Aug 16, 2022
कथामालिका

सासु ची कमाल सुनेची धम्माल..भाग-१

Read Later
सासु ची कमाल सुनेची धम्माल..भाग-१
सासु ची कमाल सुनेची धमाल..


काय?... बाबा!.... आज तुम्ही या वेळेला चक्क आय पी एल पाहताय?..... समीरने कामावरून आल्यावर आपल्या वडिलांना काहीश्या आश्चर्याने विचारले.....


हो!.....कारण असा सुवर्ण क्षण आयुष्यात कधीतरीच येतो!.....आताच काही वेळापूर्वी तूझ्या आईचे आणि बायकोचे कोणती सिरियल बघायची याच्या वरून कडाक्याच भांडण झाल .....दोघीही रागावून त्यांच्या त्यांच्या खोलीत आहेत..... त्यामुळे या सुवर्ण संधीचा मी उपयोग करतोय!.....


वा!..... म्हणजे आज खारट किंव्हा अळनी स्वयंपाक मिळणार तर?...... समीर काहीश्या गंमतीत म्हणाला.....


चला!.... चला!!.... जेवण वाढा!.... तुमच दोघींचे काय असेल ते कंटिन्यू ठेवा पण मला आणि पप्पांना भुक लागलीय!.... समीर ने दोघींनाही ऐकू जाईल अश्या पद्दतीने हाक मारली!......


लग्नानंतर सुरवातीला समीर आई किंव्हा बायकोची बाजु घ्यायचा......पण कोणा एकाची बाजु घेतल्या नंतर काय होते.... याचा साक्षात्कार झाल्या पासुन.... त्याने कोणाची बाजु घेण्याचे सोडून दिले.....


शांता आणि मीरा..... दोघीही चांगल्या शीकलेल्या....वैचारिक दृष्टीने सक्षम..... तसा दोघींचाही स्वभाव प्रेमळ...... पण.... इगो..... बाप रे बाप!..... इगो मात्र दोघींमध्ये एकदम ठासून भरलेला......


समीरच्या विनंतीवरून दोघींनीही जेवणाच्या टेबलवर ताट मांडली......


आज तर मजाच आली!.... पोलार्ड आणि पांडया काय खेळले.आणि मुंबईला जिंकवले!....तुम्ही दोघी... संध्याकाळी अश्याच भांडत रहा म्हणजे.... आम्हांला मॅच पाहता येईल!......समीरच्या बाबांनी दोघींना काहीस चिडवत संगितले......


मला डिस्कवरी पाहायच होत!..... पण या ब्लॅक बेल्टला ते डोरेमोन पहायच होत!..... शांता काहीश्या रागात म्हणाली....

आई !...तुला डिस्कवरी आवडते? समीरने आश्चर्याने विचारले....

मला आवडते की नाही ते सोड!.... पण तूझ्या ब्लॅक बेल्टला आवडत नाही ना बस!.... शांता पुन्हा... रागात...


आई!.... याचा अर्थ तुला डोरेमोन अजिबात आवडत नाही बरोबर?...समीर अंदाज करत म्हणाला.....


.... दुसरीला आवडत नाही म्हणून आपण ते चॅनल पाहायचे?... कमाल आहे बाबा तुमची दोघींचीही .. समीर पुन्हा आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.....


हे तूझ्या ब्लॅक बेल्टला सांग मला नको!..... शांता पुन्हा..रागात....


मीरा चांगली कराटे चॅम्पियन होती..... कराटे मध्ये तीने ब्लॅक बेल्ट मिळवला होता ......आता ती त्यांच्या सोसायटीतल्या मुलांचे कराटे क्लास घेत होती......


मीरा ब्लॅक बेल्ट धारी होती म्हणून शांता तीचा उल्लेख सूनबाई किंव्हा मीरा अस न करता ब्लॅक बेल्ट असाच करी! ....


मीराला सासुने ब्लॅक बेल्ट या नावाने हाक मारणे आवडत असे... कारण त्या गोष्टचा तिला अभिमान होता.....


बाबा!... एक मात्र आहे!...नशीब या दोघी वैचारिक वादा वादी करतात..... हाथां-पायी वर आल्या असत्या तर...आपले जगणे मुश्किल केल असत यांनी.... समीर काहीसा विनोदी स्वरात म्हणाला......

क्रमशः...

...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक