Login

सापळा ( दत्ता जोशी ) अंतिम अकरावा भाग

एका विचित्र सापळ्यात अडकलेल्या तीन निरपराध मुलांची दुर्दैवी कथा


सापळा ( रहस्य कथा भाग अकरावा )

" सर, त्या दिवशी रात्री आम्हाला चंदनने बोलावून आमचे एच.आय.व्ही. पॉझीटीव रिपोर्ट आमच्या हातात दिल्यावर आमच्या तर पायाखालची वाळूच सरकली. तो भयानक आजार. घराची बदनामी. सगळ भीषण चित्रं डोळ्यासमोर उभं राहिलं. आम्ही विजयला खूप बडबडलो. बराच वेळ निरुद्देश भटकत राहिलो. खूप दिवस आम्ही कॉलेज बुडवले होते. अभ्यासात मन लागत नव्हते. असेच भटकत असताना आम्हाला डॉली भेटली. ती तिच्या रूमवर घेऊन गेली. आम्हाला तेंव्हा माहिती नव्हतं की आम्ही नव्या सापळ्यात अडकत आहोत. तिथं डॉलीने आमच्यावर बळजबरी केली. आम्हाला कशाचीच शुध्द नव्हती. त्याचं वेळी तिची मैत्रीण आमचे फोटो काढत होती. जातांना डॉलीने आमच्या कडून फोन नंबर घेतले आणि कधीही यायला सांगितल. पणं आम्ही घरी पोहोचायच्या आधीच आमच्या व्हॉट्स अप वर डॉलीच्या बेडरूम मधले आमचे फोटो आले आणि तिने आम्हाला पैसे आणून दिले नाही तर फोटो व्हायरल करायची धमकी दिली. आम्हाला तर काहीचं सुचत नव्हतं. तिकडे चंदन तर ईकडे डॉली ब्लॅकमेल करत होती. त्या साठी आम्ही प्रत्येकाने घरात दागिन्यांची चोरी केली. तरी पैसे पुरत नव्हते. शेवटी विजयने त्याच्या बहिणीच घड्याळ तिला देण्यासाठी चोरलं. पण तिला पैसेच हवे होते. शेवटी कंटाळून आम्ही जीव द्यायचं ठरवलं. विजय तर त्याचं दिवशी खचून गेला. डॉलीने त्याला धमकी दिल्या नंतर त्याने बुरुजावरून उडी मारली. आणि तो सुटला साहेब " रमण आणि राकेश दोघंही जोरजोरात रडत होते. जाधव साहेबांना त्यांची कीव आली.

एका छोट्याश्या चुकीमुळे एक जीव हकनाक गेला होता. आणि सगळ्यांचीच झोप उडाली होती.

डॉलीचा शोध घेणं सोपी गोष्ट होती. त्यांनी तिचे फोटो मुंबई आणि ईतर सगळया पोलीस स्टेशनला पाठवले. यात मोनाचा काहीचं रोल नव्हता. पण तिची सहकारी कमल हीने प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग घेतला होता. तिला देखील ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान काही दिवसांनी राकेश आणि रमणला पोलिस स्टेशनला बोलावले गेले.त्यांचे लॅब रिपोर्ट आले होते. जाधव साहेबांनी ते रिपोर्ट त्यांच्या आई वडिलांकडे दिले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल होते. विजय असता तर नक्कीच त्याचा रिपोर्ट देखील नॉर्मल आला असता.

अचानक एक दिवस कर्जत पोलीस स्टेशन वरुन फोन आला की त्यांना हवी असलेली रोमा आता कर्जतला तिच्या मैत्रीणी सोबत एका उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने राहात आहे. ती काय करते. कुठं जाते. या वर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

लगेच जाधव साहेब आपल्या सहकाऱ्यांना, रमण आणि राकेशला सोबत घेऊन कर्जतला जायला निघाले. कर्जत पोलिसांनी डॉलीचा फ्लॅट दुरून दाखवला. रमण आणि राकेश पूढे झाले. त्यांनी बेल वाजवली. आतून कोणीतरी आवाज दिला आणि दरवाजा उघडला. रमण आणि राकेशला बघितल्यावर,

" अरे तुम यहा कैसे आगये"  असं म्हणून दार बंद करणार होते तेव्हढ्यात जाधव साहेब आपल्या सहकाऱ्यां सोबत आत शिरले. आणि त्यांना हवी असलेली डॉली त्यांच्या सहज हाती लागली होती. विजयच्या मृत्यूची बातमी तिच्या वाचनात आलेली होती. कदाचीत पोलीस आपल्या पर्यंत पोहोचतील या भीतीने तिने कांदिवलीचा ब्लॉक सोडून दिला होता. पण ईतक्या लवकर ते आपल्या पर्यंत पोहोचतील अशी तिला अजीबात अपेक्षा नव्हती.

कोर्टात डॉली, चंदन आणि कमल यांच्या विरुद्ध खटला भरला गेला. तिघांच्या विरुध्द पोलिसांकडे भरपूर पुरावा उपलब्ध होता. त्या मुळे त्यांचा गुन्हा साबित झाला आणि त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.

अशाप्रकारे ती दोघं मुलं त्या भयंकर सापळ्यातून बाहेर पडली. पण विजयच्या आई वडिलांचं सांत्वन करायला जाधव साहेबांजवळ शब्द नव्हते.