सासर माझं सुरेख बाई भाग १

Family bonding

रश्मीसाठी आई बाबा स्थळ बघत होते, रश्मीच्या अपेक्षेप्रमाणे तिला हवा तसा जोडीदार मिळत न्हवता..येणाऱ्या प्रत्येक मुलाला रिजेक्ट करत होती, आई बाबांच्या नकी नऊ आले होते...तेव्हाच लग्न करणार मला हवा तसा जोडीदार मिळेल ,जो माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.....

एक छान स्थळ आले तिला ,मनोहर नाव होते त्याचे, आई, वडील, एक   लहान भाऊ आणि बहीण......खरं तर रश्मी एकुलता एक मुलगा  पाहात होती....पण मनोहर तील आवडला....म्हणुन तिने लग्नाला होकार दिला....मनोहर आणि रश्मी दोघ एकमेकांना भेटत होते ....मनोहर शांत स्वभावाचा होता.....रश्मी बोलकी.रश्मीला कळलं होतं की मनोहर मनाप्रमाणे आयुष्य जगू देईल...पण मनात विचार करायची.घरात एवढी माणस त्यांच्यासोबत adjust करावे लागेल.. हे तिला मान्य न्हवते, तिला ह्याबाबतीत अजिबात compromise करायचे न्हवते......


गोड बोलून मनोहरला तिने ,माझी मुंबईला  बदली होत आहे असे सांगितले.....तर आपल्या दोघांना मुंबईलाच जावे लागेल सांगितले......मनोहरने तिला आपण लग्नानंतर मुंबईलाच जाऊ असे सांगितले....रश्मीच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले.....ती स्वप्न रंगवू लागली... राजा राणीचा संसार करायचा होता तिला......


लग्न झाले ,मनोहर आणि रश्मी हनिमूनला गेले...मनोहरने तेव्हा तिला आपण मुंबईला आठ दिवसाने शिफ्ट होऊ सांगितले....आणि four bhk पहिला आहे........रश्मी म्हणाली  आपल्या दोघांसाठी four bhk कशाला?????

मनोहर:आपण दोघे कुठे ??सगळेच येणार आपल्याबरोबर...

रश्मी: पण बाबांचा व्यवसाय इथेच आहे ,ते कसे काय येऊ शकतात.आणि तुमच्या भावा ,बहिणीचे शिक्षण चालू आहे ..मग कसं शक्य आहे ते???

मनोहर: बाबा आता ती जबाबदारी, काकांकडे सोपवणार  आहे..नकुल आणि स्पृहाचे मुंबईमध्ये शिक्षण होईल आता....


रश्मी: मला हे मान्य नाही.......

मनोहर:काय मान्य नाही???

रश्मी: मला सर्वांसोबत नाही राहायचे, मला फक्त तू हवा आहेस..

मनोहर:काय बोलते आहेस  तू??तुला माझे आई बाबा नको,का पण???

रश्मी: मी लहानपणापासून एकटी वाढले आहे..आणि मला नाही अवडत जास्त लोकांमध्ये राहायला..
 
मनोहर:please असे काही बोलू नको....... तुझ्यासाठी मीसुद्धा ट्रान्सफर केली...आणि तुला काही त्रास होणार नाही....घरात सर्व कामाला नोकर चाकर  असतील...

रश्मी: तरीही ,मला कम्फर्ट नाही वाटणार.. एक काम कर तू आई बाबांना बोल की ,तुम्ही इथेच राहा.....

मनोहर:ते शक्य नाही.....एकत्रच राहावे लागेल तुला....मी माझी जबाबदारी नाही झटकू शकत....

रश्मीला कळून चुकलं सोप्प नाही वेगळं राहाणे... तरी ती मनोमन हाच विचार करत राहिली कसं वेगळं व्हावे???.......


मनोहर होईल वेगळा परिवारापासून ?काय होईल पाहू पुढच्या भागात..

अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास नक्की मला फॉलो करा.... लाईक ,शेअर,कंमेंट करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all