सापळा ( दत्ता जोशी ) भाग नववा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग नववा )

रमणच्या फोन वरुन एका नंबर वर खूप वेळा कॉल केले गेले होते. इव्हन विजयच्या आणि राकेशच्या फोन वरूनही याचं नंबर वर कॉल केले गेलेले आहेत.

ह्या नंबरच्या व्यतिरिक्त अजून एक नंबर होता ज्या नंबर वर देखील या तिन्ही मुलांना फोन आलेले होते. सगळया मुलांच्या फोन वर हे दोन नंबर सारखे भेटल्या मुळे जाधव साहेबांनी या नंबर वर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि सायबर क्राईमला या नंबरच्या मालकांची माहिती कळवण्याचे आदेश दिले.

यात एक नंबर एक चंदन मल्होत्रा नावाच्या माणसाचा होता. पोलीस जेंव्हा या माणसाच्या घरी पोहोचले तेंव्हा तो कामावर गेला आहे असं त्याच्या घरच्या लोकांनी सांगितलं. कुठं काम करतो असं विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आल नाही.

जाधव साहेब काहीच बोलले नाही. त्यांनी बऱ्याच वेळा चंदनला फोन करून पाहिला. पण कदाचीत त्याच्या कडे ट्रू कॉलर ऍप असावे त्या मुळे तो फोन उचलत नव्हता. थोडावेळ वाट पाहून जाधव साहेब त्याच्या घरुन निघाले. जातांना त्यांनी त्याच्या बायकोला बजावून सांगितले की तो आल्याबरोबर त्याला पोलीस स्टेशन वर यायला सांगा. जरी तिने होकारार्थी मान हलवली तरी ती त्याला पाठवणार नाही आणि तो देखील ईतका निर्ढावलेला आहे की अशा गोष्टींना तो भीक घालणार नाही या बद्दल त्यांना खात्री होती. कारण त्याची सगळी चौकशी त्यांनी अगोदरच करून ठेवलेली होती.

चंदन हा एक दलाल म्हणून काम करत होता. त्याच बरोबर फोनवरून तो एस्कॉर्ट सर्व्हिस चालवत असे. तो ईतका पक्का होता की त्याने या सर्व्हिसच्या नंबरचे पांप्लेट छापले होते. अनेक बारबाला, वेश्या आणि कॉलगर्ल यांच्या सोबत त्याचे संबंध होते. आणि योग्य गिऱ्हाईक पाहून तो या मुलींचा उपयोग करुन घेत असे.

कोणत्याच गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्याचे अजून कोणतेच पोलीस रेकॉर्ड नव्हते. परंतू या गुन्ह्यात त्याचा नक्की काहीतरी हात असलाच पाहिजे याची जाधव साहेबांना खात्री वाटतं होती. त्या मुळे ते जरी त्याच्या घरून निघाले तरी काही गुप्त पोलीस सहकारी त्याच्या घरावर पाळत ठेवायला ठेवले.

ते समजू शकत होते की एस्कॉर्ट सर्व्हिस मिळवण्यासाठी विजयने चंदनला फोन केला असेल. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की, नंतर मात्र या तिन्ही मुलांच्या फोन वरून चंदनला वारंवार फोन का केले गेले होते.

या साठी चंदनची भेट होणं खूप आवश्यक होतं. पुन्हा राकेश आणि रमणची पुन्हा चौकशी करण गरजेचं होतं. विजयच्या नष्ट झालेल्या फोन मध्ये काहीतरी रहस्य दडलेले असणार ज्या मुळे त्याला आत्महत्या करणं भाग पडलं असेल.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो दुसरा नंबर कोणाचा होता. त्या नंबरवरून देखील विजय, राकेश आणि रमण यांना फोन आलेले होते. त्या नंबर वर देखील तिन्ही मुलांनी बरेचं फोन केलेले होते.

प्रकरण वाटतं होतं तितकं सरळ नव्हतं. टेबलवरच्या पेपरवेटला गोल गोल फिरवत काहीतरी निश्चय करून जाधव साहेब उठले आणि त्यांनी जीप काढली.

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all