तुझी संपत्ती आहे." सुलक्षणा ताई.

"अहो बाईसाहेब..आमचं पण चुकल आम्ही पण तुम्हाला दोन नंबरचा धंदा करता अस समजलो होतो. चूक झाली आमची." भैरव हात जोडत बोललात.

"तुमचं बोलणं प्रशांत ने ऐकलं होत म्हणूनच त्यांनी तुम्हाला दोन दिवस बंद करून ठेवलं होत." सुनंदा ताई बोलल्या.

"पण बाईसाहेब त्यातली एक पेटी कुठे गेली? आणि गाडी जेव्हा टोलनाक्यावर थांबली तेंव्हा मग काय पडल होत?" परश्याने विचारलं.

"माझा पाय पेट्यांच्या फटीत अडकला आणि मी अडखळून पडले आणि गायब झालेली पेटी.. जेंव्हा तुम्ही मोकळे व्हायला उतरलात होता तेंव्हा त्याच हवालदाराने काढली ज्यांनी तुम्हाला टोलनाक्यावर योग्य ठिकाणी जाण्याची सूचना केली होती. तो माझाच माणूस होता. एक पेटी चुकन जास्तीची आली होती म्हणून त्यांनी ती त्यावेळी काढून घेतली आणि त्यांनी तिथून पळ काढला. तुम्ही दोन नंबरच काम करता. तुमच्या मुलांच्या पोटापाण्यासाठी करता मान्य आहे..पण आहे त्यात आनंदी रहायला शिका. तुम्ही जे करणार तेच तुमची मुल पण करणार मग तुम्ही त्यांना काय शिकवताय? चांगल की वाईट? सुलक्षणा ताई बोलल्या.

"चुकल आमचं आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही." दोघेही माफी मागून त्यांचा ट्रक घेऊन तिथून निघून जातात.

"आई..चुकले मी. वहिनीच ऐकून तुझ्यावर शंका घेतली. तू सगळ श्वेताला दिलं की काय असं वाटल मला पण आई आता खरच मनापासून सांगते मला काहीच नको. जे माझ आहे ते सगळं माझ्या नवऱ्याच्या घरी असेल. इथूनपुढे माहेरपणासाठी पण फक्त सणासुदीची येत जाईन. सॉरी आई." मधुरा आईला मिठी मारत बोलली.

"आई.. माझ पण चुकल..श्वेता माफ कर मला. तुला चुकीचं समजले. माहीत नाही का पण मी तुझ्यावर जळत होते. तुझा राग येत होता आणि तुझा हेवा पण वाटत होता. आईंच्या एवढ्या जवळ कधी जाता आल नाही मला याच दुःख होत की काय माहीत नाही पण तू आल्यावर मी जास्तच असुरक्षित वाटून घेऊ लागले. आधीपण मी कधी चांगली सून होऊ शकले नाही आणि आताही नाही पण इथूनपुढे मी मोठी सून म्हणून सगळ्या गोष्टीत लक्ष घालीन आणि विशाल भाऊजी..मला तुमचा हिस्सा नकोय बर..मला जे मिळेल त्यात मी आनंदी रहायला शिकेन. आपल्याच माणसांच्या मनातून उतरून जर पैसा घेऊन बसले तर शेवटचे खांदे लावून घ्यायला पण पैसेच मोजावे लागतील. खरे चार अश्रू नाही येणार माझ्या वाट्याला."मैथिली सगळ्यांसमोर हात जोडून उभी होती आणि माफी मागत होती.

"श्वेता..मला एक प्रश्न पडला आहे." प्रशांत

"काय?" श्वेता

" त्या चिठ्ठीत काय होत जी आईने तुला दिली होती? आणि पेट्या जेंव्हा काढल्या तेंव्हा खरच त्या जड होत्या त्यात नेमक काय होत?" प्रशांत

" तुमच्या आणि वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवशी म्हणजे उद्या काय मेनू बनवायचा हे आईनी लिहिलं होत आणि पेट्यांमधे गरिबांना द्यायला गरजेच्या वस्तू आणि मुलांसाठी काही शालेय पुस्तक वैगरे अस सगळ होत जे दोन्ही आईंनी मिळून केलं होत. खरतर वहिनीचा खरा चेहरा त्यांच्या आईंसमोर आणायची शक्कल मी लढवली होती पण कस काय करायचं हे आईंनी सांगितल होत." श्वेता बोलली.

"आणि मला खात्री होती मैथिली फार दिवस गप्प बसणार नाही ते. मैथिली आणि श्वेता..मला दोघींकडून वचन हवय. काही झालं तरी तुम्ही एकमेकींची सोबत सोडणार नाही आणि उद्या मी गेल्यानंतर माझ्या लेकीच माहेर सुटू देणार नाही." सुनंदा ताई भावूक होत बोलल्या.

"आई..काहीही काय बोलताय..तुम्हाला काहीच होणार नाही. आपल सासू सुनेच नात कायम असच अबाधित राहो अशीच प्रार्थना करेन मी बाप्पा जवळ. अशी सासू सगळ्यांना मिळो जी आई म्हणून नेहमी पाठीशी उभी राहील." मैथिली बोलली.
कधी कधी आपल्या माणसांना योग्य वाट दाखवायची असेल तर बोट वाकड करावं लागतच..

समाप्त......
सासू सून हे अस नात आहे जे कधीच कुणाला समजल नाही. कधी आंबट तर कधी गोड...या रहस्यावरचा पडदा कधी हटू शकेल की नाही हे कुणालाच माहीत नाही पण सासू सूना जर समजूतदार असतील तर समाजात बदल नक्की घडेल.

@श्रावणी लोखंडे..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

नवीन रेसिपी घरी बनवून घरातल्याना खायला घालायला आवडते??.वाचायला आवडते आणि गप्पा मारायला तर खूपच आवडते?

//