संत मीराबाई माहिती इन मराठी ||Sant Mirabai information in Marathi ||

संत मीराबाई माहिती इन मराठी ||Sant Mirabai information in Marathi ||संत मीराबाई विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये information about Sant Mirabai in Marathi||
संत मीराबाई || Sant Mirabai

संत मीराबाई माहिती इन मराठी||Sant Mirabai information in Marathi ||संत मीराबाई विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये information about Sant Mirabai in Marathi||


पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे

तिच्या अंतर्मनात दाटलेले दुःख , ओसंडून वाहणारी
करूणा, सावत्र दिराकडून होत असणारा छळ आणि तरी सुद्धा न डगमगलेला आत्मविश्वासाने भक्ती आणि भगवान श्रीकृष्णांविषयी अमाप प्रेम या पाच ओळींमध्ये ओतप्रोत भरलेलं दिसून येतं.

अगदी चौदाशे 98 च्या काळात एका भारतीय स्त्री संत मीराबाईने रचलेल्या ह्या ओळी आणि अशाच जवळजवळ बाराशे ते तेराशे रचना मीराबाईंनी कृष्णाला उद्देशून लिहिल्या. खरंतर वियोगातलं जीवन जे त्या जगत होत्या त्याला शब्दांच्या बंधनात त्यांनी बांधलं.

चला तर सर्वात आधी जाणून घेऊया मीराबाईन बद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती . त्यांचं कुटुंब कुळ आणि कृष्णभक्तीत तल्लीन होण्याअगोदरच आयुष्य
Information about Sant Mirabai and her Name Birthday,Death,Father Name, (Husband Name.

★नाव : मिराबाई
★जन्म सुमारे 1498 राजस्थान
★निर्वाण: सुमारे 1577 व्दारका
★वडिल रतनसिंह
★पति: चित्तोड चे राणा सांगा यांचे पुत्र भोजराज

मिराबाई म्हणजे एक ज्वलंत ज्वाला होती.
खरं सांगायचं झालं तर संत मीराबाई बद्दल फारशी माहिती अद्याप कुणाकडेच नाही जी आहे ती सुद्धा किती प्रमाणात सत्य हे सांगता येण्यासारखे नाही. लोककथांच्या माध्यमातून भारताच्या इतिहासाने संत मीराबाईंना जिवंत ठेवला आहे आणि तीच माहिती आपण या लेखातून बघणार आहोत.

 त्यांच्या वडीलांचे नाव रतनसिंह. ते मेडतिया (राजस्थान) येथील राठोड होते. मीरा बाईंचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी (कुकडी) गावी झाला.

अनेक अभ्यासकांच्या मते संत रैदास हे त्यांचे गुरू होते.
सोबतच असे सांगितले जाते की त्यांच्या गुरुने त्यांना दिलेली एक कृष्णाची मूर्ती होती जी मीराबाई नेहमी स्वतःच्या सोबत ठेवायच्या.
मीराबाईंचे उपलब्ध असणारे चित्र किंवा आज निर्माण केले जाणारे देखावे त्यामध्ये सुद्धा मीराबाई सोबत एक कृष्णाची मूर्ती नेहमी असते.
ती मूर्ती त्यांना त्यांच्या गुरूकडून मिळालेली असं सांगितलं जातं.

मीराबाईंच्या बालपणाबद्दल आणखी एक आख्यायिका फार वेळा सांगितली जाते ती म्हणजे मीराबाई यांच्या वडिलांच्या अनुपस्थितीत त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला एक वेळ घरासमोरून लग्नाची वरात जात असताना मीराबाईंनी' माझा वर कोण ?'
असा प्रश्न विचारला असता लहान घ्या मीराला उत्तर मिळालं भगवान श्रीकृष्ण ,गोपाळ आई आजीने मीराला हे उत्तर जरी बालमन समजून दिलं असलं तरी मीराबाईंच्या आयुष्याचा इथून कायापालट झाला.
देवघरातल्या श्रीकृष्णाला त्यांनी खरोखरच स्वतःचा जीवनसाथी मानून घेतलं,,, पण लोक लाज आणि कुळाची मर्यादा म्हणून मीराबाईंनी स्वतःचे प्रेम नेहमी भक्तीच्या पडद्यामागेच ठेवलं.
पण आजोबा वैष्णव पंथातले असल्यामुळे घरात भक्तीचा वातावरण असे आणि मीराबाई देखील धार्मिक झाल्या.
दिसायला सुंदर मनाने निर्मळ आणि कृष्ण भक्ती तल्लीन झालेली मीरा लहान घ्यावयातच तिचं लग्न
उदयपूरचे महाराणा संग यांचे पुत्र भोजराज यांच्याशी झाल; आणि असं सांगितलं जातं आख्यायिकांद्वारे की मीराच्या मनात याही वेळी कृष्णा विषयी भक्ती आणि प्रेम होतच त्यासाठी त्यांना बहुतेक वेळा सासरी उनदून ऐकायला मिळायचं कारण मीरा कृष्ण सोडून इतर कुठल्या देवाला भजत नसे.
अशातही संत मीराबाईंनी कधी मर्यादा ओलांडली नाही त्यांनी सासरच्या लोकांना आपलंसं करून घेतलं आणि संसारात मन जमवण्याचा प्रयत्न केला पण नियतीला कदाचित मीराबाईंचा संसारच मान्य नव्हता,
किंवा आज असं म्हणायला काही हरकत नाही की मीराबाईंच्या नियतीमध्ये श्रीकृष्णच लिहिले होते
अल्पकाळात तिला वैधव्य प्राप्त झाले. छोट्याशा मीराचा संसार अर्ध्यावर सुटला.
त्यानंतर वडील, सासरे, दीर रतनसिंह इत्यादींच्या एकामागून एक झालेल्या निधनांमुळे तिची वैराग्यवृत्ती वाढत गेली व मन भक्तीतच अधिक रंगू लागले.
शिवाय सोन्याच्या पिंजऱ्यात बंद झाल्या सारख्या मीराकडे त्याच्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता पण ही भक्ती एका मर्यादेच्या बाहेर जाऊ लागली मीराला कृष्णा व्यतिरिक्त दुसरे कोणीच दिसेना.

पण पतीचा मृत्यू झाला असला तरीसुद्धा मीरा होत्या तर एका राजघराण्यातील कुलवधूच.
त्यांचं उठ सूट कृष्णाच्या मंदिरात जाणं, त्याच्या भक्तीत नेहमी तल्लीन राहणं, भर रस्त्यात कृष्णाचे भजन गाणं किंवा स्वतःच्या राजघराण्यातील मर्यादा सोडून सामान्य स्त्रियांसारखं भजन सत्संग करण.
आणि जनतेसमोर समाजासमोर कृष्ण प्रेमात स्वतःला झोपून देणे हे सगळं मीराबाईंच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहीत होतं.
राजघराण्यातील स्त्रीने सर्वांसमक्ष मदिंरात नाचावे, गावे हे न आवडल्याने राणा विक्रमादित्याने (भोजराजाचा सावत्र भाऊ) मीरेचा अनेक प्रकारे छळ केल्याचा निर्देश तिच्या पदांतून आढळतो.
वर लिहिलेल्या ओळींमधूनही तेच भासते ‌.
अर्थातच हे योग्य नव्हते या तथ्य किती हा प्रश्न असला तरी सुद्धा मीराबाईंच्या भाषणांमधून त्या काळाच्या लोककथा मधून हे वारंवार सांगितला आणि ऐकलं गेलंय हे मात्र खरं.
मीरेचा जन्म, विवाह, वैधव्य व मृत्यू यांच्या सनांबाबत अभ्यासकांमध्ये खूपच मतभेद आहेत;

मीराबाईंच्या जन्म मृत्यूचा सालांबद्दल किंवा त्यांच्या मृत्यूच्या म्हणजेच निर्वाणाच्या कारणांबद्दल त्या किती काळ मेवाडमध्ये राहिल्या याबद्दल आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या कुठे आणि कशा होत्या याबद्दल बरेच संभ्रम आढळून येतात.
१५३३ च्या सुमारास मीरा मेवाडवरून मेडत्यास आली असावी. १५३८ मध्ये जोधपूरच्या मालदेवाने वीरमदेवाकडून (मीरेचे काका) मेडता जिंकून घेतल्यानंतर ती सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनास गेली असावी आणि १५४३‌ च्या सुमारास ती द्वारकेस गेली असावी. तेथेच त्या शेवटपर्यंत होती.

संत मीराबाईंचा जीवनकाळ एवढ्या पुरतात मर्यादित नेहमी राहिला आहे पण मीराबाई फक्त इतक्यात संपणाऱ्या किंवा सामावून येणाऱ्या नव्हत्या.
त्यांचे अभंग त्यांनी रचलेले गीत आजही कृष्ण भक्तीने कंठ ओला करायला पुरेसे आहेत.

अतिशय युक्ति म्हणून सांगण्यासारखे नाही पण मीराबाईंच्या भजनांमधून हे बहुतेक वेळा आढळून आले आहे की त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या दिराकडून होत असणाऱ्या छळा मध्ये कधीच मीराबाईंची हानी झाली नाही कारण कृष्ण नेहमी त्यांच्या बरोबरच असायचे असं सांगितलं जातं.

सोबतच एक अजून आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे अशी की कृष्ण जेव्हा गोकुळात होते तेव्हा राधेच्या सख्यांपैकी एक गोपिका ललिता होती.
इतर गोपिकांसारखी तिचे सुद्धा कृष्णावर निस्सिन प्रेम होते मीराबाई स्वतःला तिचा पुनर्जन्म समजायच्या पण यात किती खरे हे काही शाश्वत नाही.

मीराबाईंच्या आयुष्यामध्ये कृष्ण नावाच्या चौकटीमध्ये आखून घेतलेल्या कदाचित यापेक्षा मोठी उपाधी मीराबाईंना काय असेल की मानव देह धारण करून सुद्धा त्यांची तुलना आज आपला समाज राधे सोबत करतो ‌
आजही अनेक अभंग उभ्या रचल्या जातात गीत रचली जातात जे मीराबाईंची बाजू मांडतात.
प्रेम नेहमी अमर राहणारी गोष्ट आहे आणि मीराबाईंचं भगवान श्रीकृष्णाने विषयीच प्रेम ते सुद्धा नेहमी आजारामर राहणार.

सोबतच मीराबाई एकादृष्टीने भारताच्या उज्वलतेचा प्रतीक आहेत कारण इतक्या जुन्या काळात जिथे स्त्री आणि लिखाण यांचा संबंध असणे खरे मानले जावे तिथे त्यांचा भला मोठा साहित्य ठेवा आपल्या सगळ्यांना पाहायला अनुभवायला आणि आजही वाचायला मिळतो.
कमालीची बाब आहे ना.... एक सामान्य स्त्री कृष्ण भक्तीत इतकी वेडी होऊन जाते की सगळ्या मर्यादा तोडून ती फक्त कृष्णात सामावून राहते.
एकीकडे बघायला गेलं तर राजवाडा राजघराणा सर्व सुख सोयी सुविधा सोडून मीरा रस्त्यांनो अनवाणी पायाने फिरत आहे आणि कृष्ण भक्तीचे गीत गात आहे.
एकीकडे ती संसाराच्या सगळ्या मोहमायातून मुक्त होत आहे आणि दुसरीकडे ती कृष्ण प्रेमात अडकली जात आहे कदाचित प्रेम यालाच म्हणावं.

अशा मीराबाईंच्या कथा ऐकल्या त्यांचे कृष्ण भक्तीचे गीत ऐकले की प्रेमाची खरी व्याख्या कळू लागते असं म्हणायला काही हरकत नाही.
एखादी व्यक्ती मुळात देव आहे त्यांचा अस्तित्व मनुष्य लोकात असणं याची काही शाश्वती नाही त्यांची आणि आपली कधी भेट होणार नाही आपल्याला डोळे श्रीकृष्णाचे चेहरा पाहायला विना मिटावे लागतील हे सगळं कळत असतानाही मीराबाईंनी स्वतःचा सर्वस्व त्यांना अर्पण केलं.
आणि कदाचित संत असण्याची हीच खास गोष्ट असावी की निस्वार्थ भक्ती करत जाणं कुठलीही अपेक्षा न ठेवता.

स्त्री जातीच्या इतिहासाला अधिकाधिक सुंदर बनवणाऱ्या महान संत श्री मीराबाईंना माझा सादर प्रणाम.


संत मीराबाई माहिती इन मराठी ||Sant Mirabai information in Marathi ||संत मीराबाई विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये information about Sant Mirabai in Marathi||

©® Anjali Dinkar Autkar