Aug 18, 2022
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग २

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग २
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग २


मला वांग्याची भाजी नको! शांता म्हणाली..

काय झाल आई?....तुला तर वांग्याची भाजी फ़ार आवडते ना ?...समीर ने आश्चर्याने विचारले.....

असच!.... आज फक्त डाळ भातच खायचा मुड आहे!... शांता... म्हणाली....


बाबांना थोडा संशय आल्याने त्यांनी देखिल वांग्याची भाजी थोडीच मागितली.... मीराने शांता सोडून सगळ्याना भाजी वाढली..


वा!.... मस्तच झालीय वांग्याची भाजी!.... समीर पहिल्या घासा नंतर म्हणाला...

समीरच्या या वाक्या बरोबर शांताने मीरा कडे पाहिले..... तसा मीराने तिला डोळा मारला....

शांता समजली उगाचच आपण त्या गॅसवरून उतरवून ठेवलेल्या वांग्याच्या भाजीत मीठ टाकले .....

हे तिघंही वांग्याची भाजी आवडीने खात आहेत याचा अर्थ ब्लॅकबेल्ट ने आधी भाजीत मीठ टाकलेच नव्हते तर?..... ठीक आहे!...ब्लॅकबेल्ट! आज जिंकलीस!...पण गाठ या शांताशी आहे समजल?.... शांता मनातल्या मनात निश्चय करत म्हणाली......


दारावरची बेल वाजली ....शांताने दरवाजा उघडला.....जोशी मॅडम ने दिलय!.... वॉचमननं शांताच्या हातात एक पत्रक देत म्हंटले...


शांताने पत्रक वाचत ..अग! ऐकलंस का?...हे बघ काय आहे?.... कधी नव्हे ती शांताने मीराला प्रेमाने हाक मारली..... ती हाक ऐकून मीरा धावत आली..... शांताच्या त्या प्रेमळ हाकेने बाजूलाच बसलेल्या बाबांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला...


काय झाल आई?....आज बोहोत प्यार उमड पडा है। अपने बहु पर?....मीराने लाडीक पणे विचारले......


अग! हे पत्रक वाच म्हणजे समजेल?


मीराने पत्रक वाचून शांताच्या हातावर टाळी दिली... आणि शांताला प्रेमाने मिठी मारली.....


बाजुला बसलेल्या बाबांना हा प्रेम मिठी मुळे दुसरा धक्का.... बाप रे!.... अस काय आहे काय त्या पत्रकात..... बाबांचे कुतूहल शिगेला पोहचले.....


अग!.... काय झाल काय?..... नक्की!.. आहे काय त्या पत्रकात?... बाबांनी शेवटी न राहवून विचारले.....


तसं शांताने मीराच्या हातातील पत्रक बाबांना दाखवले......


बाबांनी ते पत्र वाचले ...बाप रे!.....कमाल आहे या सोसायटीतल्या बायकांची नवरात्री निमित्त काय अफलातून स्पर्धा ठेवलिय यांनी!..... बाबा.. महिला मंडळाचे कौतुक करत म्हणाले.......

हो!.... पण यांत तुमचे आणि समीरचे सहकार्य आम्हांला अपेक्षित आहे!....कारण तुम्ही दोघं परीक्षक आहात!.... आम्ही जर ब्लॅकबेल्टशी या स्पर्धेत हरलो तर याद राखा!.... शांता दम देत म्हणाली.....


बाबा!..... आज पण आय पी एल..... म्हणजे आज पण भांडण?... समीरने कामावरून आल्या आल्या विचारले.....


समीर!... आज भांडण नाही कारण सोसायटीची एक नोटीस आलीय!.....त्यामुळे आज दोघीही चक्क एकत्र स्वयंपाक करत आहेत! आहेस कुठे?


दोघीही एकत्र कमाल आहे बाबा!...... अशी कोणती नोटीस आलीय सोसायटीची? समीरने आश्चर्याने विचारले.


नोटीस!.... म्हणजे तसली नोटीस नाही रे!....हे बघ पत्रक!.....बाबांनी समीरच्या हातात पत्रक दिले....


बाप रे!..... कमालच झाली!.... काय भन्नाट आयडिया आहे!....अब तो मजा आयेगा!... समीर आनंदाने म्हणाला.....


अरे!.... मजा काय मजा?.... खाली बघ!.... या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपण आहोत समजल? ह्या दोघी हरल्या तर गळा पकडतील आपला!... बाबांनी शंका व्यक्त केली.....

पण काहीही असो!.... आपल्या जोशी काकु म्हणजे हुशार व्यक्तिमत्व छान शक्कल लढवलीय त्यांनी.... बघा ना स्पर्धा उद्या पासुन सुरू होणार आहे... पण यांनी तर आजच सुरवात केली .....आज आपल्या सोसायटीत बहुतेक सारखीच परिस्थीती असेल सगळ्या घरात ! ..समीर हसत हसत म्हणाला.......


हो!.... पत्रक पण भारी लीहलय.... बघा ना!...

नमस्कार,...

सोसायटीतील सर्वच महिलांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की,... येत्या नवरात्री निमित्त आपण आपल्या सोसायटीत आदर्श सासु- सुन ही स्पर्धा ठेवत आहोत...... या स्पर्धेसाठी सर्वानी सहकार्य करावे ही विनंती...

नियम व अटी

१ ) सदर स्पर्धा ही केवळ आपल्या सोसायटीतील सासु- सुने पुरती मर्यादित असेल...

२) स्पर्धेचा कालावधी नऊ दिवसांचा असेल.. (आयुष्याभर असला तर आनंदच)

३) या कालावधीत सासु- सूनेने अगदी प्रेमाने वागायचे आहे. या साठी परीक्षक म्हणून सदर सासु -सुनेचे चे पती असतील...

४) स्पर्धे दरम्यान सासु- सुनेची जितकी भांडणे होतील तितके मिसकॉल परीक्षक म्हणजे त्यांचे नवरे पुढील मोबाईल नंबर वर देतील...
मो.७३५०१३१४८०

५) ज्या सासु- सुनेचे अर्थात त्यांच्या नवर्‍यांचे सगळ्यात कमी मिसकॉल असतील त्यांना विजयी घोषित करण्यात येईल.

६) भांडणाचे मिसकॉल परीक्षकांनी स्वतः च्याच मोबाईल वरून करावे... दुसऱ्या नंबर वरून केल्यास गृहीत धरले जाणार नाही..


७) विजेत्या स्पर्धकांना योग्य ते बक्षिस देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल....


८) स्पर्धकांनी परीक्षकांवर कोणताही दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास त्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल. क्रुपया याची नोंद घ्यावी.

९) सदर स्पर्धेचे काही नियम महिला मंडळाने राखून ठेवले आहेत.

धन्यवाद
अध्यक्ष
सौ. सा. सु. जोशी

त्यांच्या सकट आपल्याला ही मस्त कामाला लावलंय जोशी काकूंनी!.....समीर पुन्हा हसत म्हणाला...


या अनोख्या स्पर्धेची घोषणेनंतर नंतर सोसायटीतील वातावरणच बदलले.... सगळ्या सासु सुना.... आता जणु मायलेकीच..झाल्या होत्या....

त्यांत शांता- मीरा तर जणु जिवलग मैत्रिणी भासत होत्या..

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक