सासूबाई काहीच करत नाहीत

Sasu Bai
सासूबाई काहीच करत नाहीत

रमा फोन वर बोलत होती तर एकीकडे ती भाजी निवडत होती.. फोन कानाला आणि दोन्ही हात भाजी निवडायला अश्या अवघडलेल्या अवस्थेत ती तिचे काम करत होती... मान पूर्ण वाकडी करून बोलत होती ..सगळे लक्ष बोलण्यात होते..खूप दिवसांनी कोणाचा फोन आला होता कोण जाणे पण फार तंद्री लागली होती तिला..

मध्ये निवडलेली भाजी आणि भाजीचे मूळ यांचा पसारा झाला होता, कोणती निवडून झाली आणि कोणती निवडायची बाकी आहे हेच सरते शेवटी कळले नाही..आणि मग बघते तर काय काम कमी होण्या ऐवजी काम दुप्पट वाढून ठेवले.

पुन्हा मग तिने चांगली निवडलेली आणि खराब भाजी वेगळी करायला सुरुवात केली...तोपर्यंत इकडे घडाळ्याचा काटा पुढे पुढे सरकत होता.. एकीकडे दूध ठेवले ते उतू गेले होते... अंघोळीला पाणी काढलेले वाया जात होते... दारावर बेल वाजली ती वाजून वाजून बंद झाली होती...


काय आज हे झाले सगळे विस्मरण झाले होते जणू. कश्यात काही लक्ष लागत नव्हते.. तिला नेहमी टापटीप आणि आटोपशीर करण्याची सवय त्यात एक सोबत मी दोन तीन कामे सराईतपणे करू शकते ,मला तुमच्या मदतीची काही गरज नाही असे म्हणून मदत करणाऱ्या सासूबाईला तिने झिडकारून लावले होते..तिला तिच्या संसारात आणि घरात सासूबाईची उगाच लुडबुड नको होती..त्यांनी उगाच चुका दाखवायचा..सल्ले द्यायचे.. मग लक्ष ठेवायचे.. मुख्य म्हणजे ती घरातील समान ,पैसे जे आईला देत त्यावर त्यांची नजर नको पडायला म्हणून ती त्यांना तिच्या सगळ्या गोष्टी पासून दूर ठेवणे योग्य समजत..

आज सासूबाईने तिच्या सांगण्यावरून आपले सर्व लक्ष तिच्या कामातून काढून घेतले होते, त्या जणू ह्या घराला परक्या आहेत, आणि आता आपली कोणालाच गरज नाही आणि मग आपण उगाच अडगळ होऊन वृद्धाश्रमात आपल्याला पाठवून देण्या ऐवजी आपण लुडबुड न करणे हाच योग्य मार्ग आहे... फक्त मुलासाठी आलो आहोत तर मुलासोबत दोन शब्द बोलून आपले एका कोपऱ्यात बसून रहाणे...आणि जमले तर ती म्हणाली तरच कामासाठी मदत करणे ..

रमा आज चिडली होती, सासूबाईला म्हणत होती ," आई तुम्ही आता म्हताऱ्या झाला आहात तुमच्याकडून कोणते ही काम होत नाही, उलट दुप्पट वाढ करून ठेवतात ,तसे ही काही फुटले तर मला हे किती महागात पडेल ,तुम्ही आरामात समोर जाऊन बसत जा, मी तुमच्या हातात आयते ताट आणून देईल ,फक तुम्ही काही मदत करायला येऊ नका ."

आईला तेव्हा खूप वाईट वाटले, त्या मुलांकडे जाऊन बसल्या आणि डोळ्यात आलेले पाणी मुलाच्या नकळत पुसले, हुंदका गिळला,आणि म्हणाल्या , "अरविंदा तुला माझी अडचण होत असेल तर मला गावाला नेऊन सोड मी राहील तिकडे कशी बशी."

सासूबाई आपल्या नवऱ्याला आपल्या बद्दल सांगत आहे म्हणजे सकाळी जे मी बोलले ते गाऱ्हाणे करत असेल हे नक्की, असे समजून रमा सासूबाईवर अजून चिडली...

तसा हॉल मध्ये बसलेल्या अरविंद चा रमायला आवाज आला, तो तिला हॉल मध्ये ये म्हणून बोलवत होता..
"अग रमा आई काय म्हणते बघ, तिला काही बोललीस का तू ,ती तर गावी परत जायचे म्हणते ग "

रमा आता थोडी घाबरली होती,तिला वाटले अरविंद तिला रागावणार आणि आईची बाजू घेणार परत भांडण होणार आणि तो बरेच दिवस बोलणार नाही..

रमा "अरे आईला मी फक्त म्हणाले की तुम्ही काहीच काम करू नका, तुम्ही जरा काही आराम करा, कश्याला हात लावू नका उगी तोल गेला आणि काचेचे भांडे फुटले तर त्यांना हाताला लागायचे आणि जखम व्हायची ,एक तर त्यांना शुगर आहे ,जखम लवकर भरणार नाही, अश्यात काळजी वाटते ना म्हणून मी म्हणाले तुम्ही समोर जाऊन गप्पा मारत जा, tv बघत जा.. कामच काय ते मी बघेल..."

रमाने आता आलेली वेळ काही तरी समर्पक उत्तर देऊन मारून नेली, ती बोलली एक आणि सांगितले भलतेच...तिला काळजी वेगळीच होती.. ह्यात तिच्या बोलण्याने फक्त नवऱ्याचे समाधान झाले.. पण आईला ते बोलणे पटले नाही..पण तरी ती गप्प बसली होती...आता म्हतारपणात कोणाला स्पष्टीकरण द्यावे, कोण आपले स्पष्टीकरण ऐकून घेईल, कोणाला ते पटेल ही गत झाली होती... त्यापेक्षा गप्प बसलेले बरे..


तशी रमा हुशार आणि चालक होती, कुठे कधी कसा काय बोलून वेळ मारून न्यायची हे तिला चांगलेच माहीत होते, तिच्या आईने तिला शिकवले होते ,सासूला जास्त जवळ येऊ देऊ नको..तिचा वावर घरात कमीच ठेव..तिला लुडबुड करू देऊ नकोस... नाहीतर ती तर ती तिच्या लेकिला ही ती बोलावून घेईल...मग तू तुझ्याच घरात एकटी पडशील...

आज रमाने घरात काय काय कसे झाले याबाबत सगळी खबर बात आईला फोन करून सांगितली होती, सासूला तू जे जसे सांगितले तसे त्या प्रमाणे वागवत आहे ,त्यांना कोणत्या ही कामाला हात लावू नका असे सांगितले..म्हणून ती फोन वर बराच वेळ बोलत होती... त्या नादात दूध जळाले होते... गरम पाण्याची बकेट तशीच भरून वाहून गेली होती... तिने साडीला इस्त्री केली आणि तिच्या फोनच्या घाईत तिला साडी चे लक्षात ही नव्हते..आणि तिची भारी पैठणी जळाली होती.. नवरा बिना डब्याचा गेला होता... पिण्याचे पाणी तास भर होते ते येऊन गेले होते... तिच्या ऑफिस ची वेळ झाली होती आणि तिला नेणारी बस सुटली होती...

आता तिच्या गप्पा संपल्यावर तिला लक्षात आले ,पैठणी तर जळत आहे, पाणी वाहत राहिल्याने वाया गेले,दूध ही करपले होते... नवरा बिना काही खाता, बिना डब्याचा गेला आहे... तिची बस सुटली,तिला आज ऑफिस ला।उशीर झाला आहे...

आईचा परत फोन वाजत होता... त्यावर 5 मिस कॉल झाले होते... रमा हतबल झाली होती, आईने काय सांगितले आणि तिचे ताळतंत्र बिघडले... तिला कोणतेच काम जमत नव्हते.. त्यात तिची भारी साडी तिच्या मूर्खपणा मुळे जळून गेली..हे किती नुकसान झाले... थोडी सासूने मदत केली असती तर कुठे बिघडले असते.. माझे बोलणे इतके पण काय मनावर
घ्यायाचे त्यांनी की एका कामाला ही हात नाही लावला...साडी जळत होती ते ही सांगितले नाही त्यांनी..

त्यांना एक काम करायला नको का, मी एकटी कुठे कुठे पुरी पडणार आहे...सासुबाई ला काहीच काम करायचे नसते..

आईला परत फोन लावला आणि आता तिला रडू येत होते, "आई काय तू सल्ले देतेस ,तुझ्यामुळे मी सासूबाईला सगळ्या कामातून दूर ठेवले, आणि आता सगळे भोगावे लागत आहे, बघ जळाली माझी पैठणी तू दिलेली...पडला महागात तुझा सल्ला मला ,ते ही पन्नास हजाराला "

आई ,"तुला तुझे कळत नव्हते का ,की कोणाचे किती ऐकायचे ते ,तू आता लहान राहिली आहेस का, कर तुझे तू तुला काय करायचे ते, इथून पुढे मी तुला सल्ले देणार नाही "

आईने फोन ठेऊन दिला आणि इकडे रमा सासूबाईला मनवायला गेली ,ते ही त्यांच्या आवडीची कडक कॉफी घेऊन...तिला चूक कळली...आई प्रत्यक्षात मदतीला येऊ शकत नाही जितक्या सासूबाई तिच्या मदतीला येत..त्यांची लुडबुड नव्हती तर त्यांची साथ होती म्हणून ती वेळेत सर्व करून निवांत नौकरी करु शकत होती...

©®anuradha andhale palve