सासू एकपट नि सून दुप्पट..(भाग २)

सासू सुनेच्या नात्याची एक अनोखी कहाणी.
अचानक सासूला काय झाले? ते आता हळूहळू स्मिताच्या ध्यानात येत होते.

सकाळी शेजारच्या जोशी काकू बराच वेळ प्रमिलाताईं सोबत कानगोष्टी करत होत्या. तोंडावर अगदी बाळा बाळा करुन गोड बोलणाऱ्या जोशी काकू आईंना सुनेविरुद्ध भडकवतील असे स्मिताला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण त्यांनीच काहीतरी काडी टाकली हे मात्र नक्की. याची स्मितालाही आता खात्रीच पटली होती.

एखाद्या व्यक्तीत काही कारण नसताना असा अचानक एवढा मोठा बदल होवूच शकत नाही. जो की प्रमिला ताईंमध्ये झाला होता.

तशा प्रमिलाताई अगदी साध्या होत्या. पण कोणी काही भडकवले तर लगेच त्या भडकायच्या.

"अगं पण स्मिता नेमकं झालंय काय कळेल का मला?" सागर काळजीपोटी विचारत होता.

"मला समजले की नक्की सांगेल हा तुला."

"माहित नाही तर उगीच कशाला वाद घालतेस आईसोबत मग?"

"गप रे तू, तू क्लायमॅक्सला आलास त्यामुळे तुलाही जास्त माहित नाहीये. म्हणून तूही गप्पच बस. नको लगेच आज्ञाधारक मुलासारखा आईची बाजू घेवून माझ्या अंगावर येवूस. आमच्या बायकांमध्ये पडू नकोस. आताच सांगतिये तुला."

"बघ बघ सागर, कशी उलट बोलते आहे तुला. हिला जास्त डोक्यावर चढवून घेवू नकोस आ."

"सासूबाई, का काडी टाकताय आमच्या नवरा बायकोच्या नात्यात. जैसी करणी तैसी भरणी बरं का."

"म्हणजे नेमकं म्हणायचंय तरी काय तुला?"

"म्हणजे माझ्यापासून जरा जपूनच रहा, नाहीतर ह्या वयातसुद्धा बाबा तुम्हाला घटस्फोट देवू शकतात बरं."

"ये बाई अगं का अशी मुळावर उठलीस माझ्या?"

"आता ह्या सर्वाला सुरुवात तुम्हीच केलीत ना मग याचा शेवट मात्र मी करणार हा सासूबाई."

"बरं आज तुमचा स्वयंपाक तुम्ही करताय की बाहेरून मागवणार आहात? कारण आता ते मला जमेल अशी शंका वाटते हो."

" ये अगं बाई तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का ग?"

"नाही ओ, पण आता तुमच्या नाही झाला म्हणजे मिळवलं."

आता स्मिता थांबायचे काही नावच घेईना. सासूला आणि शेजारच्या जोशी काकूंना अंदाजच नव्हता स्मिताच्या वाकड्यात शिरणे किती महागात पडणार होते त्यांना ते. कारण स्मिताच्या स्वभावाची एकच बाजू त्यांना माहीत होती.

"अहो आता तुम्ही काही बोलणार आहात का की दुरुनच बायकोची फक्त मजा पाहणार आहात? आणि काय रे सागर तुला तर तुझ्या बायकोला साधं आवर पण घालता येत नाही. असा कसा रे मुलगा तू? काल आलेली ही पोरगी तुझ्या आईचा क्षणाक्षणाला अपमान करत आहे. आणि तू मात्र ढिम्म उभा आहेस."

"मीच क्लायमॅक्सला आलोय. आता हा नेमका काय प्रकार आहे सगळा, ते समजल्याशिवाय मी तरी काय बोलणार ना आई?"

सागरने अलगद अंग काढून घेतले सुरु असलेल्या वादातून.

"तुझी बायको इतकी चुरूचुरू बोलते, हे तुला तरी माहित होतं का रे?"

"आता माझी बायको आहे ती, मला नसणार माहीत तर कोणाला माहित असणार."
आईला ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात सागर तोंडातच पुटपुटला.

अरे काय विचारतीये मी? जरा मोठ्याने बोलायचे तरी कष्ट घेशील का आता? की महिन्याभरातच बायकोच्या ताटाखालचे मांजर झालास  तू?

"अगं आई आता कुठे महिनाच होतोय आमच्या लग्नाला, अजून पूर्णपणे ओळखखलेही नाही आम्ही एकमेकांना, मला तरी कसे माहित असणार ना तिचा हा स्वभाव."

"झालं तुम्हा माय लेकाचं बोलून, जावू का मी आता? आज शांत सुखाची झोप लागेल मला. महिनाभर कसे स्वतःला कंट्रोल केले होते ते माझे मलाच माहिती ओ बाबा. पण बाबा मला एक सांगा, आतापर्यंत तुम्ही कसे राहिलात ओ या दोन विचित्र प्राण्यांसोबत?"

"काय करते स्मिता आता, आलीया भोगासी असावे सादर." सासरे बुवाही स्मिताच्या ह्या नव्या रुपावर जाम खुश होते बरं का.

"आलिया भोगासी काय? बघते तुमच्याकडे नंतर थांबा आणि तुला काही समजले की नाही सागर, तुझी बायको काय बोलून गेली ते?"

"आई मला कुणी सांगेल का नेमका मॅटर काय आहे ते?"

"जा तुझ्या बायकोलाच जावून विचार, तेल मीठ लावून बरोबर सांगेल ती."

"आई स्मिता इतकीही वाईट नाही ग. इतर बायकांसारखं काहीच सांगत नाही मला. उलट नेहमी म्हणत असते कोणाच्या पर्सनल भानगडीत कधीच पडू नका. ह्या बाबतीत मात्र मी खूप सुखी आहे ग आई."

"बरं बरं जा आता, पुरे झाले बायकोचे कौतुक."

क्रमशः

आता स्मिता नेमकं काय करेल पुढे? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all