सापळा ( एक सेक्स रॅकेट) अंतीम भाग

सेक्स रॅकेट कसे उद्धवस्त केले हे सांगणारा अंतीम भाग.
पुर्वाध...प्रशांत सरांकडे अनय नावाच्या मुलाची लैंगिक शोषणाची केस येते ..ज्याचे धागेदोरे सतीश ह्या प्रायव्हेट कंप्युटर क्लास चालवणाऱ्या शिक्षकापर्यंत येऊन पोहचतात.आता सी.आय.डी इन्स्पेक्टर प्रशांत ही केस कशी सोडवतात ते ह्या भागात पाहुया
*********************************

"सर हेच ते घर आहे सतीश सरांच" ,मननने एकमजली एका चकचकीत घराकडे बोट दाखवत म्हटलं .

"ठीक आहे ,चल तुला परत घरी सोडतो ." अस म्हणुन प्रशांत सरांनी मननला घरी सोडल. मग नेहा मॅडम मननच्या कुंटुबासोबत जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवायला गेल्या.

मग प्रशांत सरांनी आपल्या खबऱ्याला फोन लावला
"हैलो छोटु ! एका माणसाची कुंडली हवी ,अर्जंट आहे.पत्ता देतो..गायवाडीचा टिचर आहे."असं म्हणून सतीश बद्दल सगळी माहिती काढायला सांगितली.

खबरीने दिलेल्या रिपोर्टनुसार सतीश हा साधा सरळ क्लासचा शिक्षक वाटत असला तरी कुठेतरी पाणी मुरत होतं. दोन मुलींना नादी लावल म्हणुन काही वर्षापुर्वी त्याच्यावर पोलीस कम्पेलंटही झाली होती पण प्रकरण कोर्टात जाण्यापुर्वी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून त्याने ते प्रकरण दडपल गेल होतं.

ह्यावरून प्रशांत सरांना सतीशवरचा संशय अजुनच पक्का झाला. इकडे त्यांनी मननच्या स्टेटमेंटच्या बेसवर सर्च वॉरेंट कोर्टाकडुन घेतल तसच छोटु खबरीला सतीशवर नजर ठेवायला सांगितले .

जस सर्च वॉरट हातात आले, तसे उशीरा त्यांनी सतीशच्या  घरावर धाड टाकली. सतीशच्या घरी काही मिळाले नाही पण पोलीसांनी जेव्हा क्लासची झडती घेतली तेव्हा त्यांना खुप शोधाशोध केल्यावर टिचर डेस्कच्या खालती छुप्या ड्रॉवरमध्ये पाॅर्न विडियो ,चाइल्ड पॉर्न विडीयो असलेले पेनड्राइव मिळाले .

अश्लील साहीत्य सापडलं म्हणुन सतीशवर गुन्हा नोंदवण्यात आला ,पण त्याला प्रशांत सरांनी कस्टडीत टाकण्याऐवजी त्याला घरीच चौकशी करण्याच ठरवलं कारण त्यांना त्याच्यावर संशय होता. आता जर सतीशला अटक केली तर ती लोक सावध होऊ शकतात.

त्यांनी सतीशला पोलीसी खाक्या दाखवला आणि विचारलं  "हे पेन ड्राइवमधले विडियो कुठे बनवतात ?"

आधीच प्रशांत सरांच्या हातचा दमदार मार खाल्लेला सतीश पोपटासारखं बोलायला लागला.

"साहेब ! काही ठराविक लोक हे मला आणुन देतात. मी पुढे गिऱ्हाईकांना देतो.. एवढच करतो..मला सोडा साहेब मी अजुन काहीच केल नाही आहे." सतीश नाटकीपणाने रडत म्हणाला.

"आणि अल्पवयीन मुलांना कोणत ऍप दाखवतोस ? " प्रशांत सरांनी शांतपणे विचारल ..

"ऍप ?  मी कोणत ऍप दाखवल मुलांना ? साहेब मुलच बघतात इंटरनेटवरती  कोणतेतरी ऍप."

आता सतीशने साफ नकार दिला असला तरी चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. त्याने कोरडा घसा ओला करण्यासाठी आवंढा गिळला .

"हे बघ बऱ्या तऱ्हेने बोल ,नाहीतर ..साहेबांच्या ऐवजी आमचा प्रसाद मिळेल आणि आमचा प्रसाद बिलकुल मऊ नसतो बर का! " प्रशांत सरांच्या टीममधील सब इन्स्पेक्टर जाधव हे त्याच्या शर्टाला पकडत म्हणाले तसा सतीश अजून घाबरला .

"हे बघ आमच्याकडे पुरावा आहे, साक्षी पण आहेत त्यामुळे  जर तू इकडे बोललास तर आम्ही तुझी शिक्षा कमी करण्याकरता कोर्टात शिफारस करू . नाहीतर ..त्या टोळीचे सगळे गुन्हे तुझ्यावरच टाकू . बोल पटापट..वेळ नाही आहे ."

असं बोलुन प्रशांत सरांनी सतीशवर मानसिक दबाव वाढवला.

"बोलतो साहेब, जो माणुस मला हे पेनड्राइव द्यायचा त्याने एक ऑफर दिली .जर मी माझ्या क्लासच्या मुलांना ऍपच्या नादी लावलं तर मला प्रति मुलगा किंवा मुलगी  यांना जाळ्यात ओढायला काही टक्का कमिशन पक्क होतं."

" बहुतेक मुलांना ह्या वयात पॉर्नचं खुपच आकर्षण असत. मी फक्त त्यांचा चांगला समजून घेणारा टिचर बनतो. मग कोण ह्या गोष्टीविषयी जास्त उत्सुक आहे ते हेरून त्यांना ऍपच्या विडियोची चटक लावतो. बहुतेकजण ह्यात फसतात. मग लाइव चॅटच्या ऑप्शनला ही मुले भुलतात आणि एकदा त्या मुलांनी लाइव चॅटरूम वापरली की मला माझे पैसे मिळतात."

हे ऐकुन पोलीस टीमचे तर हात शिवशिवत होते, सतीशला तुडवायला पण सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच स्वत:ला रोखल.

"ही लोक कुठे घेऊन जातात मुलांना?" आता सब इन्स्पेक्टर जाधवने सतीशचा जबडा जोरात पकडुन विचारलं..

" ग्रँट रोड जवळ एक दोन मजली चाळवजा बिल्डींग ह्यांची आहे. कदाचित तिकडेच, त्यांना मला कधी त्यांच्या शुटींगच्या जागी नेलं नाही आहे साहेब. मला खरच जास्त माहीत नाही आहे", सतीश आता कळवळुन सांगत होता.

"आता बरीच रात्र झाली आहे. बाहेर कोण आहे का नाही बघुन पोलीस स्टेशनमध्ये न्या ह्याला ."प्रशांत सरांनी आपल्या टीमला सांगितलं.

सगळीजण परत पोलीस स्टेशनला आल्यावरती, प्रशांत सर  आपल्या टिमला म्हणाले ,

" मला हे फक्त सेक्स रॅकेट नाही वाटत आहे ,कदाचित मानवी तस्करी असण्याचीही शक्यता आहे ."

"आपल्याकडे ह्या टोळीबद्दल  काहीच खास पुरावेही नाही आहे आणि सतीशने दिलेला पत्ता कितपत खरा असेल ह्याबद्दल ही शंकाच आहे."

"आपण उद्या ह्यासाठी ट्रॅप लावुया , उद्या  त्यांनी अनयला फोर्टला बोलवलय आहे  तर आपणही वेळेआधीच तिकडे  जाउन उभं राहायचं ."

"अनयला त्या लोकांनी गाडीत बसवल्यावर आपणही साध्या गाडीतून पाठलाग करायचा .मी नेहा मॅडमलाही ह्या धाडीसाठी आपल्याबरोबर यायला सांगतो. "

"तसही अनयच्या आई वडिलांची परवानगी हवीच आहे ह्या ऑपरेशनसाठी ,ज्या नेहा मॅडम सहज मिळवू शकतील. "

"कुणाला काही प्रश्न ..?त्यांनी आताच विचारून घ्या ."
प्रशांत सरांनी उद्याचा ट्रॅप कसा असेल ह्याची माहीती दिली. तसेच त्यांनी साबयर टिमलाही सांगुन ह्या ऍपच मेन लोकेशन काढायला सांगितले.

********************************************

नेहा मॅडम सांगितल्याप्रमाणे त्या अनयला घेउन फोर्टच्या अलिकडे आल्या .

प्रशांत सरांनी अनयला धीर देत म्हटलं, "हे बघ घाबरायचं नाही ,आम्ही पाठीच असणार आहोत.पण ,तू नेहमीसारखाच वागत रहा. मी तुला विश्वास देतो ही शेवटची वेळ आहे तुझी त्यांच्याबरोबरच जायची. "

तणावात असलेल्या अनयने होकारात मान हलवली आणि तो ठरलेल्या जागी उभा राहिला. साधारण अर्ध्या तासात एक ब्लॅक ओमनी तिकडे उभी राहीली .अनय त्या गाडीत जाउन बसला. इन्स्पेक्टर प्रशांत यांनी अनयच्या नकळत एक ट्रॅकिंग डिवाइस पण त्याच्या जीन्सला लावल होतं.

काही वेळाने फोर्टच्या गल्लीमध्ये पाठलाग करताना ती ओमनी कार अचानक गायब झाली. फोर्ट हा भरपुर गल्ली असलेला भाग आहे . एखाद्या  गाडीला पटकन  निसटणं सोप होतं म्हणूनच प्रशांत सरांनी अनयच्या कपड्यावर ट्रॅकर लावल होतं.

जीपीयस ने ट्रॅक करताना त्यांना समजल की अनयला ग्रॅन्ट रोड जवळ असलेल्या एरीयात न नेता अल्टा मॉउंटच्या पॉश बिल्डींगमध्ये नेल होत.

अनय आणि त्याच्याबरोबरची अजून दोन माणसं बिल्डींगमध्ये गेली. अनयकडून प्रशांत सरांनी आधीच मजला माहीती करून घेतला गेला होता.

ही बिल्डींग एक ऑफिस प्रिमायसेसवाली बिल्डींग होती. त्यामुळे कोणीही सहज येजा करू शकत होतं. वरती गेल्यावर अनेक  छोटे मोठे ऑफिस गाळे असलेली जागा होती. त्यांना  जीपीस ट्रॅकरमुळे बरोबर गाळा कोणता आहे हे समजले. त्या गाळ्याची पाटी आणि बाहेरचे इंटिरियर पाहुन ते एका कंपनीचे पॉश ऑफिस वाटत होतं.

मग प्रशांत सरांबरोबर असलेल्या त्यांच्या पोलीसांच्या टीमने लगेच धाड टाकली .बाहेरून ऑफिसचा सेटअप असला तरी आत एखाद्या फ्लॅटसारख इंटिरियर होत. हॉलमध्ये सोफ्यावर काही माणस बसलेली होती आणि त्यांच्यासमोर अनयबरोबर अजुन अल्पवयी असे दोन ते तीन मुले आणि मुली  तिकडे घाबरलेल्या स्थितीत उभी होती.

अचानक पडलेल्या धाडीने टोळीला काही विरोध करायला मिळाला नाही तसेच ह्या मुलांचा लिलाव होत असल्याने काही गिऱ्हाईकही कायद्याच्या कचाट्यात सापडली.

आतमधील काही दोन तीन रूम मध्ये अजुन काही मुलांच लैगिंक शोषण होत असलेल पोलीस टीमला कळलं, ही मुलं खासकरून दुसऱ्या राज्यातुन पळवून आणलेली होती. मुलांच्या आई वडिलांचा संपर्क होइपर्यंत त्या मुलांना 'सेव इनोसंट' ह्या एनजीओमघ्ये ठेवण्यात आलं.

पकडल्यानंतर टोळीच्या माणसांना प्रशांत सरांनी हे रॅकेट कसे चालते याची चौकशी करायला सुरवात केली .

"बोल! तुम्ही ह्या मुला मुलींना कसं फसवता ?"

"साहेब आम्ही मुलांना इंटरनेटवर मेल किंवा ऍप ह्या माध्यमातुन पॉर्न विडिओ दाखवतो  व त्याची चटक लागली कि त्यांच्याकडुन पैशाची मागणी करतो."

"काही मुलं पैसे देतात, काही मुलं बदनामी आणि आई वडिलांच्या भीतीने आम्ही जे सांगू ते करतात. तसेच आम्ही ह्या मुलांची सारी माहितीपण मिळवतोच . "


"अश्या कोवळ्या  मुलींना आणि मुलांना मार्केटमध्ये खुप मागणी आहे. तसेच त्यांचे विडियोही खुप खपतात. मार्केट मध्ये दरवेळी नवीन मुलं हवी असल्याने आम्ही आधीच फसवलेल्या मुलांना त्यांच्या मित्र मैत्रीणींना ह्या जाळ्यात ओढायला लावतो..ते स्वतःची सुटका करायला दुसऱ्याला त्यांच्या जागी आणतात."

"कधी कधी  साहेब दुसऱ्या राज्यातून लहान मुलांनाही उचलून आणतो, कारण विकृत माणसे त्यांचेही विडियो बघतातच ."

"साहेब मागणी आहे म्हणुन पुरवठा आहे . वयात आलेली मुले तर सोडाच पण जर वयस्क (Adult ) माणसेही  आवडीने असे विडियो बघतात .म्हणुन तर कोट्यावधींची उलाढाल होते.साहेब  तुम्ही आम्हाला सोडा..आम्ही तुमचेही भले करू. "

हे ऐकुन तर प्रशांत सरांनी त्या माणसाच्या अशी लगावली की तो कानाने बहीराच झाला. मग ह्या टोळीवर पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल केला गेला.


१  कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे ,लैगिंक शोषण करणे ह्या साऱ्या गुन्ह्यांची शिक्षा ३ वर्ष आहे .

२ बहुतेक मुलें अठरावर्षाखालील असल्यामुळें पोक्सो  कायद्याखाली प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्राॅम सेक्सुअल ऑफेंसेस एक्टच्या ह्या  कलम  ४,५, ६ ८, आणि कलम ४२ गुन्हा दाखल केला, ज्याची शिक्षा कमान ७ वर्षापासुन कमाल आजीवन कारावास असते.

३ ३७० ह्या कलमाखाली मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला ज्याची शिक्षा साधारण सात ते दहा वर्ष आहे.

हे सगळ खरतर अनयच्या आईच्या सुज्ञपणामुळे  व प्रशांत सर सारख्या चांगल्या पोलीस ऑफिसर ह्यांनी तातडीचे पाउल उचलल्यामुळे शक्य झालं पण अनय आणि मननला त्यांच्यावर घडलेल्या अत्याचारासाठी दिर्घकालीन काैनसेलिंगची मदत घ्यावी लागली.

समाप्त.

************************************

अश्यावेळी अनयच्या वडिलांसारख न रागवता मुलांना दोषी न धरता विश्वासात घ्या..त्यांच्या चुकांवर  सर्वात आधी न रागवता मुलांचे म्हणणे शांतपणे  ऐकुन घ्या कारण मुलें बहुदा एक चुक झाकण्यासाठी परत नवीन मोठ्या चुका करत राहतात तसेच गरज लागली तर योग्य ती मदतही घ्या .पण लोक काय म्हणतील ह्या भीतीने प्रकरण दडवून किंवा दडपून मुलांचे मानसिक खच्चीकरण करू नका.

हल्लीच्या काळात मुलांना योग्य लैंगिक शिक्षण हवेच त्यामुळे मुले ह्या गोष्टीकडे कमी आकर्षिली जातील तसेच पॉर्न विडियोनां जर डिमांडच राहिली नाही तर असे गुन्हे होण्याचे प्रमाणही कमी होइल अस मला वाटतं त्यामुळे कृपया पाँर्नच्या आहारी जाऊ नका.


कथा जरी काल्पनीक असली तरी सत्यघटनेवर आधारीत आहे. 
ह्यातील स्थळांची नावे फक्त कथा रचताना वापरली गेली आहेत.  पोलिस तपास कसा असतो  व कायदेशीर कलम ह्याबद्दल आमच्या कुंज ग्रुपचे सभासद खरेखुरे इन्स्पेक्टर प्रशांत सरांनी मार्गदर्शन केल होतं .

सर तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी हा दुसरा भाग लिहु शकले त्याबद्दल खुप खुप आभार  तसेच तुम्ही मला तुमचे नाव वापरण्याची परवानगीही दिली म्हणुन पुनःश्च धन्यवाद.

मला आलेल्या समिक्षेवरून जाणवल काही वाचकांना शब्दांचे अर्थ कळले नाही आहेत ..म्हणुन त्यांचे अर्थ कथेच्या शेवटी देत आहे. प्लीज ह्याला अश्लील अर्थाने घेउ नये

The Protection of Children from Sexual Offences (POCSO)  Act .

जिगोलो  = पुरुष वेश्या
सोडोमी = जबरदस्तीनं केलेल मैथुन पण पाठीमागुन किंवा मौखिक .(Forceful anal Or oral sex)
************************************
एक विनंती ही कथा  मी प्रबोधन व्हाव ह्या हेतुनेच लिहीली आहे.मग समिक्षेत नक्की सांगणार ना कसा वाटला भाग.नुसते वाचुन पळु नका.तुमच छान लिहल आहे ही हे वाक्यही आम्हा लेखकांना खुप उत्साह  देतो. ही फक्त माझी नाही सगळ्याच लेखकांची भावना आहे

तसेच  कथा लिहताना लेखकाला  खुपच कष्ट घ्यावे लागतात. जर आवडत नसेल  एक ,दोन अश्या कमी रेटींग देउन कथेची रेटींग कमी करू नका. ??

कृपया न आवडल्यास नुसतेच रेटींग देउच नका  आणि जर देणार असाल तर  का़य चुकलय तेही समिक्षेत सांगा.

.


************************************

🎭 Series Post

View all