संत तुकाराम अभंग (भाग ३)

Vaari

संत तुकाराम अभंग

अंतरिचीं घेतो गोडीपाहे जोडी भावाची ॥१॥

अर्थ - परमेश्वर फक्त भक्ताच्या अंत:करणातील भक्तीचा भाव व गोडीच पाहत असतो. देवाला दुसरे काहीही आपल्याकडून अपेक्षित नसते. आपल्या मनातील भक्तीचा भाव च त्याला आनंद देणारा असतो. आपण कितीही वेगवेगळी मिठाई किंवा खूप मोठा खर्च करून पूजा केली तरी देवाला फक्त आपल्या मनातील भावच भावतो. मग ती पूजा तुम्ही अगदी साधेपणाने केली तरी देवाला ती भरून पावते. कारण देव हा फक्त भावाचा भुकेला असतो.

देव सोयरा देव सोयरादेव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥

अर्थ - देवाचं आणि भक्ताचं नातं निर्माण झालेलं असतं त्यामुळे देव हा आपला सोयरा झालेला असतो.

आपुल्या वैभवेंशृंगारावें निर्मळे ॥२॥

अर्थ - आपल्या जवळ जे काही धनसंपत्ती असते. मग ती किती का असेना, ते देवाने आपल्याला दिलेले वैभव आहे , असे  समजून निर्मळ मनाने म्हणजे च चांगल्या मनाने त्याचा  स्वीकार करावा.

तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥

अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, देव हा भक्तां बरोबर जेवण करतो व आपल्या प्रेमाचा त्यांच्यावर सदा वर्षाव करत राहतो. 

देवाला आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते फक्त भक्ती भावाचा तो भुकेला असतो व देव आपल्याला परत कधीही एकटं सोडत नाही तो सदा आपल्या सोबत असतो व सतत प्रेमाचा वर्षाव करत राहतो.

समाप्त



🎭 Series Post

View all