सापळा ( दत्ता जोशी ) भाग सहावा

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग सहावा )

ईन्स्पेक्टर जाधव हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी राकेशवर इलाज सुरू होते. वेळेवर डॉक्टरांची मदत मिळाल्यामुळे तो लवकरच धोक्याच्या बाहेर येणार होता. ईन्स्पेक्टरांनी डॉक्टरांना त्याच्याशी बोलण्याची परवानगी मागितली. डॉक्टर म्हणाले," तो शुद्धीवर आल्यावर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता."

राकेश शुद्धीवर येण्याची सगळेच जण वाट बघत होते. दवाखान्यात त्याचे आई वडील आलेले होते. आई सारखी रडत होती आणि वडील चिंतेने येरझारा घालत होते. इन्स्पेक्टर जाधव राकेशच्या आई वडिलांशी बोलू लागले. त्यांनी विचारलं,

" राकेशने अचानक असं पाऊल का उचललं ?  त्याचं कोणाशी काही भांडण झालं होतं का आणि मुख्य म्हणजे तो मागच्या आठवड्यात कॉलेजमध्ये का गेला नव्हता याबद्दल तुम्ही चौकेश केली होती का ?"

राकेश मागच्या आठवड्यात कॉलेजमध्ये गेला नव्हता ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांना अजिबात माहीत नव्हती. कारण यापूर्वी त्याने कधी कॉलेजला दांडी मारलेली नव्हती. शिवाय त्याचे मित्र विजय आणि रमण हे अतिशय चांगले मित्र होते. त्या दोघांबद्दल त्यांना अतिशय अभिमान होता. शाळेपासून मित्र असलेले हे मित्र कॉलेजमध्येही सोबतच होते. ते सगळे सोबतच अभ्यास करत. सोबतच खेळत सोबतच राहत. सगळ्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्यांच्याबद्दल कोणाचीच काही तक्रार नव्हती.

" विजयने आत्महत्या केली आहे हे तुम्हाला माहित आहे का ? " असं ईन्स्पेक्टर जाधव यांनी विचारलं, त्यावेळी त्या गोष्टीचा राकेशच्या आईला खूप मोठा धक्का बसला. तिला हि गोष्ट माहीतच नव्हती. राकेशचे वडीलही याबाबतीत अनभीन्न  होते.

विजयने आत्महत्या करावी आणि त्या पाठोपाठ  राकेशनेही तसाच प्रयत्न करावा ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती. आयुष्याला नुकतीच सुरुवात झालेले हे युवक अशा मार्गाला लागावे ही गोष्ट खरोखर खेदजनक होती.

अशी कोणती गोष्ट असावी की ज्यामुळे या मुलांना हा मार्ग अवलंबण्याची इच्छा व्हावी. असं कोणतं दडपण या मुलांवरती आलं होतं की त्यांना मृत्यू जवळचा वाटत होता. ईन्स्पेक्टर जाधव विचार करून करून थकले होते. का कोणास ठाऊक त्यांना विजयाची आत्महत्या ही आत्महत्याचं वाटत नव्हती. यामागे काहीतरी भयंकर षडयंत्र आहे असं त्यांना वाटत होतं. ज्याला ही निष्पाप मुलं बळी पडलेली होती. आता जी दोन मुलं त्यांच्यासमोर होती. त्यांना वाचवणं हे मुख्य काम होतं. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे विजयची ज्याने हत्या केली होती त्यालाही पकडायच होतं.

" बरं आजकाल राकेशच वागणं काही बदललं होतं का ? त्याला काही काळजी असल्यासारखं वाटलं होतं का ? "

या वर प्रत्येक वेळी नाही सर, असच उत्तर मिळतं होतं.
" आजकाल फक्त तो थोडा अबोल आणि उदास झालेला वाटायचा" त्याची आई म्हणाली," पण कदाचित अभ्यासाच्या तणावा मुळे असावं असं मला वाटलं"

तेव्हढ्यात राकेश शुध्दीवर आल्याचा निरोप आला. अगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले. ते बाहेर आले. त्यानंतर ईन्स्पेक्टर जाधव त्याला भेटायला गेले.

तो शुन्य नजरेनं छताकड बघत होता. त्याचा चेहरा एकदम उदास दिसत होता.

" हॅलो, राकेश कसा आहेस?" त्यांनी उल्हासभऱ्या आवाजात विचारलं. राकेशने एकदम वळून पाहिलं. समोर एकदम पोलीस दिसताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

" राजेश का रडतो आहेस? तू काही गून्हा केला आहे  का."

" नाही सर, पण मला आता जगावेसेच वाटतं नाहीये."

" का रे बाबा, तू काही गुन्हा केला आहे का, चोरी, दरोडा, खून वगैरे. " त्यांनी त्याच्या नजरेत नजर घालून प्रश्न विचारला.

" नाही सर, तसं काहीचं नाही. पण नाही मन लागत. आता जगून तरी काय करणार. सगळ संपलच आहे. "

" वेडा आहेस की काय तू. काहीही संपलेल नाही. फक्त मला तू काय झालं आहे ते सांग. आणि हे मला अगोदर सांग की तुम्ही तिघही जण मागच्या आठवड्यात कॉलेज बुडवून कुठं गेला होता."

तो त्याच्या आई वडिलां समोर काही बोलायला तयार नव्हता म्हणून ईन्स्पे. जाधवांनी त्या दोघांना बाहेर जायला सांगितलं. ते दोघं बाहेर जाताच त्याने बोलायला सुरुवात केली.

" सर, मी, रमण आणि राकेश चांगले मित्र होतो. पण एकदिवस रमण ने आम्हा दोघांना त्या घाणेरड्या पिक्चरच्या क्लीप दाखवल्या. त्या मुळे आम्ही खूप उत्तेजीत झालो होतो."

" मग काय झालं. ते तर तुमचं वयच आहे असं वागायचं. " जाधवांनी त्याला सहानुभूती दाखवत म्हटलं. " मग पुढं काय केलंत तुम्ही ? "

" आमची उत्सुकता, कुतूहुल अजीबात थांबत नव्हत. रात्रंदिवस आमच्या तिघांच्या डोक्यात तेच विचार फिरत होते. मग आम्ही रेड लाईट एरियात जायचा निर्णय घेतला. पण तेथेही आमची आत शिरायची हिम्मत होतं नव्हती. मग आम्ही परत फिरलो. एक दिवस अचानक विजयला पेपर मधे एस्कॉर्ट सर्व्हिसची जाहिरात दिसली. त्याने ती आम्हाला दाखवली. अर्थात एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणजे काय हेच आम्हाला धड माहीत नव्हतं. पण विजयने नेट वरून त्या शब्दाचा अर्थ शोधून काढला. आणि आम्ही विजयच्या फोन वरुन त्या दिलेल्या नंबर वर फोन केला . त्या फोनवरून अतिशय गोड आवाजात कोणीतरी मुलगी विजयशी बोलतं होती. तिने अगत्यान आम्हाला बोलावलं. तिचा रेट सांगितला. आम्ही तिथं गेलो. आणि पूर्ण बरबाद झालो सर "

" अरे यात बरबाद होण्या सारखं काय आहे. तुमच्या वयाचे सगळेच मुलं असं वागत असतात. बरं ज्या नंबर वर तूम्ही फोन केला होता तो नंबर तुला माहिती आहे का "

" नाही सर, "असं म्हणून तो खूप जोरजोरात रडू लागला.

डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवत त्याला विश्रांतीची गरज असल्याचं सांगितलं. ते विचार करतच उठले. तेव्हढ्यात त्यांचा फोन वाजला.

" सर, अर्जंट हेड क्वार्टरला या . विजयचे आई वडील काही महत्वाची माहिती सांगायला पोलीस स्टेशन मधे आलेले आहेत.

आता हा काय प्रकार आहे, हे जाधव साहेबांना समजेना. अपराधी भावनेतून विजयने आत्महत्या केली असावी अशा निष्कर्षावर ते आलेले होते. पण आता प्रकरण वेगळचं वळण घेत होतं.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all