सासूला सरप्राईज देऊ

Sasula Surprise Devu
प्रीतीला तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला सासूबाई काही खास देतील असे कधीच वाटले नव्हते, ती ऑफिस मधून लवकर येणार होती ,आणि ती अभी सोबत हॉटेल मध्ये जाणार होती. ऑफिस मध्ये काय लक्षात आले माहीत नाही तिने लगेच अभीला फोन लावला आणि सांगितले ," अरे ऐक ना जरा ,प्लॅन मध्ये थोडासा बदल करू ,आज आपण हॉटेल मध्ये नको जायला ,किंवा गेलोच तर आईला आणि पप्पाला ही सोबत घेऊन जाऊ "

तिच्या ह्या समजदार विचाराने अभी सुखावला, जर ती असे म्हणाली नसती तर खऱ्या अर्थाने आई बाबा त्याच्या सोबत आलेच नसते, त्यांनी ही नवीन जोडप्याला त्यांचा एकांत दिला असता आणि ती खुश व्हावी म्हणून मी ही काहीच बोललो नसतो हे ही खरे आहे.

अभीने आईच्या रूम मध्ये ही खबर सांगितली, आणि आईच्या डोळ्यात ही वेगळी चमक जाणवली ,बाबा ही मनोमन विचार करत होते ,हा विचार जो सूनेने केला आहे तो तिने नसता केला तरी फारसे वाईट तर वाटले नसते, पण तिने हा असा विचार करून मनात कुठे तरी जागा निर्माण केली आहे.?

सासूबाई आता ती येण्याआधी तिच्यासाठी त्यांच्या हातखंडा असलेली खास dish तयार करणार होत्या, सोबत ती येण्याआधी काही तरी आठवणीत राहील असे gift ही तिला देणार होत्या. स्वयंपाक घरातील पूजेचे ताट तयार केले होते. त्यात त्या सासऱ्यांसोबत बाजारात जाऊन तिला पैठणी घेऊन आल्या होत्या आणि तिला तिच्या सगळ्यात प्रिय असलेला ,आणि रोज तिच्या बेडच्या बाजूला असलेल्या तिच्या आईबाबांच्या फोटोला त्या छान frame करून घेऊन आल्या होत्या. रोज हताळून हताळून
तो फोटो खराब होत होता हे समजल्यावर त्यांनी ठरवले होते तो आधी frame करून आणायचा.? जवळ माहेरची माणसे असतात तेव्हा ,मुली सासरी ही रमतात .? हे सासूबाईला समजत होते .

ती आज लवकरच घरी येणार होती हे समजल्यावर आईनी आणि बाबांनी सगळी तयारी करूनच ठेवली होती. अभी तर आज खूप खुश होता,लग्नाचे हे एक वर्ष कसे समजले ही नव्हते. ह्या एका वर्षात कधी तिने हट्ट केला नाही ना1 कधी त्याने तिला काही कमी पडू दिले नाही. आई बाबा तर जणू त्यांच्यापेक्षा तिची साथ देत होते.

ती घरात आल्यावर सासूबाईने त्याचे आणि तिचे औक्षण केले होते, सुखी जोडप्याला हवे असणारे सगळे आशीर्वाद बहाल केले होते.? आई बाबा यांनी मिळून सूनबाईला ,तिच्या आवडत्या रंगांची पैठणी आणि सोबत ती frame दिली होती. साडीचा रंग तर खूप आवडला होता तिला, आणि खास करून ती frame ज्यात आई बाबा आणि तिच्या तो परिवार होता ,ते ही आजच्या ह्या खास प्रसंगी ते सोबत होते.

असेच प्रीतीला ही वाटले की जेव्हा ही आईंचा वाढदिवस असेल तेव्हा मी आईला ही असेच गिफ्ट देईल जे त्यांना कायम लक्षात राहील आणि ते त्यांना कायम आनंद देत राहील हे नक्की. पुढच्याच महिन्यात आईचा वाढदिवस होता.? त्या दिवसाची खास आठवण काय हवी हा विचार प्रीती कायमच करू लागली. ह्या निमित्ताने ती आईच्या आवडी निवडी जाणून घेऊ लागली. त्यांचे बालपण, त्याचे college ,त्यांची मैत्रीण, त्यांना आवडणारे छंद, ज्यातून ती आईच्या खूप जवळ येत होती. दोघी ही रविवारी galleryत बसून आता खूप गप्पा मारू लागल्या होत्या.

ह्या दरम्यान प्रीतीला समजले आईला लिखाणाची खूप आवड होती पण घर संसार,मुले यांच्या व्यापात सगळे मागे पडले. पण अजून ही मनात खंत होती, की मी काही करू शकले नाही. ती खन्त खंत म्हणून जास्त टोचत होती, आणि नेमकी ती टोचू नये म्हणून तिने ठरवले होते की आईंना mobile कसा operate करायचा हे ती सर्वप्रथम शिकवणार होती, मग तीच त्यांना एक mobile घेऊन देणार होती.

वाढदिवसाचे कायम स्मरणात राहील असे गिफ्ट सापडले होते.

तो दिवस जवळ आला, ती नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली, आज ही ती लवकर घरी येऊन cake करणार होती, सोबत ते gift आणणार होती.

mobile घेऊन ती घरी आली, kitchen मध्ये cakeची तयारी तिने केली,औक्षण करण्यासाठी ताट घेतले, आणि सगळ्यात आधी आईचे औक्षण केले, cakeकापला,आणि mobile gift दिला. तो ही त्यात मोमस्प्रेससो app download करून.? हो हेच ते गिफ्ट होते जे आईंना कायमस्वरूपी आठवणीत रहाणारे होते.? त्यांच्या लेखनाचा नवा प्रवास आता सुरू होणार होता ,तो ही सुनेचा साथीने.?

हे पाहून सासूबाईंना खरंच आत्तापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात जे मिळाले नाही ते आज मिळाले होते, त्यांची खंत सूनने जाणून घेतली आणि त्याचे आज तिनेच चीज केले होते. म्हणूनच पहिला लेख त्यांनी सुनेला अर्पण केला होता.