सर्व स्वप्नांची यादी

काल्पनिक आभासी स्वप्नांमधे रमणाऱ्या किंवा मग वास्तविकतेला धरून असणारी स्वप्ने जगणाऱ्या दुन??

( आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा ☺??) 

खरंच सर्व स्वप्नांची यादी करता येते का बरं ???

         काहींना असते सवय अशी. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना यादी रूपात स्वतःजवळ ठेवतात.
         काहींना मानसिक सुख देणाऱ्या गोष्टींची यादी करणं पसंत असतं तर काहींना भौतिक सुख देणाऱ्या गोष्टींची यादी करणं. काहींना दैनंदिन जीवनात काय करायचे या गोष्टी नोंद कराव्या वाटतात तर काहींना ठराविक पण महत्त्वाच्या गोष्टी नोंद करणं.



यात स्वप्न कुठून आलं मग ???

      मुळात प्रत्येकाचा दृष्टीकोन  याला कारणीभूत ठरतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण स्वप्न तर काहीही असू शकते ना .
      कोणाला त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी सुद्धा स्वप्नवत भासतात. जसे की एखादी नेहमीचीच गोष्ट जी त्या एका विशिष्ट साच्याहून वेगळी घडणं , आपण म्हणू शकतो की काही प्रमाणात त्या नेहमीपेक्षा सुद्धा जास्त चांगली होणं ; म्हणजे एक स्वप्न वाटू लागते. बऱ्याच गोष्टींसोबत आपण हे जुळवून बघू शकतो. कारण कित्येक गोष्टी अशा होतात की आपण नक्कीच त्यांना त्या स्वप्नांच्या यादीत पाहणं अपेक्षित करू शकतो.



           भौतिक सुख ही जणू काळाची गरज झाली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण बदलत्या काळानुसार आणि जीवनशैलीनुसार काही गोष्टी अगदीच गरजेच्या झाल्या आहेत. कुठे तरी जायचंय म्हणून गाडी हवीये, कशासाठी तरी चांगले कपडे हवे आहेत , इलेक्ट्रॉनिक गोष्टी हव्या आहेत ,सुखसोयींनी भरपूर असलेलं जीवन जगायला अश्या अनेक गोष्टी पाहिजे आहेत.

गरजा पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी हव्यात.


मोठेपणा किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी पण काही गोष्टी हव्यात. ही यादी तर संपता संपत नाही. कारण रोज एक नवी इच्छा, एक नवीन अपेक्षा मनात जन्म घेत राहते. आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्वप्नांची यादी तर वाढतचं राहते.



        मानसिक सुख देणाऱ्या स्वप्नांची यादी तर फार अनोखी असते. हो, अनोखीच म्हणेल मी. कारण त्यात बऱ्याच अंशी मनाला समाधान मिळेल असेच काही असते. आणि त्यात न कोणता स्वार्थ असतो ना कोणता अपभाव.
     कोणाला निसर्गात रमण्यात समाधान मिळते तर कोणाला आवडी जपण्यात.
      कोणी मदत करण्यात समाधानी असते. तर कोणाला इतरांमध्ये मिळून मिसळून राहण्यात .
      अश्या कितीतरी गोष्टी मानसिक सुख देतात. आणि ते समाधान मिळवण्याची आस जन्म देते काही स्वप्नांना.!


          निसर्गाची ओढ असणाऱ्यांच्या यादीत भर पडते निरनिराळ्या ठिकाणांची, तिथली रम्यता स्वैर करण्याची.
आवडीच्या ओढात वाहणाऱ्यांना त्या प्रकारातल्या विशिष्टतेची स्वप्न ओढ लावतात.
तर काही लोक समाजासाठी स्वप्न बघतात.

या सर्व स्वप्नांची पूर्तता करताना मिळते आत्मिक समाधान..!!!


एक मात्र खरं , काल्पनिक आभासी स्वप्नांमधे रमणाऱ्या किंवा मग वास्तविकतेला धरून असणारी स्वप्ने जगणाऱ्या दुनियेत स्वप्नं ही असावीचं.!!
-©®कामिनी खाने.