Login

सप्तर्षी...

सप्तर्षी.... कथा..
सप्तर्षी (Ursa Major )
(The Great Bear )
अवकाश निरीक्षण करण्याची आवड असण्याऱ्या खगोलप्रेमींसाठी खास करून नवीनच अवकाश निरीक्षण करणाऱ्यासाठी सप्तर्षी हा तारकासमूह उत्तम.
कारण उतरेच्या अवकाशात हा तारकापुंज अगदी स्पष्ट दिसतो .आणि यातील सात तारे ही लगेच ओळखता येतात त्या मुळे आपला आत्मविश्वास वाढतो .
ग्रीक पुराणात याला बिग बियर म्हणजे मोठ अस्वल असं म्हणतात .त्यांच बरोबर \" चार्लस ची गडी , जमिनीचा नांगर , दांडा चे पातेले अशी वेगवेगळी नाव व संकल्पना आहेत.
विषेश म्हणजे आदिवासी समाजात याला बाज (पलंग )/खाट असं म्हणतात व बाजूंच्या तीन ताऱ्यांना आंधळा , मुका व बहीरा अशी उपमा दिली आहे .आणि हें तिघं खाट चोरून घेऊन जातात. अशी दंतकथा आदिवासी समाजात प्रचलित आहे .
त्याच बरोबर पुराणांत हें सात ऋषि आहेत त्यांची नाव -क्रुतु(Dubhe ), पूलह(Merak ), पुलस्य(pheeda ),अत्री (Megrez), अंगीरा(Alioth ),
वशिष्ठ (Mizar )आणि मरीची(Alkaid ) अशी आहेत. .यातील वसिष्ठ ताऱ्यां जवळ एक लहान तारका दिसते त्याला अरुंधती असे म्हणतात .
याच तारकापुंजा जवळच आपला ध्रुव तारा देखील आहे .पुलह आणि क्रुतु ताऱ्यांमधुन सरळ रेष मारली तर आपल्यला ध्रुव तारा शोधता येतो .
या ताऱ्यांमधे क्रुतु आणि मरीची तारे सोडले तर बाकी तारे एकाच दिशेनं गतिमान आहेत ..थोडक्यात हें दोन तारे वेगळ्या दिशेनं गतिमान आहेत .
चला ! तर मग करा सुरवात सप्तर्षि पासुन ..
- चंद्रकांत घाटाळ
( संचालक -अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा )

🎭 Series Post

View all