Login

सापळा ( एक सेक्स रॅकेट) भाग 1(सत्य घटनेवर आधारित)

एक सेक्स रॅकेट जे टिनेज मुलांना आपल्या जाळ्यात ओढतं.सत्य कथेवर आधारीत
सापळा ( एक सेक्स रॅकेट)

क्राॅफर्ड  मार्केटच्या पोलीस आयुक्त कार्यालयात  नेहमीची लगबग सुरू होती.संध्याकाळची वेळ होती.. सी.आय.डी. इनस्पेटर प्रशांत यांच्यासमोर समाजसेविका ऩेहा आणि एक जोडप बसलेलं होत. सोबत होता सतरा वर्षाचा एक कोवळा मुलगा ...

"हा !बोला नेहा मॅडम काय म्हणणं आहे तुमचं ,अस काय खास होतं, जे तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलात ?"

"सर विषय थोडा नाजुक आहे ..खरतर लैंगिक शोषणाची केस आहे आणि हे प्रकरण एका मुलापर्यन्त मर्यादित नाही आहे तर अनेक मुले ह्यात विक्टिम असण्याची शक्यता आहे." नेहा मॅडमनी थोडी पार्श्वभूमी सांगितली.

"मग विक्टिमला का नाही आणलं ?" प्रशांत सरांनी नेहा मॅडमला विचारलं. .

"सर विक्टिम सोबतच आहे ,हा अनय ह्याच्याच लैंगिक शोषण झालं आहे. " नेहाने अनयच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं ,हे ऐकुन अनयच्या आईला हुंदका आवरता आला नाही.

हे ऐकुन प्रशांत सर, नाही म्हटलं तरी थोडे आश्चर्यचकित झाले कारण बहुतेकदा ह्या लैगिंक शोषण ह्या गुन्ह्यांखाली येणाऱ्या केसेस मुलींच्याच असायच्या.

त्यांनी अनयकडे पाहिल, दाट पापण्या, हलकी मिसरूड फुटलेला ,गोरा ,कोवळा चेहरा ,गहीरे निळे डोळे, सतरा वर्षाच्या मुलाच्या वयाच्या मनाने लांब उंची आणि काळे भोर  केस त्याच्या पुरूषी सौंदर्यात भरच घालत होते. आई वडिलांच दोघांचे बेस्ट फेस फिचर घेउन देवाने मॉडेल टाइप चेहरा बनवला होता त्याचा,पण त्याच्या चेहऱ्यात जराही टवटवीतपणा किंवा तारूण्याचा तजेला नव्हता तर त्यावर प्रचंड मानसिक ताण नि थकवा जाणवत होताच आणि डोळेही कदाचित रडुन सुजलेले .

त्यांनी अनयला विचारलं. ,"हे बघ अनय, तुझ्याबरोबर जे झाल ते चुकीच झालं ,पण मला सांग हे कोणी केलं   आणि केव्हा झालं ?"

"हे बघ बिलकूल लाजू नकोस ." इनस्पेटर प्रशांत सरांनी अनयला धीर देत म्हटलं .

"ह्याची सुरवात सहा महिन्यापुर्वी झाली . माझा मित्र मनन ह्याने मला एक ऍप दाखवल त्यात पॉर्न विडियो होते...काही मुली लाइव पण यायच्या सेक्स चॅटसाठी, पण त्याच्यासाठी एक हजार रूपये एका वेळेचे असायचे ..."

"म्हणजे मी जे पैसे पॉकेटमनी म्हणुन द्यायचो ते तू ह्यात खर्च करायचास , नालायक! "

अनयच्या वडिलांचा अचानक ताबा सुटला ..इतक्यात नेहा मॅडम त्यांना शांत करत म्हणाल्या.

"शरद भाउजी !प्लीज शांत व्हा , तुम्ही आधीच खुपच रागवला आहात अनयवर..अस आतातायी वागून आपण त्याला ह्या प्रोब्लेम मधून कसे बाहेर काढणार ?"

"मला वाटत, तुम्ही जरा बाहेर बसा ,अनय बरोबर त्याची आई आणि नेहा मॅडम आहेच ..प्लीज मला सगळे डिटेल्स हवे आहेत ."

इनस्पेटर प्रशांत सरांनी असं म्हणताच अनयचे बाबा शरद थोडेसे खजील झाले आणि सरळ केबिनच्या  निघून बाहेर गेले.

"मग अनय पुढे काय झालं? "प्रशांत सरांनी विचारलं .

"मला मनन नेहमी चढवुन सांगायचां,'त्या मुली अस बोलतात ,तस बोलतात ..मग  ते ऐकल्यावर अस वाटतं तस वाटतं. अगदी काटा येतो, खुप भारी वाटत वगैरे. त्याच   हे बोलण ऐकुन माझ्याही मनात उत्सुकत्ता निर्माण झाली होती."

" मग एकेदिवशी मी मननच्या घरी गेलो, मी मननला कॅश दिली आणि त्याने क्रेडीट कार्डने पैसे भरले नी माझ्या मोबाईलवर लाइव चॅट रूम ओपन केली. मला त्या ऍपने काही OTP नंबर टाकायला सांगितला मग कॅमेरा ऑन ठेवायची आणि कॉल रेकॉर्ड व कॅमेरा ऍक्सेसची परमिशन मागितली .बाकी ऍप मागतातच  तस इकडेही असेल म्हणुन मी परमिशन ऍक्सस्पटेड (accepted)ह्यावर क्लिक केलं."

"मग लाइव चॅट वर मुलीने गोड बोलुन माझे ही कपडे काढायला सांगितले.मी उत्तेजीत होउन तस केल.मला खुपच वेगळा अनुभव आला होता. आमच सेशन संपल ."

"मला दुसऱ्या दिवशी एक वॉटसअप आला त्यावर माझा अश्लील विडियो होता आणि धमकी होती ..तर हा विडियो वायरल होउ नये अस वाटत असेल तर पाच लाख रूपये उद्या अकांउटवर ट्रान्स्फर कर ..."

"मग मला मननचा फोनही आला ,कि त्यालाही माझा  तसा विडियो आलाय. मला तर काय करू समजत नव्हत.आई बाबांची भीती वाटत होती . "

"पाच लाख रुपये तरी कुठुन आणु हे ही समजत नव्हत  आणि विडियो वायरल झाला तर बाबा सोडणार नाहीत  आणि सगळीजण हसणार माझ्यावर असच वाटत होत मला. "

"मग मी मननलाच टेंशनमध्येच फोन केला ,त्याने सुचवल एक मार्ग आहे ह्यातुन बाहेर निघण्याचा , ह्या लोकांसाठी काम करायच .  मीही मग होकार दिला."

"मग मला चार दिवसानी अजुन एका नंबरवरून मॅसेज आला , ह्यादिवशी फोर्टमघ्ये काळ्या ओमनी गाडीमध्ये बस ."

"मग काय झाल ? त्यांनी तुला कुठे नेल ?" प्रशांत सरांनी अनयला विचारल.

"सर ते लोक नेहमी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधुन अमुक एका फ्लॅटमध्ये नेत .गाडीमधुन उतरल्यावरच  डोळ्यावरची पट्टी काढत.नंतर लीफ्टने मला आत नेल जायच ..माझ्याबरोबर कधी पुरूष किंवा बाई असायची ."

"ते मला हॉलमध्ये सोडत ..मग ..."एवढ बोलुन अनय रडायला लागला .

"अनय शांत हो बाळ .."अनयच्या आईने म्हणजेच  निधीने पाठीवरून हात फिरवत म्हटल .

काहीवेळ अनय तसाच अश्रु ढाळत बसला ,मग म्हणाला .
" पहिल्यावेळी एक बाई होती.तिने मला उत्तेजित केल मलाही ते बर वाटल ..मग मीही वाहवत गेलो आणि मग आमचा प्रणय झाल्यावर मला पुन्हा घराच्या खाली सोडल"

"मला वाटल हे काम सोप आहे ..आणि..." अनय आता अडखळला.

" सोप्प तसच मजाही  देणारं ही आहे ,होना !असच वाटलना तुला ." प्रशांत सरांनी अनयच वाक्य पुर केल .

"हो ! पण मी किती भयानक जाळ्यात अडकत होतो हे मला नाही समजल ..पुढच्यावेळी मला हॉलमध्ये एक वयस्कर पुरूष दिसला. त्याने मला बेडरूम मध्ये न्यायचा प्रयत्न केला..मी नकार दिल्यावर मला बरोबर घेउन आलेल्या बाईने मला माझा दुसरा विडीयो दाखवला ..मी हादरलो सर..मला काहीच कळत नव्हत़.विचारशक्ती खुंटली होती.शरीर थंड झाल होत. तिने मला पुन्हा धमकी दिली ..ह्यावेळी रेपची ...आणि माझ्यावर त्या पुरुषाने  सोडोमी केली ..."

"सर त्यावेळी मी ओरडत होतो ,रडत होतो ..पण  कुणालाही माझी दया आली नाही .मी जेवढा प्रतिकार करायचा प्रयत्न करायचो  तेवढ ती लोक मारायची मला.. आणि दरवेळी विडीयो वायरल करायची धमकी द्यायचे"

"आई बाबा किंवा दुसऱ्या कोणालाही सांगितलें तर तुझ्यासकट आई वडिलांनाही जीवानिशी मारू म्हणुन धमकी द्यायचे ."

"त्यांना आई बाबा कुठे काम करतात . त्यांचा फोन नंबर सार काही माहित आहे.सर प्लीज मला ह्यातून सोडवा. नेहा आंटी मला म्हणाली कि तुम्ही नक्की वाचवणार मला ह्यातुन "
हे बोलतानाही अनयचा स्वर घाबरा नि रडवेला झाला होता.

"अस कितीवेळा झाल तुझ्याबरोबर ..? "प्रशांत  सराही आता सुन्न झाले होते.

"सर किमान दहावेळा तरी ..मग मला खुपच त्रास व्हायला लागला ..आई मला डॉक्टरांकडे घेउन गेली."अस सांगुन अनय पुन्हा  शांत बसला .

"हो सर ,तिकडे डॉक्टर म्हणाले, तुमचा मुलगा सेक्शुअली अॅक्टीव आहे पण कुणीतरी त्याच जबरदस्त शोषण करत आहे ."

"हे ऐकुन माझ्या पायाखालची जमीन सरकली सर...अनय तर मुलगा आहे..मग त्याच्याबरोबर हे सगळ कस होउ शकत ह्या विचाराने डोक भंडावुन गेल.मी लगेच नेहाला म्हणजे माझ्या बहिणीला बोलवल..कारण माझे मिस्टर शीघ्र कोपी आहेत़. ते अनयला कधीच समजुन घेणार नाही हे माहीत होत."

"नेहाच अनयशी बोलली आणि तिने हे सर्व आम्हाला सांगितल. सर आम्ही हवतर पैसे देतो पण अनयचे ते विडियो डिलीट व्हायला हवेत सर ."

"सर माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा . सर प्लीज आमची मदत करा"  निधीने कळवळुन सांगितल.

"हो सर !ही केस गंभीर आहेच पण अनयच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणुन मी पोलिस स्टेशनमध्ये न जाता डायरेक्ट तुमच्याकडे आले. कारण कालच त्यांनी अनयला सांगितल आहे परवा फोर्टसाइडला ये म्हणुन . तसेच कदाचित ते अनयवर पाळतही ठेवत असतील" नेहाने प्रशांत सरांना म्हटल.

"नेहा ,अनयनी जेवढ सांगितल ,त्यावरून मला मननचाही संशय येतो आहे..तुम्ही एक काम करा केसची एफायार करा ..मग आपण उद्या सकाळीच मननकडे जाउ ."

"अनय तुला काही होणार नाही ,माझ्यावर विश्वास ठेव." आपण तुला त्रास देणाऱ्या माणसांना पकडु पण त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे कारण तुच त्यांना ओळखतोस.
समजल ना.." प्रशांत सरांनी अनयला धीर देत म्हटल.

"तसच ह्या गोष्टीविषयी तुम्ही कुणीकडे काहीच बोलु नका ..अगदी मननलाही जाब विचारू नकाच ." अस म्हणुन त्यांनी नेहा व निधीलाही सुचना दिली.

"नेहा मॅडम ,उद्या तुम्ही आधी माझ्याबरोबर मननच्या घरी या..मग पुढे पाहु काय करायच ते  ."

*************************************

दुसऱ्या दिवशी मननच्या घरची बेल वाजते  आणि मननची आई दरवाजा उघडते... दरवाजात साध्या कपड्यात इनस्पेक्टर प्रशांत आणि नेहा मॅडम उभे असतात.

"मी सी.आय.डी ऑफिसर प्रशांत आणि ह्या 'सेव इनोसंन्स' एन जी ओ.च़्या मेंबर नेहा . आम्हाला मननशी थोडे बोलायचे होते." प्रशांत सर स्वत:चे आयडी कार्ड दाखवत म्हणाले

मननची आईने थोड्या टेंशनमध्येच त्यांना आत घेतल आणि मननला बाहेर बोलावल .

मनन जसा बाहेर आला ,तस प्रशांत सरांच्या पोलीसी नजरेन  मननचे निरीक्षण करायला सुरवात केली.
मननही सोळा सतरा वर्षाचा लहान मुलगा होता..चष्मीश, अगदी बारीक शरीरयष्टी ,गव्हाळ रंग ..आणि चेहऱ्यावर अनयसारखाच ताण ...

"मनन ,तु अनयला ओळखतोना ?" नेहाने विचारल
"मी अनयची मावशी आहे आणि सी.आय.डी. इनस्पेटर प्रशांत. आम्ही तुला भेटायला आलो आहोत."

हे ऐकुन मनन अजुनच घाबरला.

"अनयने आम्हाला अॅप बद्दल सगळ सांगितले आहे..तेव्हा प्लीज खोट बोलु नको ?" नेहाने अस म्हणताच मनन अडखळतच म्हणाला ,"मला काहीच माहीती नाही आहे"  मी  कुणा अनयला नाही ओळखत. "

"मनन हा काय प्रकार आहे ?
अनय तर तुझा मित्र आहे  ना! मग तु  हे काय बोलतोयस ? कसल्या अॅप बद्दल विचारत आहेत पोलिस?"

आईच्या सरबत्तीने मनन पुरताच कोलमडला , ""आई  काही महिन्यापुर्वी मला सतिष सरांनी एक अॅप दाखवल. पाॅर्न वाल....मग त्या अॅपवाल्यानी माझेही विडियो काढले आणि ..." मनन आता उर फुटुन रडायला लागला.

नेहा आणि सरांना समजायला वेळ नाही लागला कि मनन बरोबरही तसच झालय जे सगळ अनयनी भोगलय...

"मनन शांत हो ,मला सांग तुझ्यावरही त्या लोकांनी तसेच अत्याचार केले का? " प्रशांत सरांनी  मननला विचारल ..कारण मननच्या बोलण्यातुन केसाचे अजुन क्लु मिळणार होते .

"हो ,सर .काही महिन्यांपुर्वी त्या लोकांनी मलापण एका फ्लॅटमध्ये नेल होत ..मग एकेदिवशी मला अनयचा फोटो दाखवला नि म्हणाले ..जर तु ह्याला आणलस तर आम्ही तुझे सगळे विडीयो डिलीट करू ..तसच तुला पुढे हे काम करायची गरजही नाही ."

"सर मला खुप त्रास ही व्हायचा आणि नकोसही वाटायच..मी कुणाला सांगितल तर कोण विश्वास ठेवणार होत?..परत आई बाबांना मारायची धमकीही दिली होती मला.म्हणुन मी अनयला फसवल ."

"सर प्लीज मला पकडु नका ! माझी ह्यात चुक नाही आहे." मनन पुन्हा रडत म्हणाला.

"म्हणजे ही एक चेन आहे तर ..कोवळ्या मुलांना फसवुन जिगलो बनवायची. " नेहा म्हणाली.

मननच्या आईला काहीच समजेनासे झाले होते. मग नेहाने त्याच्या आईला सारंड काही सांगीतल्यावर तिचीही तीच अवस्था झाली जी निधीची झाली होती. कोणत्याही आई वडिलांच हे दुष्टस्वप्नच असेल कि त्यांच्या मुलांना कुणीतरी शारिरीक नि मानसिक त्रास देतय आणि हे सगळ होत असताना त्या प्रकाराची काहीच खबर त्यांना असु नये.

"मिसेस तांबे ,आम्हाला मननच्या काही टेस्ट कराव्या लागतील..त्याचे मेडीकल चेकपही करावे लागेल..तो अजुन वयस्क नाही झाला आहे ..म्हणुन तुमची परमिशनही हवी आहे." इनस्पेटर प्रशांत सर मननच्या आईला म्हणाले.

"पण ,सर आम्हाला तक्रार नाही करायची आहे . " ही गोष्ट घरातच राहिलेली बरी ..लोक काय म्हणतील . सॉरी मला काहीच तक्रार नाही नोंदवायची आहे ." मननच्या आईने द्विधा मनस्थितीत नकार देत म्हणाली.

"हे गुंड कोवळ्या मुली नि मुलांना अश्याच कुटुंबाच्या जीवे मारण्याच्या धमक्या देउन आपल्या काबुत ठेवतात..आणि इंटरनेट व विविध एप अश्या गोष्टींचे सहज भुलवता येण्यासारखे मायाजाल आहे. आपण दोघांनाही ह्या धोक्याबद्दल सजग करायला हव.अस नाही की मुलगा आहे  म्हणजे तो सेफ आहे म्हणुन त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज नाही आणि मुलगी आहे म्हणुन तिच्यावर बंधने घालावीत."

"दोघांनाही वयात येताना ह्या धोक्यांची कल्पना देणे तसेच घरात सुरक्षित ,विश्वास दायक वातावरण निर्माण केल आणि तसेच मुलांना योग्य लैंगिक शिक्षण  दिले तर हे गुन्हे कमी व्हायला मदत होइल, पण जर गुन्हा घडला असेल तर तो दडवून आपण आपल्या मुलांचेच नुकसान करतोय   ."

"विचार करा ,उद्या मनन मोठा झाल्यावर ह्या आठवणी त्याला किती त्रास देतील .तसेच त्याची हालत पहा...तो ह्या टेंशनमध्ये कधीच स्वत:च्या करिअरवर फोकस नाही करू शकणार . तो आतमधून पोखरत आहे..बहुधा पालकांना आपल्या मुलांचे withdrawal symptoms कळत नाहीत. जसं अचानक गप्प गप्प राहण किंवा भयंकर चीड चीड करणं. अभ्यासात लक्ष न लागण किंवा मार्क कमी येण..असं बरच काही."

"आणि ते विडियो अजूनही त्या टोळीकडे आहेत.तेही आपल्याला नष्ट करायला हवेच आहेत. तसच मननची HIV  टेस्ट व कॉन्सलिंग पण करायला हव आहे. "

अस म्हणुन नेहाने मननच्या आईला दिलासा दिला तसेच तक्रार नोंदवण्यासाठी मनवल व पुढे काय करायला हवं ह्याची दिशाही दिली.

"HIV टेस्ट? ती का करायली हवी मॅडम ? मननच्या आईने मननला छातीशी कवटाळत घाबरतच विचारलं.

"कारण त्याच्यावर जे अत्याचार झाले आहेत ते करणारा माणसाने जर निरोधचा वापर केला नसेल तर विक्टीमलाही HIV आणि तत्सम लैंगिक आजार होऊ शकतात.  तुम्ही घाबरू नका मिसेस तांबे, बी पॉझिटीव्ह आणि स्ट्राँग रहा..मननला ह्यातलं काही नसेल सुद्धां",
नेहाने  मननच्या आईला धीर देत म्हटलं.

इतकावेळ मननच्या म्हणण्याचा विचार करणारे प्रशांत सरांनी  विचारल मननला विचारल ." हे सतीष सर कोण आहेत?"

"ह्याच्या  प्राव्हेट कॉम्प्युटरच्या क्लासचे सर आहेत ते..",मननच्या आईने माहिती दिली .

"मनन तुला माहित आहे का सतीष सर कुठे राहतात ? इनस्पेक्टर प्रशांत सरांनी  विचारल.

"हो सर ,त्यांच्या क्लासच्या खालीच त्यांच घर आहे .इकडेच गायवाडीत.",मननने माहिती दिली.

"मिसेस तांबे, तुम्ही मिस्टर तांबे यांना लगेच बोलावुन घ्या ,आणि जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये नेहाबरोबर जा आणि झीरो अफायर नोंदवा. पण त्याआधी मनन  तू माझ्याबरोबर येऊन त्या सरांच घर दाखव. "


"पण सतीशच  घर का? "आपल्याला तर अनय आणि मननला वाचवायचं आहेना !", नेहाने विचारलं.

"नेहा मॅडम!  मी सगळ सांगतो..पण आता  त्या सतीशची चौकशी करण महत्वाचे आहे. मनन आता तो कुठे असेल ह्याची तुला काही कल्पना आहे का ?" मननला इन्स्पेक्टर प्रशांत ह्यांनी विचारलं.

"नाही सर, मला फक्त त्यांच घरी नी क्लास कुठे आहे , एवढच माहीती आहे.", मनन नकार देत म्हणाला.

क्रमशः


हा सतीश कोण आहे ,अनयला प्रशांत सर कस वाचवणार पाहुया पुढच्या नि अंतीम भागात .

ही एक सत्यघटनेवर आधारीत काल्पनीक कथा आहे.. त्यामुळे कथेतील पात्रे काल्पनीक असली तरी घटना सत्य आहेत. ह्यांची वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.


************************************
एक विनंती आम्ही लेखक तुमच्या मनोरंजनाकरता लिहतो आणि आम्हाला हवी असते  ती फक्त तुमच्याकडुन ...  एक दाद किंवा हक्काची कानपकडणी
आणि स्टीकर मिळाल तर ते बोनस बक्षिसच .

मग समिक्षेत नक्की सांगणार ना कसा वाटला भाग.
नुसते वाचुन पळु नका.तुमच छान लिहल आहे ही हे वाक्यही आम्हाला खुप उत्साह  देतो. ही फक्त माझी नाही सगळ्याच लेखकांची भावना आहे.