संस्कारी बाप भाग-२

एक विनोदी कथा


संस्कारी बाप भाग-२


अरे! गीरीधर दादा लवकर सांग तो तूझा ढासु प्लान! तिघंही उतावीळ पणे म्हणाले.


भावानो ऐका! आज आपण रात्री त्या काठ्या चोरून त्या जागी तश्याच चार काठ्या ठेवू! म्हणजे एक वर्षाने त्या काठ्या आपला बाप चेक करेल तेंव्हा त्यांची उंची नां कमी झालेली असेल नां वाढलेली असेल. म्हणजे आपल्याला चारही जणांना सारखीच प्रॉपर्टी मिळेल! काय? कसा वाटला माझा प्लान?


मोठा भाऊ गीरीधरच्या प्लान वर सगळे खूष झाले आणि त्यांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या.

लेकिन भाई लोक! त्या काठ्या तर माँ ने तिच्या पलंगाखाली ठेवल्यात तो निकालेँगे कैसे? -संजय

या साठी माझ्या कडे आयडिया आहे! सगळ्यांनी रामदास कडे आशेने पहिले.

बघा! आज रात्री बरोबर बारा वाजता मी आणि कुमार किचन मध्ये जावुन तिकडे भांडी पाडु! तेंव्हा गिरी दादा तु आणि संज्या तुम्ही दरवाज्याच्या बाजुला थांबा!किचन मध्ये काय आहे हे पहायला जसं आई बाहेर येईल त्या वेळात तुम्ही त्या काठ्या बदला समजल?


रामदासच्या आइडिया वर पुन्हा सगळे खूष पुन्हा एकमेकांच्या हातावर टाळ्या.


अग! राधा कसला आवाज येतोय किचन मध्ये?

अहो! उंदीर असतील!

अग! उंदीर नाही बोके असतील बोके!!

अहो! चला ना माझ्यासोबत मला भीती वाटतेय!

ठीक आहे!

राधा-मोहन किचन मध्ये काय आहे ते पहायला गेली. इतक्यात गिरी- रामने काठ्या बदलल्या.


अरे देवा! काय हे इतकी सगळी भांडी पाडली त्या बोक्याने? किचनमध्ये भांडया सोबत हॉलीबॉल खेळत होते की काय?-राधा

नाही ग! चोर पोलीस खेळत असतील कारण लाईट देखिल गेलीय ना? त्या दोन्ही बोक्यानां उलटा टाकुन त्या काठयांनी ठोकला पाहिजे!

अहो! तुम्हांला कस माहिती दोन बोके होते म्हणून?

अग! साहजिक आहे. चोर- पोलीस काय एकटा बोका खेळणार?

हो! बरोबर आहे तुमचे!


ठीक आहे! नंतर आवर आता लाईट देखिल गेलीय!- मोहन.

तो पसारा तसाच ठेवून ती दोघं खोलीत आली.

अहो! उद्या सकाळच काय?-

अग! प्लान प्रमाणे मी परत एकदा उद्या सकाळी आजारी!

अहो! खर सांगु तुम्ही खुपच हुशार आहात! तुम्ही जसा प्लान बनवला होता.अगदी तसच घडतय! तुम्ही खरच आपल्या मुलांचे बाप आहात बाप! राधा लाडीक पणे


आता नेहमी प्रमाणे गप पडून रहा! मोहन गंमतीत म्हणाला.


दुसऱ्या दिवशी सकाळीच परत तोच सीन


पोरांनो! काय केलेत हे?

अरे! जस मला वाटल होत तेच तुम्ही केल! काहीतरी वेगळा ढासु प्लान बनवायचा ना? मोहन कळवत

बाबा! काय झाल? आमच काही चुकले का? मासूमियत मधे चारही जण

हो! पोरांनो!चुकलंच तुमच!

इतका फालतु प्लान बनवायचा? मोहन कळवत

फालतु प्लान? चारही जण पुन्हा मासूमियत मधे


अरे! पोरांनो!! मी त्या तुमच्या काठ्याचोर प्लान विषयी बोलतोय! मोहन आणखी कळवत.

काय? -चारही

हो! पोरांनो! काल रात्री तुम्ही ज्या काठ्या चोरल्या त्या नकली होत्या. कारण असली काठ्यांवर आय. एस. आय. चा मार्क आहे!

आय. एस. आय. मार्क?-पुन्हा चारही

हो! पोरांनो आय. एस. आय.मार्क म्हणजे थोडक्यात असली माल!
मला आणि तुमच्या आईला चांगलच माहिती होत की, तुम्ही त्या काठ्या बदलणार!

त्यामुळे आम्ही आधिच नकली काठ्या तुमच्या आईच्या पलंगाखाली ठेवल्या होत्या. आणि असली काठ्या अश्या ठिकाणी ठेवल्या आहेत. ज्या तुम्हांला कधीच सापडणार नाहीत! समजल?

पोरांनो! तेंव्हा आता तुम्हांला चांगले कर्म म्हणजेच पुण्य केल्याशिवाय पर्याय नाही! समजल?- मोहन आणखी कळवळत.

आता मात्र त्या चारही जणांची हवा टाईट झाली. ते समजले अपना बाप भी कुछ नही।

त्या रात्री झोपताना प्रत्येक जण एकच विचार करु लागला की, आपण उद्यापासून चांगले काम करायचे. पण याची खबर आपल्या भावांना होता कामा नये.

दिवस उजाडला तस चारही जण एकमेकांना न सांगता घराबाहेर पडले. जेणेकरून त्यांना पुण्य मिळवता येईल.

रस्त्यात जातांना कुमारला एक आजी दिसली. तो समजला तिला रस्ता पार करायचा आहे. चला! आपल्याला पुण्य कमवायची आयती संधी आली आहे म्हणून त्याने आजीच्या हाताला धरले व रस्ता पार करु लागला. इतक्यात कुमारने समोरुन येणाऱ्या रामदासला पहिले. आता हया रामाने आपल्याला पुण्य मिळवताना पहिले तर इतर भावांसमोर हा बोंबाटा करेल.

म्हणून त्याने कस तरी आजीला कडेला आणले व तो बाजूच्या टपरी मागे लपला.

आजीला रस्त्याच्या कडेला पाहून रामदासला वाटले आजीला रस्ता पार करायचा असेल. पुण्यं मिळतंय तर कश्याला सोडू? त्याने आजीचा हात धरला व आजीला होत्या त्याच जागेवर परत नेवून ठेवले.

हे सगळ पाहून टपरीमागे लपलेल्या कुमारने कपाळाला हात लावला. साला एक पुण्यं मिळत होत ते पण या राम्याने घालवले. रामदास मात्र एक पुण्यं मिळवले म्हणून खुश होता.इतक्यात ती आजी म्हणाली

पोरा! काय पाप केलंस हे? मला रस्ता पार करायचा नव्हता!

तसा रामानेही कपाळाला हात लावला.

परत जशीच्या तशी घटना आजी तीच फक्त यावेळेस गीरीधर आणि संजय होते बस्स!

बिचारी आजी तिला काय चालले आहे काहीच समजत नव्हते.

पुण्यं करण्यासाठी ते चारही जण दिवसभर फिरले मात्र त्यांना एकही पुण्यं मिळवता आल नाही.


संध्याकाळी सर्व जण घरी आले. त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती.

मोहन व राधा समजले यांनी आज काहीच पुण्यं मिळवलेल नाही. मात्र त्यांच्यासाठी समाधानाची बाब ही होती की, चला आपली मुलं प्रयत्न तर करतात.

अहो! उद्या काय होईल हो!-

राधा! आता उद्या बघच तु! हे चारही जण पुण्यं मिळवण्यासाठी उद्या काय काय धम्माल करतील ते?

(पुण्यं मिळवण्याचा पुढचा धम्माल भाग लवकरच)

-चंद्रकांत घाटाळ