Login

सासू सून..भाग सहा

मैथिलीने काय पाहिलं असेल पेट्यांमधे?


"तासाभराने सगळ्यांनी बैठकीत या. माझं थोड काम आहे, ते उरकून घेते मी." सुनंदा ताई जेवून झाल्यावर उठत बोलल्या.

"ओ वन्स, काय ओ..दोन दिवस कुठं होतात? मला वाटल आज आलात तर दागिन्यांचा विषय घेऊन आला असाल?" मैथिली

"अग..मग बोलले ना आता!" मधुरा

"काय बोललात? सामान आल होत म्हणे..हे काय बोलणं झाल?" मैथिली नाक मुरडत बोलली.

"अग मग असच बोलणार ना. मी काय इकडे चोवीस तास असते का? दोन दिवसांनी एकदा येते. खरतर ना.. मी सरळ सांगायला हवं होत तूच मला सगळ सांगितलस ते!" मधुरा चिडून बोलली.

"अहो वन्स..आज भाजी खाल्ली जेवतांना ती किती छान होती ना..खर सांगू मला ना आमच्या मळ्यातल्या भाज्यांची आठवण आली." स्वतःच नाव ऐकताच विषय बदलत मैथिली बोलली.

"अग..तुझ्या मळ्यातल्याच भाज्या होत्या त्या." प्रकाश आत मधे येत बोलला.

"करा चेष्टा माझी." मैथिली लटक्या रागात बोलली.

"मी का चेष्टा करू? आणि मला सांग..तुला जर तुमच्या मळ्यातल्या भाज्या ओळखू येऊ शकतात तर आम्हाला आमची आई ओळखता येणार नाही का? तुझ आणि मधुरा चा दोन दिवसांपुर्वीच सगळ बोलण ऐकलं होत मी. मैथिली..तुला त्यादिवशी बजावलं होत. आईने जर काही ठरवल असेल तर ते विचार करूनच ना.. एवढी साधी गोष्ट समजू शकत नाही तुला? आणि मधुरा तू..तू पण हिला सामील झालीस. काय तर म्हणे शत्रू चा शत्रू मित्र असतो.. का तुम्ही त्या श्वेताला तुमची शत्रू समजता? "प्रशांत वैतागून बोलत होता.

"तुम्हाला नाही माहीत आईना किती फितवल आहे तिने. स्वतःच्या लेकी मुलांवर कोणतीही जबाबदारी न टाकता आता आलेल्या त्या पोरीवर पेट्यांची जबाबदारी टाकावी."मैथिली

"हो ना..माझ्यावर नाही कधी एवढा विश्वास दाखवला आईने!" मधुरा.

"दाखवला होता ना..तुझ्यावर पण विश्वास दाखवला होता. जेंव्हा तुला कारखान्याची सगळी महत्वाची काम बघण्याची जबाबदारी दिली होती आईने. आम्ही मुंबईला जाणार होतो तेंव्हा. काय केलस ग तू.. कुटुंबासारखं प्रेम केलं आईने तिच्या कामगारांवर; त्यांच्यावर अरेरावी दाखवलीस. काही मोठ कारण नसताना त्यांना काढून टाकलंस; आणि काय कारण होत बर..हा..तुला कॉफी दिली नव्हती म्हणून.. अग ते कारखान्याचे कामगार आहेत..आपले पर्सनल नाही."प्रशांत चा आवाज वाढला तश्या सुनंदा ताई त्यांच्या खोलीत आल्या.

"काय चालू आहे? सांगितल होत ना तासाभराने सगळे बैठकीत या..मग तासभर पण धीर धरता येत नाही तुम्हाला?" सुनंदा ताई गरजल्या.

"हे बघ आई, बोलायचं आहेच ना..मग तासभर थांबण्याची गरज काय आहे? जे काही आहे ते आत्ताच सांग. उगाच आम्हाला आम्ही परक असल्याची जाणीव का करून देतेस?" मधुरा बोलली.

"परक..बर चला खाली..मी येतेच. प्रशांत..श्वेताला दिलेले काम पूर्ण झालं का ते बघून ये आणि तिला सांग ताबडतोब खाली ये आणि हो..विशालला फोन करून सांग कारखान्यातून लवकर यायला." सुनंदा ताई जवळ जवळ आज्ञाच देऊन निघूनही गेल्या. प्रशांत ने हो म्हणत मान हलवली आणि या दोघींकडे बघून कपाळाला हात लावून तो ही निघुन गेला.

मैथिली आणि मधुरा गुडघ्याला बाशिंग बांधूनच खाली गेल्या होत्या. प्रशांत आणि सुनंदा ताई पण बैठकीत आले.

"काय ग आई...घरी लवकर यायला सांगितलस काय झालय तब्बेत वैगरे ठीक आहे ना तुझी? विशाल समोरून आत येत सुनंदा ताईंच्या माथ्याला हात लावून विचारू लागला.

"अरे..मला काही नाही झालं. जरा बोलायचं होत सगळ्यांशी म्हणून तातडीने बोलावून घेतलं बाकी काही नाही." काळजी करणाऱ्या लेकाला समजावत त्या बोलल्या.

"काय बोलायचं होत? आणि सगळे एवढे सिरियस का उभे आहेत?" विशालने एकवार सगळ्यांवर नजर फिरवून विचारले.

"काय भाऊजी.. असं विचारताय जस की तुम्हाला काही माहीतच नाही!" मैथिली

"मैथिली..जरा शांत रहा..श्वेताला येऊदे मग आई बोलेल सुद्धा आणि सगळ सांगेल सुद्धा. थोडा धीर धर नाहीतर तोंडावर पडशील." प्रशांत

"हो..धरतो हा धीर.. तस पण श्वेता मॅडम व्ही.आय.पी. आहेत ना. विशाल कारखान्यातून आला पण मॅडम अजून खोलीतच!" मधुरा.

"नाही हा ताई..मी काही कोणी व्ही.आय.पी. नाही बर.. आईंनी जे काम दिलं होत तेच करत होते म्हणून उशीर झाला. आई..बोला आता.."श्वेता पण थोडी तिरसटपणेच बोलली.
मधुरा खुनशी नजर टाकत पुढे काही बोलणार तोच सुनंदा ताई बोलू लागल्या.

"श्वेता.. दोन्ही पेट्याचे कुलूप उघड.." सुनंदा ताई.

"हो आई.." म्हणत श्वेता ने एक एक करून दोन्ही पेट्यांचे कुलूप उघडले. मैथिली घाई घाई ने पेट्यांमधे काय आहे बघण्यासाठी पुढे आली.

पेट्या उघडल्या बरोबर मैथिली आ वासून बघतच राहिली.
(काय असेल पेट्यांमधे? पाहूया पुढील भागात)
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे...

🎭 Series Post

View all