संस्कार वेली ( भाग ४ व अंतिम भाग)

संस्कार


संस्कार वेली (भाग ४ व अंतिम भाग)


दुसऱ्या दिवशी सकाळी फिरून येतानाच सोहम नी बाबानां गाठल. आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला.
" बाबा खरचं तुम्हांला असं वाटतं की मी पमीशी लग्न कराव?" सोहम
" का तुला नाही वाटतं? शौनक
" तसा विचारच मी कधी केला नाही. मी फक्त मैत्रिण म्हणूनच बघितले तिच्याकडे. मला तुमच कौतुक पण वाटतयं आणि आश्चर्य पण." सोहम
" का? ती पंजाबी आहे म्हणून. तू विसरलास का माझा आणि तुझ्या आईचाही आंतरजातीय विवाह आहे. आम्ही जातपात कधीच बघितली नाही" शौनक
"तस नाही पण तिचे आधी एक लग्न झालेल होत ती घटस्फोटित आहे. अस असताना सुद्धां तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करता आहात. " सोहम.
" असला घटस्फोट तरी बिघडलं कुठे? तुला त्त्याबद्दल शंका आहे, एक लक्षात ठेव सोहू. लग्न म्हणजे शारीरिक संबंध नव्हे. तिथे पण एकमेकांना एकमेकाचे मन जाणण्याची, ते जपण्याची गरज असते. तुमच्याकडे अँटजस्टमेंट पॉवर किती आहे यावर आणि तुमच्या समजून घेण्यावर, एकमेकांच्या विश्वासावर लग्नासारखं नातं टिकतं. मला विचारशील तर घटस्फोट ही किरकोळ बाब आहे." शौनक

" पण बाबा मी तिच्याशी नातं निभावू शकेन? कधी माझ्या मनात संशय जागा झाला तर? सोहम

" तस असेल तर तू अजिबात विचार देखील करू नकोस. तिच आयुष्य आणखीन कॉम्पलीकेटेड करू नकोस. स्वतःच्या मनाशी पूर्ण विचार कर. जर तुमच्या नात्याला न्याय देऊ शकणार नसशील, तुझा विश्वासच नसेल तिच्यावर तर आत्ताच नाही म्हण. " शौनक

" तसं नाही ती विश्वास ठेवण्या योग्य आहे. ती खरचं चांगली आहे. मी विचार माझाच करतोय. पण बाबा मला ती खरचं आवडते. " सोहम

" हे बघ नक्की काय ते नीट विचार कर. नीट विचार करूनच निर्णय घे. पण मग मात्र मागे हटायचे नाही. तिचा विश्वास जिंकायचा आणि कायम ठेवायचा. विचार पक्का नसेल, स्वतः वर विश्वास नसेल तर चुकीचा निर्णय घेऊन तिला आणि स्वतःला सुद्धां फसवायचे नाही." शौनक

" बाबा मला थोडा वेळ दे. मी आधी तिच्याशी व्यवस्थित बोलतो कारण आम्ही कधीच याविषयावर बोललो नाही. आणि मगच मी या सर्वावर विचार करू शकेन.," सोहम


चारदिवसांनी सोहमचा निर्णय झाला. चांगुलपणाचा विजय झाला तसा विश्वासही जिंकला आणि सोहम लग्नाला तयार झाला. लग्नानंतर सोहम पुन्हां पत्नीसह अमेरिकेला निघून गेला.

समाप्त

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


🎭 Series Post

View all