Dec 06, 2021
सामाजिक

संयम

Read Later
संयम

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

ती आज तिचं कर्तव्य पूर्ण करत होती......

लग्न करून आली, नवरा सोडून सगळ्यांची झाली......
कुणाची वहिनी तर कुणाची काकी झाली.......
सगळी नाती निभावता निभावता थकून ती गेली....
तरी सासू विचारते घरासाठी कुठे काय ती करून गेली.......

ती थकली होती विचार करून, तो पाठुन येऊन हळूच खांद्यावर हात ठेवतो तशी ती भानावर येते.......

गेल्या वर्षभरात झालेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. २३ मार्च २०२० ला लॉकडाऊन झालं.घरात छोटी नणंद,दोन दीर,सासू आणि ती दोघे......कमवणारा फक्त तिचा नवरा.......दोन्ही दीर लॉकडाऊन मुळे घरातच होते.......पण पगार चालू होता....आणि तिचा नवरा सरकारी अधिकारी असल्याने दोन अडीच महिने घरात राहून अत्यावश्यक सेवेसाठी गाड्या चालू झाल्या तसा कामाला जाऊ लागला......एवढया गोतावळ्यात लहान असून फक्त नणंद समजूतदार होती.आई आणि दोन्ही दिरांचा खोटेपणा आणि करामती तिला चांगल्याच माहीत होत्या.............. घरात हवं नको ते फक्त तोच बघत होता आणि घर ती सांभाळत होती, पण तरी आई मात्र त्या नवरा बायकोलाच चुकीचं बोलायची,मग छोटी नणंद तिची समजूत घालून तिला सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सांगायची.नणंद भावजयी मध्ये फक्त दोन वर्षांच अंतर होत.वहिनी १९९४ मधली तरी नणंद१९९६ मधली.....दोघी नेहमी बहिणीसारख्या राहिल्या.......एकमेकींना समजून घेणं,मदत करणं........लहान बहीण कायम तिच्या  सोबत आहे म्हणून तो निर्धास्त पणे कामाला जात होता.......पहिले सहा महिने घरात बसून दोन्ही दिरांना पूर्ण पगार येत होता, पण आई आणि दोन्ही दीर अस दाखवत होते जणू......... त्यांच्या हातात काहीच नाही.......सहा महिन्यांनी एकाचा पगार ३०% तर दुसऱ्याचा ५०% असा येऊ लागला. कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून मग हा पगार येईल त्यात फक्त घरातील किराणा भरायचा. चटरपटर खायची सवय त्यात तो घरात फार सध्याच्या काळात महत्वाचं सामान फक्त भरायचा.........कारण बाहेर परिस्थिती एवढी गंभीर होती की, कोरोना कधी छुप्या पावलांनी घरात येईल सांगता येत नव्हतं...... पण आई मात्र घरात एवढं करून सुद्धा मोठया लेकाचं नाव म्हणून काढत नव्हती.तिला या गोष्टीचा खूप वाईट वाटायचं....….काही दिवसांनी दोघे नवरा बायको सोडून बाकी सगळे गावी गेले कारण त्याच काम चालू असल्याकारणाने त्याला जाणं शक्य नव्हतं आणि त्याच्या खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून ती थांबली होती.......नणंद सोडून कोणालाच त्यांची जास्त पर्वा नव्हती...दोघी नणंद भावजयीनी गळाभेट घेतली आणि सगळे गेले.इकडे पंधरा दिवसांतचं त्याला कोरोनाची लागण झाली.त्याने स्वतःला होमकॉरंटाईन करून घेतलं.त्याने ही गोष्ट फक्त त्याच्या छोट्या बहिणीला सांगितली. ती तर खूप घाबरली होती पण तस दाखवून चालणार नव्हतं.......या तिघांचे एकमेकांना रोज फोन चालू होते. ती पण सगळं पौष्टिक जेवण,वेळच्या वेळी काढा,गरम पाणी,हळदीचं दूध,उकडलेली अंडी असा आहार घेत होती आणि त्याला पण देत होती.


वीस दिवसांतच त्याने कोरोनावर यशस्वीपणे मात केली. पुन्हा त्याने स्वतःसोबत तिची पण कोरोना चाचणी करून घेतली तर दोघेही निगेटिव्ह आले.तरी सुद्धा दोघ खूप काळजी घेत होते.


चार महिन्यांनी सगळे परत मुंबईत आले.सगळे येण्याआधी त्याने घरात किराणा वैगरे भरून घेतला. मुंबईत येऊन दोघे भाऊ कोरोना गेल्यासारखे इकडे तिकडे मित्रांसोबत भटकू लागले.......आई पण बागेत नाही तर बिल्डींग खाली जाऊ लागल्या... त्याचा निकाल म्हणून हे तिघेही कोरोना पोसिटीव्ही आले.....आईचं वय असल्याने तिला ऑक्सिजन बेड ची गरज लागली आणि दोन्ही भावांची परिस्थिती पण फार काही वेगळी नव्हती.कोरोनाच्या नावानेच तिघे घाबरले होते........तिघांसाठी जवळ जवळ सहा सात लाख खर्च झाला. आईची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना पंचवीस दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून पाच दिवस आयसोलेट करण्यात आलं आणि या दोघांनाही दहा दिवस ऑक्सिजन बेड वरचं ठेवण्यात आलं होतं. आपल कर्तव्य म्हणून तिने सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष देऊन सगळ्यांची काळजी घेतली. तोंडाला चव नव्हती म्हणून तिघांना जे हवं ते खाऊ घातलं. हॉस्पिटलचा एवढा खर्च त्याने स्वतःची एफडी मोडून केला आणि तिने सुद्धा तिचा सोन्याचा हार विकला........


आई आणि ही दोघे एवढं करून पण तुला नको नको ते बोलत असून तू त्यांच्या साठी एवढं करतेस........खरंच मी खूप भाग्यवान आहे....."तो"


हो मग.......माझी वहिनी आहेच लाखात एक...."त्याची छोटी बहीण"

पुरे झालं कौतूक.......ते माझं कर्तव्य होतं. ते आपल्या सोबत जसे वागत आहेत तसचं आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक..."ती"

 

वहिनी खरचं...... तु ग्रेट आहेस....."त्याची छोटी बहीण"


आई आणि दोन्ही दीर त्यांचं बोलणं ऐकतात त्यांना त्यांची चूक समजते सोबतच दादा आणि वहिनीच्या मनाचा मोठेपणा ही कळून चुकतो....वर्षभर घरात बसून मिळणार पगार जो नाही भेटत सांगितला होता त्या सगळ्या खऱ्या गोष्टी तिघेही कबूल करून दोघांची माफी मागतात.

समाप्त........

कथा आवडल्यास नक्की शेअर करा.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading