संत तुकाराम अभंग ( भाग - २)

Vaari

संत तुकाराम अभंग

आपुलिया हिता जो असे जागताधन्य माता पिता तयाचिया ॥१॥

अर्थ - जो आपले बरे - वाईट यासाठी नेहमी जागरूक असतो. ज्याला आपले हित कळते म्हणजेच कोणत्या गोष्टी पासून आपल्याला सावध राहायला हवे , हे कळते.

 कोणत्या गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत आणि लाभदायक आहेत , असे ज्याला कळते त्याचे आई - वडील भाग्यवान आहेत . 


कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विकतयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥

अर्थ -  ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले म्हणजेच चांगली वर्तणूक करणारी मुले जन्माला येतात. त्या कुळाचा देवाला म्हणजेच परमेश्वराला देखील हेवा वाटतो.


गीता भागवत करिती श्रवणअखंड चिंतन विठोबाचें ॥२॥

अर्थ - अशी चांगल्या वृत्तीची मुले गीता -भागवत याचे वाचन करतात व सतत विठोबाचे मनन- चिंतन करतात. अशी मुले धार्मिक वृत्तीची असतात व ती भक्तिमय होऊन जातात. 


तुका म्हणे मज घडो त्याची सेवातरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

अर्थ- तुकाराम महाराज म्हणतात , अशा मुलांची सेवा जर माझ्या हातून घडली तर हे मी माझे भाग्यच समजेल.


समाप्त


🎭 Series Post

View all