Jan 26, 2022
नारीवादी

सर्व अपेक्षा स्त्री कडूनच का?

Read Later
सर्व अपेक्षा स्त्री कडूनच का?

सुलभाच्या नावाचा पुकारा झाला, सुलभा स्टेज वर जायला निघाली, आज तिच्या पुस्तकाला सर्वात जास्त खपाचा अवॉर्ड मिळाला होता, एक वेगळाच आत्मविश्‍वास होता तिच्या चेहर्‍यावर,

स्टेज वर गेली ती, सत्कार झाला, सुलभा बोलायला उभी राहिली,

"प्रिय वाचक... आज मी जे आहे ते तुमच्या मुळे, लिहिण्याची प्रेरणा ही तुम्ही वाचता म्हणून मिळते, रोज बरेच पत्र येतात त्यावरून तुमच माझ्यावरच प्रेम दिसून येते, या पुढे मी असच छान लिहिण्याचा प्रयत्न करेन,तुमची अशीच साथ राहू द्या" ,....... धन्यवाद,

कार्यक्रम संपला, सही घेणाऱ्यांचा विळखा सुलभा भोवती पडला,

ऑटोग्राफ प्लीज..... आवाज ओळखीचा वाटला.... प्रदीप होता तो,

सुलभा मला बोलायच आहे तुझ्याशी, प्लीज, तुझा पत्ता दे,... प्रदीप

आता काय बोलण्यासारखं राहिल नाही प्रदीप, तू तुझं निर्णय घेतला त्या दिवशी, आता इथे गोंधळ नको... या तुम्ही,.... सुलभाला राग आला होता

एकदा भेट प्लीज ,....

काय हवय आता प्रदीपला?.... सुलभा विचार करत होती

तुम्ही उद्या फोन करा मी देते वेळ, नाईलाज झाला होता तिचा,

सुलभा घरी आली,

कसा झाला काकू प्रोग्रॅम? , महिला सबलीकरण केंद्र मधील रेणूने विचारल,

छान झाला ग, ये इकडे बस जरा, मला बोलायच आहे तुझ्याशी ,

बोला काकू.... thank you रेणू, हे घे तुला चॉकलेट माझ्या कडून,

चॉकलेट घेते मी काकू पण thank you काय. अस काय केलाय मी? , हे जे यश तुम्ही मिळवल ती तुमची मेहेनत आहे,.... रेणू

तूच मला जगण्याचा बळ दिलं, आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे,..... सुलभा

जाऊ द्या ना काकू तो विषय, नको बोलू या, आज ठरलय ना आपल पार्टीच,... रेणू उत्साही होती

हो.... मग प्रॉमिस दुखी नाही व्हायच आता.... तयार व्हा मग 8 वाजता....

रेणू गेली तशी सुलभाच मन भूतकाळात गेल,

नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती सुलभा , पुढे शिकायचं होत पण पाठी दोन बहिणी

बाबा बोलले आता जे करायचा ते स्वतःच्या घरी करा, शेवटी मुलगी ती परक्याच्या धन, सगळ्या अपेक्षा तिच्या कडून ठेवायच्या, शिक्षणापेक्षा लग्न महत्त्वाच, एक दोन छान स्थळ सांगून आले,

प्रदीप बँकत कामाला होता, बेताची परिस्थितीत, सासरे वारले होते, सासूबाई नवरा दोघेच घरी, सासुबाईंनी मोठ्या हिमतीने मुलाला लहानच मोठा केला होता म्हणून की काय जरा जास्त हक्क गाजवत होत्या त्या प्रदीप वर, तो ही अति आई वेडा होता ,

त्यात सुलभाला वावग वाटला नाही, जाऊ दे आई आहे, तिच नाही ऐकणार तर कोणाच ऐकणार

दोन महिन्यानी साधे पणाने लग्न झाल, माहेरी वडलांनी सांगितल उठ सुट माहेरी यायचं नाही, निभावून ने आता तू तिकडे सगळ,

हो बोलली ती,

सुलभाला सासरी आल्या आल्या तिला सुचना मिळाल्या... हे करायच, अस रहायच, भाजी अशीच करायची वगैरे सगळ अगदी नियमात काटेकोर,

हो बोलली ती, अगदी सांगितल तसच वागु लागली, प्रदीप तिच्या मागे मागे असायचा... हेच खटकला सासुबाईंना हिला बोलायला जागाच नाही, सगळ कसा परफेक्ट

लग्नाला तीन वर्ष झाले आता सासुबाई मागे लागल्या, त्यांना आजी व्हायच होत, प्रयत्न तर सुरू होते, पण तरी मूल होत नव्हता, डॉ कडे जायच ठरवल त्यांनी तपासण्या झाल्या, दोघ ही नॉर्मल आहेत, होईल जेव्हा व्हायच मुल तेव्हा होईल , दोघांनी नॉर्मल रहायच ठरवल

प्रदीप मी पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन घेवू का? सुलभाने विचारल..... हो बोलला तो,

पण सासुबाई बोलल्या बस झालं शिक्षण वगैरे आधी घरात लक्ष द्या,

आई अग शिकू दे तिला काय करेन घरी तरी ती? ,..... प्रदीप आईला समजावत होता

नाही म्हणजे नाही सासुबाई ऐकायला तयार नव्हत्या,

प्रदीप बोलला.... जाऊ दे , पुष्कळ झालं शिक्षण, आई बोलते तसं करूया का?

जाऊ दे म्हणजे काय .. त्यांच ऐकायला हव का? चुकीच्या गोष्टीला कश्याला समर्थन करताय,अश्याने चुका करणार्‍याला वाटत आपण बरोबर आहोत नेहमी... सुलभा चिडली

जसा वेळ जात होता सुलभाचा छळ वाढत चालला होता, उठता बसता सासुबाई तिला बोलत असत, तिने काहीही केलेल आवडत नसे,

प्रदीपला आवडत नव्हत आईच वागण पण त्याचा नाईलाज होता, आई पुढे काही चालत नव्हता, हेच तर चुकलं होत त्याच

एक दिवस पाहुणे आले घरी, सासुबाईंनी प्रदीप साठी स्थळ बघीतल होत, ते लोक गेल्यावर प्रदीप चिडला, खूप भांडण झालं,

तू हे लग्न नाही केल तर मी माझ्या जिवाचा बर वाईट करून घेईन, आईला वंशाच्या दिवा हवा होता...

नेहमी प्रमाणे प्रदीपचा नाईलाज झाला, जुने विचार सोड आई आपण मुल दत्तक घेवू,

मला चालणार नाही..... आई हेका सोडत नव्हती,

पण सुलभा कुठे जाईल,..... प्रदीप अगदी अगतिक झाला होता,

कश्याला कुठे जाईल ती पडून राहीन एका कोपर्‍यात,

हे आता अति झालं, सुलभा बाहेर आली, हे लग्न होणार नाही, मला मान्य नाही, सुलभा चिडली होती,

तुला कोणी विचारलं ग? सासू बाई रागात होत्या, मुल होवू शकत नाही तुला आणि तोरा किती, बघीतल का कशी बोलते ती प्रदीप,

दोषी कोण आहे आमच्यात अजून ठरलं नाही ह सासुबाई आणि होईल मुल एवढी घाई काय आहे तुम्हाला,

सुलभा तू शांत रहा मी बघतो काय ते, तू तरी समजुतीने घे,.... प्रदीप

मला समजावण्यापेक्षा आईंना सांगा जरा, मी शांत होते इतके दिवस, आज नाही पण, एक तर मी राहीन इथे किंवा ती नवी नवरी , आई अति करतात तुम्ही त्यांना काही बोलत नाही, आधी पासून बोलला असता ही वेळ आली नसती, त्यांना वाटत त्या जे करतात तेच खर, समज द्यायला हवी त्यांना, या पुढे या घरात हा विषय नको, नाही तर आपण वेगळ राहू प्रदीप, मला आता खूप त्रास होतो या गोष्टीचा,

अग अजून लग्न व्हायच आहे सुलभा, एवढ नको टोकाला जाऊ, आणी तू काय बोलतेस सुलभा... जरा तिचा मान ठेव, वयाचा विचार कर, नाही मी नाही सोडू शकत आईला,

त्या माझ्याशी कस वागतात ते नाही का दिसत? मग मी गेले तर चालेल का? .... हो चालेल , प्रदीप चिडला होता ,

तशीच सुलभा आत गेली बॅग भरली घरा बाहेर पडली,

प्रदीपला वाटल कुठे जाईल जावून माहेरी जाईल, उद्या समजावून घेवून येवू

सुलभा निघाली स्टेशन वर आली, जी ट्रेन मिळेल त्यात बसली, गाडी सुरू झाली, आता मात्र तिचा बांध फुटला रडायला लागली ती, एवढ केलं या लोकांसाठी काय मिळाले हातात? बाकीचे जाऊ दे प्रदीपला ही माझी काळजी नाही की प्रेम नाही, फक्त मुल होण्यासाठी हवी आहे का मी? बाकी माझा काही उपयोग नाही का? एवढ्या रात्री मी निघाले घराबाहेर साध मागे ही आले नाहीत ते, जाणार कुठे पण आपण बाबांनी आधीच माहेरचा रस्ता बंद केलाय मला

समोरच्या सीट वर रेणू बसली होती, तिने धीर दिला, कुठे जायचा आहे काकु, कोण आहे सोबत? ,

सुलभा काही बोलत नव्हती नुसती रडत होती,

तुम्ही माझ्या सोबत येणार का? निराधार महिलांसाठी केंद्र आहे तिथे राहते मी, सुलभा हो बोलली, आपल्या सोबत महिला सबलीकरण केंद्रात घेवून आली ती सुलभाला

सुरुवातीला एक महिना सुलभा कोणाशी बोलायची नाही, एक टक बाहेर बघत रहायची, मध्येच रडायला लागायची, लक्ष्मी काकू यायच्या तिथे स्वैपाकाला, त्या बोलल्या सुलभा तू ये रोज माझ्या मदतीला, यातून त्यांना सुलभाला दुःखातुन बाहेर काढायचा होतं, खूप आधार दिला तिला त्यांनी, हळू हळू त्यांना स्वैपाकात मदत करत गेली सुलभा, त्यांच्याशी रोज बोलून मन मोकळ झालं,

थोड्या दिवसात नॉर्मल झाली ती, पुढे काय मोठा प्रश्न होता,

पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन घेतली, केंद्रातल्या मॅडम ने पैशाची मदत केली, स्वैपाक छान करायची ती त्यामुळे त्याचे थोडे पैसे मिळायचे , सोबतीला लिखाण सुरू केल, दिवस फटाफट गेले, कोणाचा कोणा वाचून अडत नाही, आता तर प्रदीप आणी त्याच्या आईची आठवण ही येत नव्हती तिला, माहेरी तर लग्न झाल्यापासून मदत मिळण कठीण होतं, सावकाश शिक्षण पूर्ण केल, केंद्रात संचालिका झाली आता सुलभा त्या सोबत कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून लागली, बर्‍याच मुलींचा आधारस्तंभ आहे ती,

आणि आज अचानक प्रदीप दिसले, आता का भेटायचा असेल त्यांना मला ? , लग्न केल असेल का त्यांनी? , जाऊ दे आपल्याला काय, केल असेल तर करू देत, बोलून घेवू थोडा वेळ,

दुसर्‍या दिवशी प्रदीपचा फोन आला, भेटायला गेली ती,

तुझं खूप अभिनंदन सुलभा, मोठी लेखिका झालीस, मला माहिती नव्हते तुझे हे गुण, सुरेख लिहितेस तू, मी तुझे सगळे पुस्तक वाचले,

थँक्स सुलभा बोलली, जेव्हा मनात खूप साचत ना ते कागदावर खूप छान प्रकारे उमटवता येतं, गुण तर प्रत्येकात असतात फक्त योग्य वेळ आणि संधी मिळाली की बहरतात,

अगदी साहित्यिक बोलायला लागलीस तू सुलभा, पण तू मला विसरलीस,.... प्रदीप

तुम्ही बोलताय हे, कोणी कोणाची साथ दिली नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि मला ही, जाऊ द्या मला ह्या विषयावर बोलायच नाहीये, मी आलीच का इथे मी जाते बाय,.... सुलभा

एक मिनीट थांब, प्लीज, आपण एकत्र राहू या का? मी तुला खूप मिस करतो रोज, आई कशी आहे हे नाही विचारला तू?... प्रदीप

काय अर्थ आहे आता या सगळ्याचा, सुलभा बोलली, मला या सगळ्यात पडायच नाहिये, तुम्ही निघा आता, मला काही ऐकायच नाहिये... नकोच ते..... तू हिला विचारला नाही... हे केल नाही... ते केल नाही, मी यातून बाहेर पडले, जेव्हा गरज होती तेव्हा एकट टाकला मला,

आई महत्त्वाची आहे हे मान्य आहे पण बायकोला ही थोडा महत्त्व दिल असत तर बरं झालं असतं , ती आपल पूर्ण घर परिवार सोडून येते... पूर्ण आयुष्य तुमची सेवा करते ते ही अश्या फॅमिली साठी जे तिला कधीच आपल मानत नाही, तिला आधी कस्पटासमान समजायच हव तस वागायच, हव तेव्हा सोडून द्यायच, परत करमत नसल की बोलायच राहु आपण सोबत, तुम्हाला काय वाटलं तुम्ही म्हणाल तेव्हा सोबत राहू, जा म्हणाल तेव्हा निघून जायचं, अस बर? आता होणार नाही अस, आता मला माझा जग आहे, माणस आहेत, मी मजेत आहे, मला संसारात काडीमात्र इंट्रेस्ट नाही आणि अश्या स्वार्थी लोकांची सोबत तर नकोच,

नाही ग सुलभा असा नाहिये, मान्य आहे मला मी तुला गृहीत धरले, तू गेल्या नंतर किती शोधल तुला, आई किती रडायची, सगळीकडे फिरलो, तू सापडली नव्हती तर आईने धसका घेतला, अंथरुणावर धरलाय, तुझा घोष लावलाय ,.... प्रदीप

ओह ओके या साठी मी यायला हव का? , तूम्हाला मी नकोय आई बोलते म्हणून इकडे आलात का? , खर तर तुमच्या सारख्या लोकांनी लग्न करायला नको, आई सोबत आयुष्य काढायच, उगीच एकाद्या मुलीचं आयुष खराब करतात तुम्ही,

सुलभा तू समजून घेणार नाहिये का? मला तुझी गरज आहे , काय करू म्हणजे तुला खर वाटेल? आईने सांगितलं त्या प्रमाणे लग्न ही केल नाहिये मी... प्रदीप

मला का सांगताय पण हे सगळ, मला अजिबात इंट्रेस्ट नाहिये, सॉरी मी येवू शकत नाही, तुम्ही निघा, या पुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका.. सुलभा उठून चालायला लागली

रेणू तिथून जात होती, रेणू अग रेणू थांब,

काकू काय करताय ईकडे? काही नाही ग, एक वाचक आले होते भेटायला, चल मला घेवून आपल्या घरी, आपल्या संस्थेत, थकली आहे आज मी,

खूप दिवसांनी मनातल सगळ बाहेर निघाल, फार बर वाटतय , काय बोलताय काकू? चला अश्या एकट्या फिरत जाऊ नका,

सुलभा रेणू निघाल्या आपल्या हक्काच्या घरी आपल्या संस्थेत...... एकमेकांच्या आधाराने तिथे त्या आरामात निवांत राहणार होत्या...... या स्वार्थी जगापासून लांब...... तिथे त्या सुखी होत्या..... कोणाला उत्तर द्यायला बांधील नव्हत्या..... आपले पंख हवे तसे पसरवणार होत्या..... मुक्त विहार करणार होत्या.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now