सारिका - ( भाग - 3 )

Sarika


          सारिका आणि योगेश ची रोज चं भांडण होऊ लागली होती, सारिका त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करत होती, पण योगेश काही ऐकून चं घेत नसे. सारिका ला खूप वाटत असे, माहेरी हे सगळं सांगावं पण आपण स्वतः घरच्यांना न सांगता हा लग्न करायचा निर्णय घेतला आहे मग निभाऊन नेवूया, असं तीला वाटत असे.

         असच वर्ष निघून जातं, आणि सारिका गरोदर राहते, योगेश पण ही बातमी कळल्यापासून चांगला वागत असतो. सारिका आई ला पण कॉल करून सांगते कि तुम्ही आजी - आजोबा होणार आहात. आई - बाबा पण खूप खुश होतात. योगेश ने पण हल्ली त्याची व्यसन कमी केलेली असतात.

       योगेश ला एक खूप घाणेरडी सवय असते ती म्हणजे बाईक खूप फास्ट चालवायची, त्याला बाईक फास्ट चालवण्याचं वेड चं होत, स्पीड खूप असायचा त्याच्या गाडीचा, सारिका खूप वेळा त्याला ओरडत असे, पण योगेश तीच बोलणं उडवून लावत असे, काही होत नाही गं मला...असं बोलून विषय बदलत असे.

       सारिका ची आई बोलते तू सातव्या महिन्यात इथे येशील ना तेव्हा सारिका ला काय उत्तर द्यावे ते समजत नसते, मी माहेरी गेल्यावर योगेश अजूनच बिनधास्त होईल जरा कुठे त्याच्या वाईट सवयी सुटल्या आहेत त्या पुन्हा चालू होतील असं सारिका ला मनापासून वाटत होत.

        सारिका आई ला बोलते कि आई मी नाही येणार अग आमच्या इथून माझं ऑफिस जवळ आहे, मी नवव्या महिन्यापर्यंत ऑफिस ला जाणार आहे आणि डिलिव्हरी नंतर तीन महिने सुट्टी घेणार आहे, त्यामुळे आपल्या घरापासून ऑफिस ला जायला मला त्रास होईल, म्हणून मी नाही येत आहे,......आई बोलते बरं ठीक आहे, पण बाळ झाल्यावर मी तुझं ऐकणार नाही आहे. तेव्हा यायचस हा नक्की तू माहेरी, सारिका आई ला हो चालेल बोलून वेळ मारून नेते.

       सारिका नववा महिना लागल्यावर ऑफिस ला जायचं बंद करते, आणि आठ  चं दिवसात तिची डिलिव्हरी होते, तीला गोंडस मुलगा होतो. तिचे आई - बाबा, भाऊ सगळेच त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये योगेश ला भेटतात. योगेश पण सगळ्यांशी नीट बोलतो. योगेश चे पण आई - वडिल आलेले  असतात त्यांच्या शी पण योगेश सर्वांची ओळख करून देतो.

      सारिका ला पाच दिवसांनी घरी  सोडण्यात येत, सारिका ची आई बोलते मी सारिका ला माहेरी नेऊ का एक महिन्यासाठी, योगेश पटकन बोलतो हो आई न्या तुम्ही तीला, तीला पण तिकडे आराम मिळेल असं बोलतो त्यामुळे सारिका ला तिथे काहीच बोलता येत नाही. सारिका काळजीत पडते कि हा एकटाच नीट राहील ना, दारू तर पुन्हा पिणार नाही ना पहिल्यासारखी रोज असा विचार करत असते. सारिका च्या घरचे हॉस्पिटल मधून चं सारिका आणि बाळाला त्यांच्या घरी घेऊन जातात. बारा दिवसांनी सारिका च्या माहेरी चं बाळाचं बारसं करण्यात येत. बाळाचं नाव - श्रेयस ठेवण्यात येत.

     योगेश च्या घरचे पण बारशाला येतात, सगळा कार्यक्रम खूप छान पार पडतो. सारिका योगेश निघताना त्याला सारखी बोलत असते नीट रहा, काळजी घे स्वतः ची. जपून गाडी चालव. योगेश हा ग बाई मी राहीन नीट असं बोलून निघतो.

      सारिका माहेरी असल्यामुळे , इकडे योगेश बिनधास्त होतो, मित्रांबरोबर फिरणं, पार्टी करणं, थोडे दिवसांनी पुन्हा चालू होत. सारिका त्याला फोन करून विचारत असते पण तो मी नीट राहतोय गं तू तिथे आराम कर असं चं नेहमी बोलत असे. सारिका नेहमी फोन ठेवताना बाईक हळू चालव, असं आवर्जून त्याला सांगत असे.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत योगेश च्या ह्या फास्ट गाडी चालवण्या च्या सवयीमुळे काय नुकसान होते ते ).

🎭 Series Post

View all