सप्तपदी कि तप्तपदी भाग3

Story Of Married Couples
सप्तपदी कि तप्तपदी

काल आपण पाहिले कि निशा आणि शशांकचा 25 वर्ष चाललेला संसार आणि अचानक आलेले त्याचे आजारपण.. आता पुढे वाचूया...



सगळे घरी गेल्यावर निशा एकटीच शशांकचा हात हातात घेऊन बसली होती. एवढ्यात तिला शशांकचे ओठ हलताना दिसले. तिला खूप आनंद झाला. ती डॉक्टरांना बोलवणार इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले "प्रिया आय रिअली लव्ह यू. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आपण करू काहीतरी."
हे ऐकून निशाच्या पायाखालची जमीनच हादरली. अक्षरशः तिचे जग उलटसुलट झाले.. काय करावे हेच कळेना. २५ वर्षांच्या संसारानंतर याला दुसरीकडे जायचे आहे. हळूहळू तिला एकएक घटना आठवायला लागल्या.
" मिस, तुम्हाला काही सांगायचे आहे."
" बोलाना, काही अडचण आहे का? कोणता टॉपिक समजला नाही का?"
"नाही मिस , शिकवलेले सगळे समजते. पण शशांक सर."
" काय झाले? सर काही ओरडले का?"
"नाही मिस, सर ना रश्मीला बॅड टच करत होते. सांगना तू रश्मी."
" हो मिस, त्या दिवशी तुम्ही नसताना ते मला टच करत होते. आणि प्रिया मिस आल्यावर एकदम घाबरले. "
" मी बघते. तू अजून कोणाला काही सांगितलेस का?"
"नाही मिस. मी जर हे घरी सांगितले तर कोणी मला इथे येऊ देणार नाही. आणि मला तुम्ही शिकवलेले खूप आवडते."
"Thank you बेटा. मी बघते हे सगळे. आणि अस काही परत झाले तर न घाबरता मला सांगायचे. ओके?"
" ओके मिस, thank you मिस."
"शशांक, तुझे रश्मीकडे काही काम होते?"
" नाही का ग? ती तुला काही बोलली का?" शशांक थोडा घाबरला होता.
"तू बोलण्यासारखं काही केले आहेस का? हे बघ त्याच काय कोणत्याही मुलीसोबत काहिही वाईट झालेले मला चालणार नाही. मी आज त्या मुलींची समजूत काढली आहे. पण परत हे असे नको."
" हो, मला माहीत आहे. हा क्लास तुझा आहे. सगळे तुझेच आहे ."
"तू भांडतो का आहेस? तुझी चूक झाली तू मान्य कर. आणि हे परत होऊ देऊ नकोस. विषय संपला. आणि अजून एक त्या प्रिया पासून थोडा लांबच राहा."
"हे बघ, ती एकटी आहे, म्हणून मी तिच्यासोबत बोलतो एवढेच."



"शशांक, माझे दागिने पाहिलेस का? काहीच सापडत नाही."
"अग, ठेवले असशील असेच कुठेतरी."
"पण काहीच सापडत नाहीये. मला कळत नाही, कपाटाला कुलूप असताना कसे शक्य आहे?"
"ठिक आहे, शोधतो मी."


"निशा, अग पोलीस म्हणत होते कि तक्रार करून काहीच फायदा नाही. दागिने मिळण्याची काहीच शक्यता नाही."
"ते दागिने माझ्या आईबाबांनी दिलेले होते.कसे विसरू?"


"प्रिया , एक मिनिट, तुझे कानातले बघू"
"मॅम बघा ना , तुमच्या कानातल्याची डिझाईन मला आवडली होती आणि अगदी तसेच ट्रेनमध्ये विकायला आले होते. लगेच घेतले."
हे आणि असे अनेक प्रसंग निशाच्या डोळ्यासमोरून जात होते.. क्षणोक्षणी झालेली फसवणूक नव्याने जाणवत होती. मन अगदी बधीर झाले होते. याचे तिच्यावर एवढे प्रेम आहे कि बेशुद्ध अवस्थेतही त्याला मी न आठवता ती आठवते. कोणाला सांगू हे सगळे? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर?
" निशा , हे घे मी तुझ्यासाठी नारळपाणी आणले आहे "
" दादा, माझा हरतालिकेचा उपवास आहे, आणि तुला माहित आहे कि मी पाणी पण पित नाही ."
" हे सगळे मला बोलून काय फायदा. आई कालपासून पाठी लागली आहे माझ्या कि उद्या न विसरता , पाणी नेऊन दे म्हणून. तेवढेच तिच्या पोटात काहीतरी जाईल."
या अशा माणसासाठी आपण एवढे कडक उपवास केले. बिचारी आई तर नवरात्रात जीव तोडून सांगायची कि काही तरी खा. का ऐकत नव्हते मी?का? का? निशा स्वतःला प्रचंड दूषणे देत होती. आणि माझ्या मुलांचे काय? काय सांगू चंदनला कि आता तुला स्थळे बघण्याऐवजी तुझ्या वडिलांना दुसरे लग्न करायचे आहे. आणि वंदन तो तर अजून किती लहान आहे. आणि ताई दादाला काय सांगू? घर आणि बरेचसे दागिने मला दिल्यामुळे नाही म्हटले तरी ते दुखावलेच आहेत. बाबांना माझे भविष्य कळले होते कि शशांकचा स्वभाव? कसे सांभाळू हे सगळे?
मगाशी निशाने मारलेल्या हाका ऐकून नर्स तोपर्यंत आली होती. तिला वाटले कि शशांकची परिस्थिती पाहून निशा रडत आहे. "मॅम, काळजीचे काहीच कारण नाही. सर आलेत बघा शुद्धीवर. तुम्ही बोलता का त्यांच्याशी?"
" नको, मी आता जरा घरी जाते. चालेल ना?"
" हो, तुम्ही एवढे त्रास करून घेतले आहेत ना कि तुम्हालाच विश्रांतीची जास्त गरज आहे. तुम्ही खरेच जा. काही लागले तर मी फोन करते. आज दिवसभर मीच असणार आहे इथे."
घरी जाईपर्यंत निशाने स्वतःशी एक निर्णय घेतला होता. घरी तिला बघताच सगळे शॉक झाले कारण चार दिवस तिने हॉस्पिटल सोडले नव्हते.
"ताई, चंदन, वंदन प्लीज इथे बसता का? थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे"
"आई बाबा बरा आहे ना?"
"हो, तो आला शुद्धीवर. पण आताच त्याच्या तोंडून मला त्याच्या आणि प्रियाच्या संबंधांबाबत कळले आहे.तुम्हाला कोणालाच धक्का नाही बसला?"
" नाही मां. आमचे काही मित्र आपल्या क्लासमध्ये आहेत. त्यांनी आम्हाला थोडी कल्पना दिली होती. पण तुला वाईट वाटू नये म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो."
"कधीपासून माहीत आहे हे तुम्हाला?"
"मा, गेली दहा,बारा वर्षे"
"गेली बारा वर्षे तो माणूस मला मूर्ख बनवत होता आणि तुम्हाला मला सांगावेसेही वाटले नाही."
"उगाच मुलांना काही बोलू नकोस निशा. जेव्हा मुलांना हे कळले मुले खूप घाबरली होती. आणि तू शशांकच्या विरूद्ध एक गोष्ट तरी ऐकून घेत होतीस का? जेव्हा मला आणि दादाला हे कळले तेव्हा आम्ही दोघेही बोलायला आलो होतो तुझ्याशी पण नेमक्या तेव्हाच तुझ्या सासूबाई आजारी होत्या म्हणून तुम्ही गावी जात होतात. आणि तुझ्या समोर आम्ही खूप वेळा हिन्ट देण्याचा प्रयत्न केला पण पुरावा नव्हता म्हणून गप्प बसलो."
"ताई, काय करू ग मी? काय झाले आहे हे सगळे. असे वाटते हे सगळेच एक स्वप्न असावे आणि उठल्यावर हे संपून जावे."
" सांभाळ स्वतःला निशा. आणि आता शशांक हॉस्पिटल मध्ये आहे. माणूसकीच्या नात्याने वाग."
काही दिवसांनी शशांक घरी आला. पण निशा काही परत हॉस्पिटल मध्ये त्याला पाहायला गेली नव्हती .मुले आणि ताईही नीट बोलत नव्हती हे त्याला जाणवत होतेच. पण तब्येत बरी नव्हती म्हणून तो जास्त बोलत नव्हता.
"निशा, काय चालले आहे सांगशील का मला?"
"काय सांगू"
" हेच कि तू का नाही माझ्याशी बोलत. मी जिथे असेन तिथून निघून जातेस. मुले सुद्धा फक्त औषधे, जेवण वेळेवर देतात. पण काहीच बोलत नाही. तुझे ताई, दादा तर भेटायलाही आले नाहीत."
"सांगू ? ऐकायचे आहे? त्या दिवशी शुद्धीवर येताना तुझ्या तोंडात प्रियाचे नाव होते. तुला तिला सोडून जायचे नव्हते. हे ऐकून मी काय करायचे? तुमचे हे प्रकरण गेले अनेक वर्ष चालू आहे. आणि तुझ्या मोबाईल मधले तुमचे खाजगी फोटो तर मी बघूही शकले नाही. हो मी लावला तुझ्या मोबाईलला हात. खरेतर आधीच लावला असता तर ही वेळच आली नसती. तू माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना माझ्यापासून तोडलेस, माझे दागिने सुद्धा चोरून तिला दिलेस. हे सगळे आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. आता तुझ्या पुढे दोनच पर्याय आहेत एकतर तू तिला विसरून इथे राहा नाहीतर तुझा रस्ता तुला मोकळा आहे."
" ती एकटी आहे, तिला माझी गरज आहे."
"मग बोलणेच खुंटले. तू जाऊ शकतोस."
मनात कुठेतरी निशाला वाटत होते कि मुलांसाठी का होईना हा आपल्याला सोडून जाणार नाही.. पण तिचा अंदाज चुकला. शशांक निघून गेला. निशाला खूप मोठा धक्का बसला आणि ती नैराश्यात गेली. हे सगळे विसरण्यासाठी तिने झोपेच्या गोळ्या दारू हे सगळे सुरू केले. पण कसलाच फायदा होत नव्हता. तिचे क्लासेस बंद झाले. कर्मधर्म संयोगाने चंदनला नुकतीच एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली होती. त्यामुळे घर चालू होते. त्यातच अचानक तिच्या दिराचा एक दिवस तिला फोन आला.
" हॅलो भाभी, कश्या आहात?"
"आज खूप दिवसांनी आठवण आली माझी "
"असे नाही आठवण तर नेहमीच येते. पण थोडी कामे चालू होती. थोडे बोलायचे होते. बोलू?"
" हो , बोला."
" भाभी शशांकला काय झाले आहे? कसा फिरतो आहे? काही प्रॉब्लेम आहे का?"
"तुम्हाला त्या प्रियाबद्दल काही माहीत नाही असे प्लीज सांगू नका. मी सोडून सगळ्या जगाला माहीत होते. आणि मला बोलण्याऐवजी तुमच्या भावाला सांगा ना."
" भाभी जाऊ दे ना. झाले गेले सगळेच..तो परत आजारी पडला आहे. तुमच्या शिवाय त्याला कोणीच नाही."
निशाला हे सगळे ऐकवेना. तिने फोन कट करुन टाकला. आणि चंदनला बोलावून सगळे सांगितले.
"आता तूच सांग, काय करायचे?"
"मी काय सांगणार, मां. निर्णय तुला घ्यायचा आहे . तू आजी आणि मावशी म्हणतात तसा बाबांसोबत घटस्फोट घेतलास तरी मी आणि वंदन तुझ्यासोबत आहोत. तुला काही कमी पडू देणार नाही हे आमचे प्राॅमिस. तुला बाबासोबत राहायचे तरी तू राहा. We know, you love him a lot. आम्हाला तुला काही सांगायचा हक्क नाही. त्यामुळे तुझा जो निर्णय असेल तो आम्हा दोघांनाही मान्य. "
त्या दिवसापासून निशाने नैराश्यातून बाहेर येण्याचा मनापासून प्रयत्न केला.. परत एकटीने क्लासेस सुरू केले. आणि शशांक आजारी पडला किंवा मुलांची आठवण आली कि त्यांच्या घरी येतो आणि पाहुण्यासारखा राहतो.
निशा कधी काळी केलेल्या अपार प्रेमाला आणि माणुसकीला स्मरून त्याला तिच्या वडिलांच्या घरात येऊ देते. पण या अशा माणसाशी आपली गाठ का बांधली गेली या वरून देवाशी तिचे भांडण मात्र अजून संपलेले नाही.......



कथा कशी वाटली ते सांगायला अजिबात विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all