सरत्या वर्षाला निरोप देताना

Poem For New Year Competition
प्रिय, खरेतर तुला प्रिय म्हणू कि अप्रिय उमजतच नाही....
पण आपल्याकडे सगळ्यांनाच प्रिय म्हणायची पद्धत आहे,
तर प्रिय २०२१, निरोप तुला देताना,
येते सय या वर्षी गमावलेल्या जीवलगांची,
तू दिलेल्या धक्क्यांची,
त्यातून सावरलेल्या क्षणांची,
पण... शेवटी आयुष्य कोणासाठीच थांबत नाही हेच खरे,
गमावलेल्या , दुरावलेल्या सगळ्यांना विसरून पुढे जातच रहायचे..
नवे स्वप्न नवी आशा मनात बाळगून
२०२२ चे स्वागत करायचे...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई