Feb 26, 2024
नारीवादी

माझे सासर सुरेख बाई

Read Later
माझे सासर सुरेख बाई


सकाळी सकाळी त्याने तिला उठवले ,ती दिवाळीच्या फराळाचे सर्व काम करून ,घराची सफाई करून दमून भागून कुठे रात्री 12ला झोपली होती , सासूबाई तिच्यावर निरीक्षण करायला...त्यात त्यांचा धाक ही तिला होताच...काही पदार्थ जे बिघडले ते ही पुन्हा पुन्हा तिच्याकडून करून घेत होत्या...घरात मुली असून ही तिच्या मदतिला कोणी ही पुढे आल्या नव्हत्या...म्हणून तिला अजूनच शारीरिक थकवा होताच..त्यात काम चांगले व्हावे याचा धाक...सासू ओरडत होती तो धाक...मानसिक तणाव...हे सगळे पहाता तिने भूक लागून ही वेळेवर जेवण करायचे टाळले...तिला अस्वस्थ वाटत होते...पण नवऱ्याने ,तिच्या आईने सांगून ठेवले होते आई सांगेन ते जमलेच पाहिजे...मग बाकी स्वतःचे दुखणे ह्या एक दिवस सांगायचे नाही...त्यात नवरा म्हणालाच होता ,काम करून वाटलेतर गोळी घेऊन झोप ,मी तुला लवकर ही उठवणार नाही , ती थकलेली होतीच, भूक ही मेली होती मग सगळे काम आवरल्यावर जरा उसंत मिळाली, तोपर्यंत सासुबाईची आणि घरातल्या सगळ्यांची एक झोप ही झाली होती...तिने स्वयंपाक घरातील राढा आवरला आणि झोपायला गेली, तोपर्यंत नवरा तिची वाट बघत जागा होताच, त्याने तिला ताट आणून दिले ,जेवू घातले ,तिचे पाय ठसठसत होते ,अंग खूप आकडले होते..त्याने तिच्या पायाची सूज पाहिली..आणि तिला iodex लावून दिले...तशी ती कधी झोपून गेली कळलेच नाही...तिने नवऱ्याचा मांडीवर डोके ठेवले होते..त्याने अलगद तिला झोपवले आणि तिला झोप लागल्यावर तो ही तिच्या ताटातले काही घास जेवून झोपला...निवांत झोपलेली होती...तिला सकाळी उशिरा जाग आली...इकडे घरातील बाकीच्या उठल्या आणि सगळ्या आवरा आवरीला लागल्या...तिची वाट न बघता सगळ्या जणी चहा नास्ता करून बाकीच्या कामाला लागल्या ही होत्या...काल काही कारणांमुळे बहिणी मदत करू शकल्या नसल्याने त्यांनी आज वहिनीला जरा निवांत झोपू दिले..सासुबाईने तिच्यासाठी तिचा आवडता नाशता केला होता...त्यांचे मणक्याचे ऑपरेशन झाले होते म्हणून कालच्या कामाचा बोज सुनेवर येऊन पडला...खरे तर त्या सांगत होत्या...ह्या वेळी दिवाळी बाहेरून आणून आणि साजरी करू
पण सुनेला हे सासूबाई कडून शिकायचे होते...त्यांची फराळाची परंपरा तिला जपून ठेवायची होती...मग तिने स्वतः हे अंगावर घेतले...

सुनबाई झोपली आहे ,हे समजल्यावर घरातील इतर लोकांनी गवगवा न करता ती इथपर्यंत बरेच काम इतरांनी वाटून घेतले होते...नवऱ्याने ही तिला उठण्यासाठी आवाज दिला नाही..तसे त्याला त्याच्या आईनेच सांगितले होते....पण सून ही कमाल बंधनात होती...बंधन म्हणजे दरवेळी त्रासिक बंधन असे बंधन नाही तर प्रेमाचे बंधन...वेळोवेळी तिला ह्या परिवाराकडून मिळत गेलेले प्रेम...ती माहेरपेक्षा सासरी आंनदी होती..

आज निवांत झोप झाली...आणि सून उठली...तिला कळलेच नाही की नऊ वाजले...आणि मला अशी झोप लागली..ती पटकन उठली आणि स्वतःचे आवरून खाली आली..सगळे आपापल्या कामात व्यस्थ होते...घरातील बाकी राहिलेली काम पूर्ण झालेली दिसत होती...सासूबाई कश्या बश्या उठून तुळशी पूजा करत होत्या..नणंदा घराचे पडदे लावत होत्या..नवरा छोटीला रांगोळी काढायला मदत करत होता...सासरे घराला तोरण तयार करत होते...ती लगबग करत होती...आपल्यासाठी एक ही काम नाही...याचे तिला वाईट वाटले...काल थोडा त्रास झाला होता आपल्याला तेव्हा आपण सासरचे ते सासरचे, माहेरचे ते माहेरचे मनोमन म्हणत होतो, आई असती तर मला काम करू दिले नसते, मदत केली असती...बाबा असते तर मला काही करू लागले असते..माझ्या बहिणी बसून राहिल्या नसत्या..त्यात मी थोडे जास्त काम पडले तर सासरच्यांना खूप नावे ठेवत होते पण आज मला माझ्या विचारांची लाज वाटत आहे...

तिला कधी काळी आईने ग्लासभर पाणी टाकून उठवले होते ,बहिणीने तर जरा ही मदत केली नव्हती हे आठवले होते..भाऊ स्वतः झोपा काढत तरी ही आई तिलाच उठवत..मोठी आहेस घरातली तू मग तुलाच हे काम करणे गरजेचे आहे हे आई तिला नेहमी ऐकवत...आणि तरी मी म्हणते माहेर चांगले..पण सासर ही नक्कीच वाईट नाही हे तिला आजच्या झाल्या प्रकारातून कळले.

तिने तोंड धुतले आणि स्वयंपाक घरात सगळ्यांसाठी नाश्ता करायला म्हणून गेली तर तिथे तिचाच नाशता तयार होता..बाजूला काजू कतली तिची आवडती मिठाई फाऊं तर काय बोलावे आणि काय समजावे असे झाले होते...मन स्वतःच्या वागण्याला आणि आपण सासरच्यां विषयी केलेल्या विचार ह्या बाबत खात होते...सासर आहे म्हणून सासर वाईट असते हा विचार तिला स्वस्त बसू देत नव्हता..

तिने लगेच जाऊन सासूबाईला मिठी मारली..डोळ्यात पाणी होते...आणि म्हणाली आई आज मी उशिरा जागी झाले...

सासुबाईने तिला काय म्हणायचे याचा काही अर्थ लावला नाही पण तिला ही सांगितले, जश्या माझ्या ह्या दोन मुली आहेत ना तशीच तू ही एक आहेस बाकी मला माहित नाही ..तुझ्यासोबत कधी दुजाभाव करणार नाही..

तिला खऱ्या अर्थाने सासरचा अर्थ आज कळला....कोणाचे तरी सासर वाईट आहे म्हणून आपण आपले सासर ही वाईट असे समजणे चुकीचे आहे
©®अनुराधा आंधळे पालवे


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//