Dec 06, 2021
पत्रलेखन

सप्तपदी

Read Later
सप्तपदी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
प्रिय,
महेश........

लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.......
हा हा हा..... खरंतर ४८वा वाढदिवस म्हणायला पाहिजे,कारण पहिली दोन वर्षे आपण एका घरात होतो पण मनात नाही.

मला न विचारता माझ्या बाबांनी माझं लग्न तुझ्यासोबत ठरवलं का????? तर, ताई पळून गेली म्हणून. मी ही तसंच काही करून नये याची त्यांना भीती होती....ताई गेली आणि दोनच दिवसात माझं लग्न तुझ्यासोबत लावलं......लावलं कसलं..... उरकलंच म्हणा.
काही न बघता कसलाही विचार न करता मी पण बोहल्यावर उभी राहिले. माझं अक्ख आयुष्य माझी स्वप्नं सगळी त्या हवन कुंडात भस्मसात होतांना बघत होते. पाठवणीच्या वेळी बाबांचे भरले डोळे बघितले....... त्यात काळजी सुद्धा दिसली...... पण मला राग आला होता त्यांचा, म्हणून त्यांना न भेटता आई लाच मिठी मारून निघाले.

घरात पाऊल ठेवलं.... तर तुझं एवढं मोठं कुटुंब बघून हादरलेच!!! पण म्हणतात ना...... एकाच्या कर्माचे भोग,नेहमी दुसर्यालाच भोगावे लागतात. आता समोर जे वाढलंय ते फक्त गिळायच...... एवढंच ठरवलं.

आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री...... आपल्यात कधीच कुठलंच नातं फुलू शकत नाही असं ठामपणे मी तुला सांगीतल आणि तू सुद्धा ते मान्य केलंस. सगळे सोपस्कर झाल्यावर घरच्यांनी आग्रहाने दोघांना महाबळेश्वरला पाठवलं. तिथे तुझ्या आत्याच्या घरी आपली राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली होती. पाच दिवस तिकडे राहून फिरून पुन्हा घरी आलो. घरी आल्यावर सगळे छेडायला लागले तेंव्हा माझी चिडचिड होत होती. मी सगळ्यांवर ओरडून निघून गेले. त्याच रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले तेंव्हा तुझं आणि आई बाबांचं बोलणं ऐकलं.

मी हे नातं अजून स्वीकारलं नाही असं जेंव्हा तू त्यांना सांगितलंस तेंव्हा त्यांनी तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि एक दिवस हे ही दिवस जातील आणि सखी स्वतःहून तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल असं सांगितलं. बायको आहे म्हणून कुठल्याच गोष्टींचा हक्क गाजवू नको ज्या दिवशी ती स्वतःहुन तुझा नवरा म्हणून स्वीकार करेल त्या दिवशी तुमचा संसार सुरू होईल फक्त विश्वास आणि स्वतःवर ताबा ठेव.आमच्याकडून सखी ला काही त्रास किंवा कुठली छेडकांनी होणार नाही याची मी काळजी घेईन.

त्याक्षणी अस वाटलं.....मी किती भाग्यवान आहे. एवढं समजूतदार सासर भेटलं मला पण मी लगेच भानावर आले.घरी एवढ्या सगळ्या गोतावळ्यात मला ऍडजस्ट होता येईना पण घरच्यांनी मला खूप सांभाळून आणि समजून घेतलं. सहा महिने लग्नाला झाले आणि नकळतपणे माझं मन तुझ्यात रमू लागलं तुझी वाट बघू लागलं. हे सगळं तुला कस सांगावं काही सुचेना. अश्यातच तुझा अपघात झाला आणि डॉक्टरांनी तुला निदान सहा सात महिने तरी हलता येणार नाही असं सांगितलं.घरातला तू तिसरा कर्ता पुरुष असा जागेवर बसून राहिलास.शेवटी मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घरातल्यानी सुद्धा खूप छान पाठिंबा दिला मला. तुझं सगळं आवरून आपल्याच दुकानात अकाउंटंट म्हणून कामाला लागले. या सगळ्यात तुझे आरामचे सहा महिने सुद्धा गेले.हळूहळू मी तुझ्या प्रेमात पडू लागले होते. मला तुझ्या जवळ येण्याची ओढ लागली होती.अखेरीस तुझ्या वाढदिवशी मी माझ्या मनातलं तुला सांगायचं ठरवलं. घरातल्या सगळ्यांच्या मदतीने मी सगळी तयारी केली. पुन्हा मांडव सजवला आणि त्या दिवशी मी स्वखुशीने तुझ्याशी लग्न केले पण दुसऱ्यांदा नाही हा.......पहिल्यांदाच. सगळ्यात जास्त तर आई आणि बाबा खुश होते. आईंनी स्वतः मला त्या दिवशी सजवलं होतं. त्या दिवशी त्या माझ्या सासूबाई नाही तर आईचं वाटत होत्या. आई बाबा फक्त पाहुणे म्हणून आले होते त्या कार्यक्रमात.माझ्या सासू सासऱ्यांना माझं कन्यादान करतांना बघून त्यांचे डोळे पण भरून आले होते. माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधतांना तुझ्या डोळ्यातलं प्रेम,काळजी, आनंद हे सगळं दिसत होतं मला. मी ही खूप खुश होते. लग्नानंतर बाबांना मिठी मारून खूप रडले आणि त्यांची माफी मागितली आणि त्यांचे खूप आभार ही मानले की त्यांनी एवढं चांगलं घर मला सासर म्हणून देऊ केले. आपली पहिली मधुचंद्राची रात्र, तो चंदनी स्पर्श, तुझ्या बाहुपाशात अगदी सुखावले होते मी........जणू कित्येक वर्ष झोपलीच नाही.

ओळख असली म्हणजे प्रेम होतं किंवा प्रेम विवाह केला म्हणजे संसार सुखी होतो अस काही नसतं हे मला तेंव्हा समजलं....... जेंव्हा मी माझ्या मनाने तुझ्या सोबत सप्तपदी घेत होते. सप्तपदी घेताना आयुष्यभर साथ देशील....... नेहमी सोबत राहशील...... असं वचन दिलं होतंस. आज तू हयात नाहीस पण आपल्या आठवणी माझ्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्यात मी.
आज ५० वर्षे पूर्ण झाली आपल्या संसाराला जो तुझ्या आठवणीत मी एकटीने केला. लग्नाच्या तिसऱ्या वर्षी मनु ला पदरात टाकून कायमचा गेलास. तिथपासून आज पर्यंत एकटी संसार करते आपल्या लेकी सोबत. तीचं पण आता लग्न होईल आणि कायमची बाहेरगावी जाईल आपली मनु.

तू रहा हो माझ्या सोबत आठवणींच्या रुपात.आधी जशी साथ दिलीस तशीच शेवटपर्यंत दे. माझं पत्र वाचायला तू नाहीस म्हणून मी लिहून मीच वाचून दाखवलं त्यात काही चुकलं असेल, काही कमी असेल तर समजून घे हो.........

तुझी प्रिय,
सखी.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading