Login

संत तुकाराम अभंग ( भाग -४)

Vaari


संत तुकाराम अभंग

पावलें पा‌वलें तुझें आम्हां सर्वदुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥

अर्थ - हे देवा, जे जे आम्हांला तुझ्याकडून हवे होते ते ते सर्व मिळाले आहे. आता आमच्या मनात दुसरी कोणतीही भावना येऊ देऊ नको. 

माणसाचे मन कधी ही न भरणारं असं आहे. हे परमेश्वरा, आता कोणतीही इच्छा मनामध्ये येऊ देऊ नको.

जेथें तेथें देखे तुझींच पाउलेंत्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥

अर्थ - हे विठ्ठला , जिथे जिथे मी बघतो तिथे तिथे तुझी च पाऊले दिसतात. तू अख्या विश्वात सामावलेला आहेस. 

असे विश्वात कोणतेही ठिकाण नाही की जिथे तुझे अस्तित्व नाही. तू  पावलोपावली आम्हां दिसतो.

भेदाभेदमतें भ्रमाचे संवादआम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥

अर्थ - हे देवा, भेद व अभेद सर्व मनाचे खेळ आहेत. असं काही नसतं. आम्हांला त्यामध्ये पाडू नको.

तुझ्या दारात कोणताही भेद - अभेद नाही , हे सर्व मानवाने निर्माण केलेलं आहे .

तुका म्हणे अणु तुजविण नाहींनभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥

अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, अणुमध्ये म्हणजे एकदम सुक्ष्मातील सुक्ष्म कणामध्ये सुद्धा तू आहेस. तसं पाहिलं तर तू आभाळापेक्षा ही मोठा आहेस.

तुझे अस्तित्व ह्या चराचरामध्ये आहे.

समाप्त






🎭 Series Post

View all