*सपन*
म्या म्हनलं घरधन्याले
चाला काश्मीरले जाऊ
गुलूगुलू गोष्टी करत
बरफ आंगावर घेऊ...
चाला काश्मीरले जाऊ
गुलूगुलू गोष्टी करत
बरफ आंगावर घेऊ...
पुरी जिनगानी आली सरत
फक्तं घर अन् घर
अजूनंई सरली नाई
सवंसारासाठी मरमर...
फक्तं घर अन् घर
अजूनंई सरली नाई
सवंसारासाठी मरमर...
मस्त मजा करू तिथं
बरफाच्या घरात राहू
बरफातच खेयू घसरगुंडी
राती तिथंच राहून जाऊ...
बरफाच्या घरात राहू
बरफातच खेयू घसरगुंडी
राती तिथंच राहून जाऊ...
घरधनी कसा म्हने मले
अवं हे म्हतारपनाचे डोहाये!
कायले पायजेन व आता
असे हे भलतेच चाये...
अवं हे म्हतारपनाचे डोहाये!
कायले पायजेन व आता
असे हे भलतेच चाये...
आज म्हनशीन काश्मीरले
उद्या म्हनशीन चंद्रावर जाऊ
बस गुपचूप घरीच आता
घरीच टीव्हीवरचा शिनीमा पाहू...
उद्या म्हनशीन चंद्रावर जाऊ
बस गुपचूप घरीच आता
घरीच टीव्हीवरचा शिनीमा पाहू...
आता ह्या वयात आता तू
पाहू नको भलतंच सपन
काई भलतसलतं झालं तं
पोट्टे आपल्यावरच चिल्लावन
पाहू नको भलतंच सपन
काई भलतसलतं झालं तं
पोट्टे आपल्यावरच चिल्लावन
आता ह्या म्हतारपनात
शरीर असते तब्येतीच्या हवाली
आता तुम्हीच माये शम्मी कपूर
अन् मीच तुमची 'कश्मीर की कली'.
शरीर असते तब्येतीच्या हवाली
आता तुम्हीच माये शम्मी कपूर
अन् मीच तुमची 'कश्मीर की कली'.
*सौ. रेखा देशमुख*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा